दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 29 डिसेंबर 2025; वार : सोमवार
- भारतीय सौर : 08 पौष शके 1947; तिथि : नवमी 10:12; नक्षत्र : रेवती, अश्विनी 07:40, 30:04
- योग : परिघ, शिव 07:35, 28:30; करण : तैतिल 21:05
- सूर्य : धनु; चंद्र : मीन 07:40; सूर्योदय : 07:09; सूर्यास्त : 18:09
- पक्ष : शुक्ल; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. व्यवसायात फायदा होईल. कुटुंबात शुभ घटना घडतील. एखाद्या धार्मिक तीर्थयात्रेला जाऊ शकता. मात्र विरोधकांपासून सावध रहा. प्रियजनांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल, त्यामुळे एखादे मोठे काम पूर्ण होऊ शकते.
वृषभ – एखादा नवीन उपक्रम सुरू करू शकता. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. मित्र आणि नातेवाईकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. कुटुंबासह एखाद्या सहलीला जाऊ शकता. एखाद्या खास व्यक्तीशी भेट झाल्याने व्यवसायासाठी नफ्याचे नवीन मार्ग उघडतील.
मिथुन – मन शांत आणि आनंदी असेल. तुमच्या अथक प्रयत्नांमुळे प्रलंबित कामे पूर्ण करण्यास मदत होईल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.
कर्क – आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. नोकरीच्या ठिकाणी एखादा मोठा निर्णय घेऊ शकता, ज्याचा तुमच्या जीवनावर कायमचा परिणाम होईल. आर्थिक परिस्थिती जरा डळमळीत असेल, मात्र मित्रांकडून आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या सहकाऱ्यांकडून आर्थिक मदत मिळेल. व्यवसायात एखादा नवीन प्रकल्प सुरू करू शकता.
सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. मात्र एखाद्या खास व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला व्यवसाय आणि इतर क्षेत्रात फायदा होईल. आज एक नवीन मोठा प्रकल्प देखील सुरू करू शकता. सहकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. कुटुंबात शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. नवीन घर किंवा मालमत्ता यांची खरेदी करू शकता.
कन्या – मन अस्वस्थ राहील. एक अज्ञात भीती कायम मनात राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडू शकते. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या विक्षिप्त वागण्याने तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. कुटुंबातील वातावरण प्रतिकूल असेल.
तुळ – स्वतःच्या आरोग्याबद्दल थोडीशी चिंता वाटेल. लांबचा प्रवास संभवतो. एखाद्या विशिष्ट कामासाठी विरोधकांसमोर झुकावे लागू शकते. तथापि, व्यवसायात नफा दिसून येईल. एखादा नवीन उपक्रम सुरू करू शकता. कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.
वृश्चिक – व्यावसायिक भागीदारांकडून अधिक पाठबळ मिळेल. एखादा मोठा प्रकल्प सुरू करू शकता. अर्थात, त्यात अडथळे नक्कीच येतील, त्याचा विचार करून पुढील पावले उचला. बोलण्यावर संयम ठेवा. पालकांची तब्येत अचानक बिघडू शकते.
हेही वाचा – योग आणि आयुर्वेद या एकाच वैदिक ज्ञानाच्या शाखा
धनु – दिवस अतिशय चांगला असेल. प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने आनंदी व्हाल. एखादा जुना मित्र भेटू शकेल. एखादा नवीन प्रकल्प सुरू करू शकता. कुटुंबात एखाद्या व्यक्तीच्या लग्नाच्या प्रस्तावाला अंतिम रूप मिळेल. जोडीदाराकडून तुम्हाला पाठिंबा आणि प्रेम मिळेल.
मकर – दिवस धावपळीचा असेल. एखादा नवीन प्रकल्प सुरू करू शकता, ज्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागू शकते. व्यवसाय सहकारी मदतीचा हात पुढे करतील. मित्रांकडून आर्थिक मदत मिळू शकते. कुटुंबात पाहुण्यांचे आगमन होऊ शकते.
कुंभ – दिवस खूप चांगला असेल; नियोजित कामे पूर्ण होतील. मात्र, गाडी चालवताना काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे आरोग्य बिघडू शकते. तुम्हाला व्यवसायात लक्षणीय यश मिळू शकते. रखडलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. कामाच्या ठिकाणी मोठी भागीदारी होऊ शकते. कुटुंबात शुभ घटना घडतील, ज्यामुळे तुमच्याबद्दलचा आदर आणि सन्मान वाढेल.
