Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आत्मसन्मान

    September 24, 2026

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026

    निसर्गाची अलार्म सिस्टीम

    September 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, September 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » रुबाबदार व्यक्तिमत्व…
    फिल्मी

    रुबाबदार व्यक्तिमत्व…

    Team AvaantarBy Team AvaantarApril 27, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, विनोदखन्ना, मेरागावमेरादेश, मेरेअपने, अक्षयखन्ना, छावा, औरंगजेब
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मनोज जोशी

    दोन दिवसांपूर्वी युट्यूबवर शॉर्ट्स बघत असताना ‘कपिल शर्मा शो’मधील एक सीन दिसला. कपिल शर्माच्या समोर मौसमी चॅटर्जी आणि रीना रॉय बसल्या होत्या. एका पाठोपाठ एक असे प्रश्न कपिल विचारत होता आणि रीनाच्या आधी मौसमीच ते प्रश्न पटापट टोलावत होती. त्यात त्याने एक प्रश्न केला, असा कोणता हीरो होता की त्याला बघायला सर्वात जास्त गर्दी व्हायची. मौसमीने काका अर्थात राजेश खन्नाचं नाव घेतलं. तर, रीना लगेचच विनोद खन्ना म्हणाली…

    त्यावरून मला विनोद खन्ना गेला तो दिवस आठवला. 27 एप्रिल 2017… त्या दिवशी, ‘ती’बातमी अखेर खरी ठरली! महिन्याभरापूर्वी म्हणजेच मार्च 2017मध्ये विनोद खन्ना याच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेल्या, पण अतिशय किरकोळ शरीरयष्टीच्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ‘ब्लॅडर कॅन्सरमुळे आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या विनोद खन्ना या लोकप्रिय अभिनेत्याची अशी अवस्था झाल्याचे’ त्या फोटोबरोबर दिलेले असायचे. तर दुसरीकडे, ‘विनोद खन्ना ठीक आहे,’ याच्यापलीकडे त्याच्या कुटुंबीयांकडून कुठलाही खुलासा होत नव्हता. म्हणूनच त्या फोटोबद्दल साशंकता, संभ्रम कायम राहिला होता.

    शम्मी कपूर, देव आनंद यांचे चाहते असले तरी, अमिताभ, शशी कपूर आणि विनोद खन्ना यांचे चित्रपट बघतच आमची पिढी मोठी झाली. त्यामुळे विनोद खन्नाचे ‘ते’ छायाचित्र डोळ्यासमोरून हटत नव्हतं. अगदी कुठेही त्या फोटोबद्दल चर्चा सुरू झाली तर, अगदी ठामपणे मी सांगायचो, ‘छे, बिल्कुल नाही, तो विनोद खन्ना असणे शक्यच नाही !’ तरी मनाच्या कोपऱ्यात भीती होतीच! आणि त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली… त्या बातमीने ‘ते’छायाचित्र खरे होते, यावर विश्वास ठेवायला भाग पाडले. पण तो गेला, असं पुढील काही काळ म्हणवतंच नव्हते, मन मान्य करायलाच तयार नव्हते.

    हेही वाचा – थिंक पॉझिटिव्ह

    शांत, संयमी चेहरा असलेला हा अभिनेता सर्वांना धक्का देऊनच गेला. ‘अमर अकबर अँथनी’ सिनेमात ‘साला आपून..’ अशी भाषा बोलत प्रेक्षकांच्या शिट्या आणि टाळ्या मिळविणाऱ्या ‘अँथनी’(अमिताभ बच्चन) समोरील संयत अभिनयाने वेगळी छाप उमटवणारा ‘अमर’…, ‘हाथ की सफाई’मध्ये ‘बच्चे जिस स्कूल में तुम पढते हो, उस स्कूल का मैं प्रिन्सिपल रह चुका हूँ…, असं राजूला (रणधीर कपूर) सुनावणारा शंकर ऊर्फ कुमार…, ‘हेराफेरी’ चित्रपटात ‘ये वक्त की हेराफेरी हैं…’, असं म्हणत ‘चोरावर मोर’ ठरणारे विजय (अमिताभ) आणि अजय… ‘मेरे अपने’मधील छेनू (शत्रूघ्न सिन्हा) आणि श्यामची वरचेवर होणारी ठसन…, याच सिनेमातील ‘कोई  होता जिसको अपना…’ हे अजरामर गाणं… असे अनेक चित्रपट, गाणी कशी विसरता येणार?

