Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 ऑगस्ट 2026

    August 24, 2026

    Bookshelf : आनंदाचे बालपण देता येते, स्पष्ट करणारे ‘चीपर बाय द डझन’

    August 24, 2026

    दोन स्पेशल

    August 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, August 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » योग आणि आयुर्वेद या एकाच वैदिक ज्ञानाच्या शाखा
    आरोग्य

    योग आणि आयुर्वेद या एकाच वैदिक ज्ञानाच्या शाखा

    डॉ. प्रिया गुमास्तेBy डॉ. प्रिया गुमास्तेDecember 27, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, आयुर्वेद, योग, योग दिन, अष्टांग योग, ऋषी पतंजली, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य, प्राणायाम, आयुर्वेद आणि योग
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “आजी,  तुला माहिती आहे, आम्ही स्कूलमध्ये  उद्या mats घेऊन जाणार आहोत… आम्ही योगा करणार आहोत…” समीर उत्साहात म्हणाला. 

    “योगा नाही रे, योग म्हणावे,”  आजीने समीरला  समजावले. 

    “योग  नाही गं, मी  योगा बद्दल  सांगतोय.  These are the kind of exercises that we do on mats. ते तुला माहीत नसेल,” समीर स्वतःचे म्हणणे सोडायला तयार नव्हता.

    “अरे बाळा, हे योग माझ्यापेक्षाही खूप खूप जुने आहे आणि हे exercises फक्त त्याचा एक भाग आहेत,” आजी समीरला म्हणाली… “ये सांगते तुला.”

    योग शब्द हा संस्कृत शब्द ‘यजु’पासून आला आहे. ज्याचा अर्थ  जोडणे किंवा एकत्र करणे आहे. जरी हा शब्द विविध अर्थांमध्ये वापरला जाऊ शकतो, तरी याज्ञवल्क्य स्मृतीनुसार त्याचा अर्थ “संयोगो योग इत्यक्तो जीवात्मा – प्रमात्मानो” असा होतो. आत्म्याला देवाशी किंवा परमात्म्याशी जोडणे म्हणजे योग. 

    योग आणि आयुर्वेद 

    योग आणि आयुर्वेद या एकाच महान वैदिक ज्ञानाच्या दोन परस्परसंबंधित शाखा आहेत. एकाच वैदिक शास्त्राचा आधार  असल्याने त्यांच्यात समान मूलभूत तत्वे आणि श्रद्धा आहेत. योग मन, शरीर आणि आत्मा यांच्या सुसंवादाशी संबंधित आहे तर, आयुर्वेद आहार आणि जीवनशैलीतील बदलांच्या माध्यमातून व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक कल्याणाची काळजी घेतो. योगाचा उद्देश विविध शारीरिक आसनांद्वारे शरीराचे संतुलन साधणे, प्राणायामाद्वारे मन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे आणि शेवटी आत्मा हीच खरी चेतन ऊर्जा आहे, हे सत्य समजून घेणे आहे. 

    योगाचे महत्त्व आचार्य चरक यांनी शरीर स्थानात सांगितले आहे की, 

    मोक्षे निवृत्तिनिरशेष योग मोक्ष प्रवर्तकम् ||

    म्हणजे योगामुळे सर्व वेदना कमी होतात!

    प्राचीन वेद ऋग्वेदात सुद्धा योग क्रियेचे उल्लेख आढळतात. योग आणि आयुर्वेद एकमेकांना पूरक आहेत. योग करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या घटनेनुसार विशिष्ट आयुर्वेदिक आहार आणि पथ्ये पाळली पाहिजेत. त्याचप्रमाणे, आयुर्वेदिक आहार आणि पथ्ये पाळणाऱ्या व्यक्तीने निरोगी राहण्यासाठी नियमितपणे योगाचा सराव केला पाहिजे. 

    अष्टांग योग

    महान ऋषी पतंजली यांनी त्यांच्या पतंजल योग सूत्र या ग्रंथात योगविषयी मार्गदर्शन केले आहे. यामध्ये त्यांनी योगाला आठ अंग किंवा शाखा मार्ग म्हणून मांडले आहे. म्हणूनच त्यास अष्टांग योग असे म्हणतात. ही आठ अंगे पुढीलप्रमाणे – 

    1. यम – पाच सामाजिक नीतिमूल्ये

    • अहिंसा – कृती, वाणी आणि विचारांमध्ये अहिंसा
    • सत्यम – नेहेमी खरे बोलावे, वागावे. 
    • अस्तेय – चोरी न करणे
    • ब्रह्मचर्य – दैवी आचरण, अविवाहित असताना  ब्रम्हचारी रहाणे. 
    • अपरिग्रह – अनावश्यकपणे वस्तूंचा संग्रह न करणे आणि इतरांच्या मालकीच्या वस्तूंची इच्छा न करणे. 

    2. नियम – पाच वैयक्तिक नीतिमूल्ये

    • शौच – शरीर आणि मनाची स्वच्छता.
    • संतोष – समाधानी, आनंदी राहणे.
    • तप – तपस्या आणि स्वतःला शिस्त लावून घेणे. 
    • स्वाध्याय – आत्म्याचा अभ्यास
    • ईश्वरप्रणीधान – देवाला शरण जाणे, देवाचा आदर करणे.

    3. आसने – योगासने

    योगासने करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते. तसेच, मानसिक ताणतणाव कमी होणे, लक्ष केंद्रित करण्यात मदत होणे आणि चांगली झोप  लागणे यासारखे महत्त्वपूर्ण मानसिक फायदे होतात. 

