Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeअवांतरमजबूत, पण प्रेमळ टायसन

मजबूत, पण प्रेमळ टायसन

मंदार अनंत पाटील

ब्रुस हा लॅब्रेडॉर जातीचा अतिशय लाघवी, खट्याळ आणि माझ्यावर विलक्षण प्रेम करणारा कुत्रा होता. माझा लहानपणापासूनचा मित्र अमेय महाजनचा तो श्वान. 2017 साली पाच वर्षांनी मी भारतात आलो असताना एके दिवशी सहजच सकाळी सोसायटीबाहेरच पहिली भेट झाली. ब्रुस त्यावेळी जेमतेम चार महिन्यांचा असेल. पण अतिशय मस्तीखोर आणि खट्याळ होता. बघता क्षणीच आम्ही एकमेकांचे घट्ट दोस्त झालो. नंतर नंतर माझे वारंवार भारतात जाणे झाले.

भारतातून लंडनला परत आल्यावर आणखी एक दणकट पण तितकाच लाघवी असा टायसन (रोटवीलर जातीचा) श्वान मला भेटला. तो माझ्या लंडनमधील सोसायटीतील टिबोर नावाच्या मुलाने दत्तक घेतलेला साडेतीन वर्षांचा पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेला श्वान. पहिल्या भेटीत कोणालाही जरब बसेल असे रूप असलेला, अतिशय ताकदवान असा जबडा, काळभोर रंग आणि बैलाला पण सहज लोळवेल, अशी अचाट ताकद असणारा टायसन.

माझी आणि त्याची दोस्ती इतक्या सहज झाली की, टिबोरला देखील आश्चर्य वाटले. ब्रुससारखीच आमची जवळीक वाढली आणि माझ्या सुट्टीच्या दिवशी मी नित्यनेमाने त्याला फिरवायला नेऊ लागलो. यूकेमधील नियमांनुसार मी त्याला कधीही सुटं सोडून फिरवू शकलो नाही, पण केव्हाही संधी मिळेल तसे मी त्याला मोकळा सोडत असे आणी आम्ही दोघे हुंदडत असू. त्याला फिरवताना एकाच गोष्टीची सतत काळजी घ्यावी लागायची ती म्हणजे दुसरे श्वान. कारण टायसनला दुसऱ्या श्वानांवर आपली ताकद दाखवायची खुमखुमी होती. त्याच्या या स्वभावविशेषकरिता मी चोक चेन विकत आणली आणि मग बऱ्यापैकी नियंत्रण आले. पण शेवटी त्याची ताकद माझ्या तीनपट होती तरीही मी त्याच्या या स्वभावावर ताबा मिळवलाच.

टायसनदेखील ब्रुससारखाच लाघवी होता. मी दिसलो की, लगेच टिबोरला सोडून माझ्या मागे धाव घेई. टायसनमुळेच पल्लवीची कुत्र्याबाबतीतले गैरसमज आणि भीती बऱ्याच प्रमाणात कमी झाली. एकदा तर पल्लवीने आपणहून टायसनला बाहेर न्यायचे ठरविले आणि माझ्याबरोबरीने ती टायसनला फिरवायला आली.

हळूहळू पल्लवीच्या कुत्र्याच्या भीतीचे रुपांतर प्रेमात झाले आणि ती देखील तितक्याच उत्साहाने सहभागी होऊ लागली. साधारण 2020च्या सुमारास कोरोनाच्या काळात माझा हा सखा टिबोरबरोबर जर्मनीला निघून गेला आणी एक पर्व संपले. टिबोरबरोबर काहीच संपर्क नसल्यामुळे टायसन जिथे कुठे असेल तिथे सुखी राहावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!