    हीरोची पर्सनॅलिटी असतानाही खलनायकी भूमिकाही त्याने तेवढ्याच ताकदीने स्वीकारल्या. पण त्या माझ्यासारख्या अनेकांना पचनी पडल्या नाहीत, हे अलाहिदा! त्याची फिल्म करिअरची सुरुवातच खलनायकच्या भूमिकेने झाली. 1968मध्ये त्याचा पहिला सिनेमा ‘मन का मीत’ हा होता. ‘आन मिलो सजना’ या सिनेमातही त्याने खलनायकी भूमिका केली. पण दुसरा हीरो म्हणूनच मी त्याला त्या सिनेमात पाहिलं.

    2007मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रिस्क’ सिनेमातील त्याची खालिद बिन जमालची निगेटिव्ह भूमिका वेगळी छाप पाडून गेला. पण खलनायक म्हणून विनोद खन्नाची सर्वांत भावलेली भूमिका ‘मेरा गांव मेरा देश’ या चित्रपटातील. ‘जब्बर सिंग’ !! (आता या चित्रपटाचे कथानक ‘शोले’सारखेच आहे. हा चित्रपट 1971मध्ये प्रदर्शित झाला तर, शोले याच्या चार वर्षांनी म्हणजे 1975मध्ये).

    विनोद खन्नाने ‘जब्बर सिंग’डाकूची भूमिका दहशत निर्माण करणारी आहे. त्यात त्याच्यासाठी भाषेचा करण्यात आलेला वापरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हिंदी भाषेचा बाज सांभाळणारे संवाद त्याच्या तोंडी आहेत. गावच्या जत्रेत तो पोलिसांच्या हातातून निसटतो. त्यानंतर नक्की कोणी दगाबाजी केली, हे शोधण्याचा प्रयत्न करतो. आपल्या साथीदारांना एका रांगेत उभे करून सर्वांकडे संशयाने बघतो. तो विचारतो – ‘कौन है विश्वासघाती?’

    हेही वाचा – असंच काहीसं आवडलेलं…

    अशा रुबाबदार हीरोची झालेली दारूण स्थिती एका फोटोद्वारे समोर येणे आणि महिन्याभरातच त्याच्या मृत्यूची बातमी येऊन थडकणे; अशा परिस्थितीत ‘कौन है विश्वासघाती?’ असंच विचारावंसं वाटतं!

    हँडसम पर्सनॅलिटी अशी ओळख असलेला विनोद खन्ना काळाच्या पडद्यामागे जाऊन आठ वर्षं झाली. आता त्याचा मुलगा अक्षय खन्ना बॉलिवूडमध्ये आहे. वडिलांसारखी पर्सनॅलिटी नसली तरी, आपल्या संयत अभिनयाने वेगळेपण जपत आहे. ताल, दिल चाहता है, दृष्यम 2 या चित्रपटांतील त्याच्या भूमिकांनी वेगळी उंची गाठली आहे. तर, अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटातील त्याने साकारलेली औरंगजेबची भूमिका त्या सर्वांवर कळस ठरली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    माझ्या पोतडीतला मदन मोहन…

    September 20, 2026 फिल्मी

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026 फिल्मी

    ‘तहादेर कथा’… आदर्शांच्या मृत्यूची कथा

    September 13, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    माझ्या पोतडीतला मदन मोहन…

    By विशाल कुलकर्णीSeptember 20, 2026

    अकरावी-बारावीत असताना स्व. नानामामांच्या (आईचे मोठे बंधू) तोंडी पहिल्यांदा ‘रंग और नूर की बारात किसे…

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026

    ‘तहादेर कथा’… आदर्शांच्या मृत्यूची कथा

    September 13, 2026

    मन आनंद आनंद छायो… आत्मशोधाची संगीतमय अनुभूती

    September 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आत्मसन्मान

    September 24, 2026

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026

    निसर्गाची अलार्म सिस्टीम

    September 24, 2026

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा

    September 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 सप्टेंबर 2026

    September 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 447
    • अवांतर 214
    • आरोग्य 150
    • पंचांग आणि भविष्य 596
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 943
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आत्मसन्मान

    September 24, 2026

    अनोखी भाऊबीज

    September 24, 2026

    निसर्गाची अलार्म सिस्टीम

    September 24, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.