मीन – ज्या प्रकल्पावर काम करत आहात त्यात व्यत्यय येऊ शकतो. विरोधी पक्ष तुम्हाला कामावर देखील त्रास देऊ शकतात. तुमचेही सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. व्यवसायात घसरण होऊ शकते. आरोग्य सामान्य राहील. मालमत्तेवरून कुटुंबात मतभेद होऊ शकतात.
दिनविशेष
प्रख्यात मराठी गायकनट दीनानाथ मंगेशकर
टीम अवांतर
मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्ण युगातील एक प्रतिभावंत शिल्पकार आणि प्रख्यात गायकनट दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म गोव्यातील मंगेशी येथे 29 डिसेंबर 1900 रोजी झाला. दीनानाथ यांना उपजतच खणखणीत, सुरेल आणि असामान्य आवाज तसेच अस्खलित वाणी लाभली होती. बालपणीच त्यांचा नावलौकिक ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’सारख्या श्रेष्ठ नाट्यसंस्थेच्या चालकांच्या कानावर गेला. त्यामुळे केवळ चौदा वर्षांच्या दीनानाथांना बालगंधर्वांसारख्या अलौकिक गायकनटाची जागा भरून काढण्यासाठी पाचारण करण्यात आले. किर्लोस्कर मंडळीच्या ताजे वफा, काँटों में फूल यासारख्या हिंदी-उर्दू नाटकांतील दीनानाथांच्या संगीत भूमिका विलक्षण लोकप्रिय ठरल्या. आपल्या विशाल, पाणीदार नेत्रांच्या आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने, निर्भर अशा मुक्त गायनाने त्यांनी रंगभूमी गाजवली. अच्युतराव कोल्हटकरांनी दीनानाथांना ‘मास्टर’ हे उपपद लावले.
मास्टर दीनानाथ हे ‘बलवंत संगीत मंडळी’चे प्रमुख मालक-भागीदार होते. या नाटक मंडळीने मनोरंजनाबरोबरच बोध, देशभक्ती, समाजसुधारणा यांचे दर्शन घडवणारी राम गणेश गडकरी, वीर वामनराव जोशी, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव शास्त्री खरे, विश्राम बेडेकर यांसारख्या अग्रगण्य नाटककारांची नवनवीन नाटके रंगभूमीवर आणली. तसेच जुनी गाजलेली नाटकेदेखील बलवंतच्या रंगभूमीवर होत असत. ‘गंधर्व’ आणि ‘ललितकलादर्श’ अशा प्रस्थापित नाटक मंडळींबरोबर बलवंतने स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले. दीनानाथांच्या सुरुवातीच्या ‘किंकिणी’ आणि पुढे ‘कालिंदी’ (पुण्यप्रभाव) ‘लतिका’ (भावबंधन) ‘पद्मावती’ (उग्रमंगल) ‘तेजस्विनी’ (रणदुंदुभी), वेगळ्या घाटणीचा ‘धैर्यधर’ (मानापमान) ‘सुलोचना’ (संन्यस्त खड्ग) ‘गोतम’ (ब्रह्मकुमारी) ‘शिवांगी’ (राजसंन्यास) यांसारख्या स्त्री-पुरूष भूमिका तसेच त्यांची वेगळ्या शैलीची तडफदार गाणी नाट्यरसिकांना वेड लावून गेली. दीनानाथांच्या गाण्यांतून आणि अभिनयातून वीर, शृंगार, शांत हे रस प्रामुख्याने प्रत्ययास येत.
नाट्यगीतांप्रमाणे शास्त्रोक्त संगीतही दीनानाथ उत्तम प्रकारे, स्वतःच्या स्वतंत्र आणि कल्पक वळणाने गात असत. त्यांनी नाट्यसंगीतात पंजाबी ढंग प्रथम आणला, असे मानले जाते. गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांचे ते गंडाबंद शागीर्द होतो. मात्र इतर अनेकांची गायकी आत्मसात करून त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली घडवली.
हेही वाचा – Thanks… कोणी कोणाला म्हणायचं!
1934 मध्ये ’बलवंत पिक्चर कॉर्पोरेशन’ या कंपनीची स्थापना करून त्यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. कृष्णार्जुन युद्ध हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यात त्यांनी अर्जुनाची भूमिका केली. ‘सुहास्य तुझे मनासि मोही’ यासारखी या चित्रपटातील गाणी अतिशय आजही रसिकप्रिय आहेत.
सुप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर, आशा भोसले, मीना खडीकर, उषा आणि हृदयनाथ या सर्वांच्या गळ्यात ‘दीनानाथांचा सूर’ आहे. दीनानाथांचे कावीळ, जलोदराच्या विकाराने 24 एप्रिल 1942 रोजी पुण्यात निधन झाले.