    योगासने समग्र शरीराचे आणि मनाचे बळ वाढवतात, चांगले रक्ताभिसरण, हृदयाचे आरोग्य वाढवणं आणि वजन व्यवस्थापनात योगदान देतात.

    हेही वाचा – Ayurveda : दिनचर्या… सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचे आचरण

    4. प्राणायाम – विशिष्ट श्वसन तंत्रांद्वारे प्राणशक्तीचे (प्राणाचे) योग्य नियमन

    असे मानले जाते की, तुम्ही तुमच्या श्वासाचे नियमन करून तुमच्या मनाची शक्ती नियंत्रित करू शकता. प्राणायाम किंवा योगिक श्वासोच्छवासामुळे मानसिक ताणतणाव कमी होणे, फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारणे, रक्तदाब कमी होणे, चांगली झोप येणे, लक्ष केंद्रित करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढणे, पचन सुधारणे, चिंता कमी होणे, धूम्रपान सोडण्यास मदत होणे आणि एकूणच मन-शरीर संतुलन राखण्यास मदत होणे असे फायदे मिळतात.

    5. प्रत्याहार

    या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे, प्रति म्हणजेच विरुद्ध वा दूर करणे आणि आहार म्हणजेच अन्न/ सेवन. बाहेरील जगातून आपण काय ग्रहण करतो, यावर नियंत्रण आणणे म्हणजे प्रत्याहार. 

    6. धारणा

    लक्ष एकाग्र करणे, याला धारणा म्हणतात.

    7. ध्यान

    ध्यान हा शब्द ‘धी’ म्हणजेच बुद्धी आणि यान म्हणजेच ग्रहण करणे यापासून बनला आहे.

    8. समाधी

    चेतनेची सर्वोच्च अवस्था. ध्यानादरम्यान हे साध्य करणे शक्य आहे.

    आपल्याला जाणवले असेलच की, योग केवळ शारीरिक आसन आणि तंदुरुस्तीपुरताच मर्यादित नाही. 

    आधुनिक युग आणि योग 

    आधुनिक युगात योग हा वैद्यकीय शास्त्राची एक शाखा म्हणून विकसित झाला आहे. सध्याच्या ताणतणावांनी भरलेल्या आयुष्यात याचे महत्त्व अजूनच वाढले आहे. दरवर्षी 21 जून रोजी ‘योग दिन’ साजरा केला जातो, हा उत्तर गोलार्धातील  (Northen Hemisphere) सर्वात मोठा दिवस असतो. प्रकाश, ऊर्जा आणि भारतीय परंपरेतील दक्षिणायन  संक्रमणाच्या सुरुवातीचे प्रतीक म्हणजे हा दिवस आहे.

    हेही वाचा – Ayurveda : दिनचर्या… स्नान ते शयन!

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही  तारीख  ‘आंतरराष्ट्रीय  योग  दिवस’ साजरा करण्यासाठी प्रस्तावित केली आणि संयुक्त राष्ट्रांनी त्यास मान्यता दिली. योगाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी असलेल्या सर्वांगीण फायद्यांविषयी जागतिक जागरूकता निर्माण करण्यासाठी, तसेच प्राचीन भारतीय परंपरेतून मिळालेल्या एकता, सुसंवाद आणि संतुलित जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो. आपणही जर योगाभ्यास आपल्या दिनचर्येत समाविष्ट केला तर, या तणावग्रस्त जीवनात शारीरिक आणि मानसिक स्वस्थता राखण्यासाठी नक्कीच मदत होईल.

    Avatar photo
    डॉ. प्रिया गुमास्ते

    डॉ. प्रिया गुमास्ते मुंबई विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी (B.A.M.S.) या पदवी परीक्षेत तृतीय क्रमांक. एम्.डी. (ए.एम्) आणि सी.जी.ओ. पदवीप्राप्त. 1999 सालापासून गेली 26 वर्षे देशात आणि परदेशात कॅन्सर कन्सलटन्ट आणि आयुर्वेदिक फिजिशियन म्हणून कार्यरत.

    Related Posts

    भूक लागत नाही?

    August 19, 2026 आरोग्य

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    August 15, 2026 आरोग्य

    हिथ लिजर आणि आपण

    August 12, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    भूक लागत नाही?

    By डॉ. प्रज्ञावंत देवळेकरAugust 19, 2026

    “डॉक्टर, भूकच लागत नाहीये,” ओपीडीत आल्या आल्या बसण्याआधीच पेशंटनं तक्रार केली. आपल्याकडं हे असं मोघम…

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    August 15, 2026

    हिथ लिजर आणि आपण

    August 12, 2026

    व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 ऑगस्ट 2026

    August 24, 2026

    Bookshelf : आनंदाचे बालपण देता येते, स्पष्ट करणारे ‘चीपर बाय द डझन’

    August 24, 2026

    दोन स्पेशल

    August 23, 2026

    कहाणी जुम्मन चाचा आणि गावकऱ्यांची!

    August 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    August 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा

    August 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 405
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 547
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 870
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 ऑगस्ट 2026

    August 24, 2026

    Bookshelf : आनंदाचे बालपण देता येते, स्पष्ट करणारे ‘चीपर बाय द डझन’

    August 24, 2026

    दोन स्पेशल

    August 23, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.