हर्षा गुप्ते
कोथिंबिर वडी – प्रकार 1
साहित्य
- किसलेला कच्चा बटाटा – 1 वाटी
- चिरलेली कोथिंबीर – 1 वाटी
- तांदळाचे पीठ – 2 मोठे चमचे
- बेसन – आवश्यकतेनुसार
- लसूण – 7-8 पाकळ्या
- आले – 1 इंच
- हिरव्या मिरच्या – आवश्यकतेनुसार
- धणे – 1 चमचा
- जिरे – 1 चमचा
- बडीशेप – 1 चमचा
- ओवा – अर्धा चमचा
- तिळ – 1 चमचा
- तेल – तळणासाठी
- हिंग – स्वादानुसार
पुरवठा संख्या – चार जणांसाठी
एकूण कालावधी – अर्धा तास
कृती
- एका मोठ्या वाडग्यात चिरलेली कोथिंबीर, किसलेला कच्चा बटाटा घ्यावा.
- आले, लसूण, मिरच्या, धणे, जिरे, बडीशेप, ओवा हे सगळं जाडसर खलबत्त्यात कुटून घ्यावे.
- कुटलेले हे मिश्रण कोथिंबीर आणि किसलेल्या बटाट्यात घालावे.
- नंतर त्यात चमचाभर तिळ आणि चिमूटभर हिंग मिक्स करावं.
- आता त्यात मावेल तसा बेसन घालत रहा.
- हे सर्व मिश्रण घट्टसर झाल की, उंडे बनवा किंवा डब्यात घालून वाफवून घ्या.
- त्यानंतर त्याच्या वड्या पाडून खरपूस तळून घ्याव्यात.
टीप
- पुदिन्याची किंवा कोथिंबीर-नारळाच्या चटणीबरोबर ही कोथिंबीर वडी खूप रुचकर लागते.
- तयार मिश्रणात चिंचेचा कोळ आणि गुळाचा वापर करू शकता. त्याने वेगळी चव येते.
हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट शेंगा डाळ अन् मिस्सी रोटी
कोथिंबीर वडी – प्रकार 2
साहित्य
- चिरलेली कोथिंबीर – 1 वाटी
- बेसन – आवश्यकतेनुसार
- हळद – 1 लहान चमचा
- चिंचेचा कोळ – 2-3 चमचे
- गूळ पावडर – 4 टी-स्पून
- मीठ – चवीनुसार
- तिळ – 1 चमचा
- आले – अर्धा इंच
- हिंग – लहान अर्धा चमचा
- लसूण – 5 पाकळ्या
- हिरव्या मिरच्या – आवश्यकतेनुसार
- चणाडाळ – 2 मोठे चमचे (भिजवून, पाणी न घालता वाटलेली)
- तेल – तळणापुरते
पुरवठा संख्या – चार जणांसाठी
एकूण वेळ – अर्धा तास
कृती
- चिरलेल्या कोथिंबिरीमध्ये मिरच्या, मीठ, हळद, हिंग घालून त्याचे वाटण करून घ्यावे.
- त्यात दोन-तीन चमचे चिंचेचा कोळ, चार चमचे गूळ पावडर, एक चमचा तिळ, चिमूटभर हिंग आणि वाटलेली डाळ घालून कालवून घेणे.
- त्यात मावेल तसे बेसन मिसळा.
- या कोथिंबीर वडीचे उंडे करून 20 मिनिटे वाफवून घ्या.
- गार झाल्यावर काप करून तळून घ्यावे.
हेही वाचा – Recipe : वेगळ्या चवीचे आंबट-गोड पंचामृत
टीप
- वाटलेली डाळ घातल्यामुळे वड्या खुसखुशीत होतात.
- पुदिन्याची किंवा कोथिंबीर-नारळाच्या चटणीबरोबर ही कोथिंबीर वडी खूप रुचकर लागते.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.