दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 09 आषाढ शके 1947
अर्थात,
दिनांक : 30 जून 2025, वार : सोमवार, तिथि : पंचमी 09:23, नक्षत्र : मघा 07:20
योग : सिद्धी 17:19, करण : कौलव 21:45
सूर्य : मिथुन, चंद्र : सिंह, सूर्योदय : 06:03, सूर्यास्त : 19:19
पक्ष : शुक्ल, मास : आषाढ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
कुमार षष्ठी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कामात चांगले परिणाम मिळतील. कामाचा आणि वर्तनाचा इतरांवर सकारात्मक परिणाम होईल. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर, व्यवसायाशी संबंधित क्षेत्रातील लोकांचा सल्ला नक्की घ्या.
वृषभ – जे जातक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत,, त्यांना उत्तम संधी चालून येईल. नोकरदार व्यक्तींना चांगल्या कामासाठी पगारवाढ मिळू शकते. नवीन गोष्टी शिकण्यातला उत्साह वाढेल.
मिथुन – एखाद्या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या लोकांकडून उत्तम मार्गदर्शन मिळेल. मात्र अंतिम निर्णय विचारपूर्वक घ्या. व्यवसायातील नवीन आव्हानांचा सामना करावा लागेल. याशिवाय कामात सातत्य राखा, यामुळे लोक जोडलेले राहतील आणि पैशाची आवक वाढेल.
कर्क – प्रत्येक कामात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आर्थिक बाबींची विशेष काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी प्रेमाने वागा, यामुळे नात्यातील गोडवा वाढेल.
सिंह – कामाच्या निमित्ताने प्रवासाची शक्यता आहे. वरिष्ठांकडून तुमचे विचार दडपण्याचा प्रयत्न होईल, त्यामुळे सावधपणे संवाद साधा. मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. या राशीच्या महिला जातकांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
कन्या – कार्यालयीन मीटिंगदरम्यान तुमचा शब्द अंतिम असेल. अतिशय उत्तम प्रेझेंटेशन दिले जाईल. सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित जातकांना चांगल्या ब्रँडसाठी काम करण्याची संधी मिळू शकते, त्यातून उत्तम धनलाभ होईल.
तुळ – कार्यालयात वरिष्ठांशी खटके उडू शकतात त्यामुळे शक्यतो बोलणे टाळा. व्यावसायिक गोष्टींमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. घरासाठी काही आवश्यक वस्तू देखील खरेदी कराल. मात्र, आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन पावले उचला.
वृश्चिक – जीवनात आमूलाग्र बदल करण्याचा विचार कराल. त्याबद्दल परिवारातील सदस्यांशी चर्चा कराल. कला क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला असेल. प्रत्येकजण आर्थिक मदत करायला तयार असेल.
धनु – आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. व्यापारी वर्गाची रखडलेली कामे वेगाने पुढे जातील. वकिलांना एखाद्या महत्त्वाच्या प्रकरणात यश मिळेल. जमिनीच्या एखाद्या जुन्या व्यवहारामुळे फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना करिअरशी संबंधित काही समस्यांना तोंड द्यावे लागेल.
मकर – वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याने काम करणे उत्तम. एखादा ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घ्याल, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. पैशांच्या बाबतीत जोडीदाराच्या मदतीची गरज भासेल. एखाद्या नातेवाईकाशी सुरू असलेला वाद मिटेल.
कुंभ – व्यक्तिमत्त्वाला साजेसे काम करण्याची संधी मिळेल. थोडी मोठी प्रसिद्धी मिळू शकेल. विद्यार्थी एखादे काम पूर्ण करण्यासाठी वडीलधाऱ्यांची मदत घेतील, जेणेकरून काम चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल. कुटुंबातील महत्त्वाची कार्ये पूर्ण झाल्याने मन आनंदी होईल.
मीन – इंजिनीअरिंगशी निगडीत नोकरी करणाऱ्या जातकांना व्यवसायात पदोन्नतीची संधी मिळेल. इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित कामात चांगला नफा मिळेल. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती उत्तम असेल. वैवाहिक जीवनात परस्पर विश्वासामुळे संबंध दृढ होतील. जुन्या मित्रांसोबत सहलीचे नियोजन करू शकता.
दिनविशेष
दादाभाई नौरोजी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक, अर्थतज्ज्ञ दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 रोजी झाला. 1850मध्ये एलफिन्स्टन महाविद्यालयात गणित आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होणारे ते पहिलेच भारतीय. 1865 मध्ये त्यांनी लंडन येथे ‘लंडन इंडिया सोसायटी’ स्थापन केली. 1875 मध्ये मुंबई पालिकेचे सदस्य, तर गव्हर्नर रे यांच्या निमंत्रणावरून 1885मध्ये मुंबई विधान परिषदेचे सदस्य झाले. दादाभाई नोरोजी यांना तीन वेळा काँग्रेस अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. स्त्री-पुरुष समानता आणि स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या दादाभाईंनी ‘ज्ञानप्रकाश’ या गुजराथी मासिकाचे संपादन केले. भारतीय राज्यशास्त्राचे आणि अर्थशाखाचे जनक असणाऱ्या नौरोजी यांचा ‘पॉव्हर्टी अॅण्ड ब्रिटिश रूल इन इंडिया’ हा ग्रंथ विशेष गाजला. त्यांचे 30 जून 1917 रोजी मुंबई येथे निधन झाले.