Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : खमंग भजी, दहिवडे, खुसखुशीत चकली बनवताना हे करून पाहा
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : खमंग भजी, दहिवडे, खुसखुशीत चकली बनवताना हे करून पाहा

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 1, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, दहिवडा, खुसखुशीत भजी, खमंग चकली, स्वादिष्ट डोसा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात –

    • भजी करताना जर पळीभर कढत तेलात अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला आणि मग ते तेल भज्यांच्या पिठात टाकले, तर भजी अतिशय खमंग आणि खुमासदार होतात.
    • भजी म्हटले की, तोंडाला पाणी सुटते; पण ही नवीन कांद्याची कुरकुरीत आणि स्वादिष्ट भजी करण्यासाठी अर्धा किलो कांदे असल्यास (उभे कापलेले) त्यात एक संपूर्ण पिकलेले केळे, एक मूठभर कोवळी मेथीची पाने, अर्धा मूठ आख्खे धणे आणि चिमूटभर ओवा, लाल तिखट तसेच मीठ अंदाजे घालावे. कांद्यात केळे बारीक कुस्करून सगळे साहित्य अर्धा तासभर ठेवावे. त्याला चांगला रस सुटेल. त्यात मावेल तेवढे जाडसर बेसन घालून नेहमीच्या भज्याच्या पिठाइतपत भिजवावे; पण खूप फेटावे आणि तळून स्वादिष्ट तसेच कुरकुरीत भजी, हिरव्या मिरचीच्या आंबडगोड चटणीबरोबर खावीत.

    हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड…

    • दहिवडे करावयास सोपे असले तरी, तयारी वेळखाऊ आणि कष्टदायक आहे. पुढीलप्रमाणे केल्यास दहा-पंधरा मिनिटांत ते तयार होतात. दोन वाट्या उडदाची डाळ आणि दोन वाट्या मुगाची मोगर डाळ (साल काढलेली) वेगवेगळी रात्री भिजत घालावी. (ज्यांना उडदाची डाळ आवडते, त्यांनी तीन वाटी उडीदडाळ आणि एक वाटी मूगडाळ घेतली तरी चालेल). सकाळी त्याचे पाणी पूर्ण काढून टाकावे आणि स्वच्छ फडक्यावर सावलीत पसरून ठेवावी. डाळ पूर्ण वाळली की, एकत्र करून मिक्सरमधून दरदरीत (साधारण जाडसर) पीठ काढावे आणि कोरड्या बरणीत भरून ठेवावे. ज्या वेळेस दहिवडे करावयाचे असतील, तेव्हा थोडे पीठ पातेलीत काढून त्यात किंचित मीठ आणि जिरेपूड घालावी तसेच भज्यांच्या पिठाप्रमाणे भिजवावे. फार घट्ट भिजवू नये आणि भज्याप्रमाणे तळून कोमट पाण्यात वडे घालावेत. घरात दही आणि जिरेपूड असतेच. देतेवेळी पाण्यातून वडे काढून दोन्ही तळहाताने दाबावेत आणि प्लेटमध्ये ठेवून वर दही, मीठ, तिखट, जिरेपूड घालावी.

    हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसा, छोले भटुरे, सॉफ्ट इडली, खमंग धिरडी…

    • डोशासाठी पीठ भिजवताना उडीदडाळ आणि तांदूळ समप्रमाणात भिजवून रात्री वाटून ठेवावे. दुसऱ्या दिवशी त्या पिठामध्ये एक वाटी रवा आणि थोडे गव्हाचे पीठ (4 चमचे) मिसळावे आणि दोन तासांनी डोसे करावेत. छान खरपूस रंग येतो आणि चवही चांगली लागते.
    • गोडाचे अथवा तिखटाचे पदार्थ उदा. सामोसे, कचोरी, सांजोरी, गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या इत्यादी तळायच्या आधी तव्यावर (थोड्या) भाजून घेतल्यास तेल वा तूप नेहमीपेक्षा खूप कमी तर लागतेच, शिवाय पदार्थ खुसखुशीत आणि हलका होतो. पदार्थांमध्ये तेल वा तूप उतरत नाही. (तथापि, पदार्थ भाजता येण्यासारखा हवा.)
    • भांड्यात भाजणीचे दोन वाट्या पीठ घ्यावे. तिखट-मीठ घालावे. तेल गरम करून घालताना तेलात थोडा खाण्याचा सोडा घालावा. नंतर तेल पिठात घालावे. पाण्यात पीठ भिजवावे. चकली करावी. चकलीला छान नळी पडते. चकली चांगली होते.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 22, 2026

    मध्यंतरी माझ्या वाचनात असे आले की, सुप्रसिद्ध चरित्रअभिनेत्री दिवंगत लीला मिश्रा या जेवताना पक्की रसोईतील…

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn