दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 27 नोव्हेंबर 2025; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 06 अग्रहायण शके 1947; तिथि : सप्तमी 24:29; नक्षत्र : धनिष्ठा 26:31
- योग : ध्रुव 12:08; करण : गरज 12:20
- सूर्य : वृश्चिक; चंद्र : मकर 14:06 ; सूर्योदय : 06:51; सूर्यास्त : 17:59
- पक्ष : शुक्ल; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल राहील. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. भावंडांकडून एखाद्या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे. तब्येतीच्या तक्रारी राहतील. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील. मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना, याकडे लक्ष द्या.
वृषभ – सोपी पद्धत आणि समन्वय यामुळे कामात प्रगती कराल. कुटुंबीयांच्या गरजांना प्राथमिकता द्या. सुसंवाद साधण्याचे प्रयत्न फायदेशीर ठरतील. समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. व्यवसायासाठी केलेल्या प्रवासामुळे दीर्घकालीन परिणाम मिळतील. कामातील अडथळे दूर कराल. एकंदर आरोग्य चांगले असेल.
मिथुन – नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. कामात सुलभतेने प्रगती करता येईल. प्रवासाचे फलदायी परिणाम मिळतील. परस्पर संवादातून काम साध्य करण्याचे प्रयत्न फायदेशीर ठरतील. कुटुंबातील सदस्यांचा मोठा पाठिंबा मिळेल. तथापि, अतिखर्चिक जीवनशैलीमुळे घरात तणावाचा सामना करावा लागेल.
कर्क – वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. सौदेबाजी करून व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणे, हा पर्याय योग्य नाही. नैतिक मर्यादांमध्ये राहा. योग्य वेळेची वाट पाहा. सरकारी कामामुळे फायदा होईल. तुम्हाला भूतकाळातील चुकांबद्दल पश्चात्ताप होईल. वैवाहिक जीवन आनंददायी असेल. नफ्याचा मार्ग हळूहळू मोकळा होईल.
सिंह – चांगले उत्पन्न मिळेल. संततीच्या प्रगतीची शक्यता आहे. जोडीदार आणि मुलांकडून पाठिंबा मिळेल. जुन्या सवंगड्याची भेट होईल. विवेकाने वागा. शत्रूंपासून सावध राहा. आत्मविश्वास वाढेल. इच्छित कामे यशस्वी होतील. प्रवासाची शक्यता आहे. कला आणि नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील.
हेही वाचा – विषाची परीक्षा…
कन्या – आज नशीबाची मोठी साथ मिळणार आहे. कुटुंबाचा पाठिंबा आणि समन्वय यामुळे कामाचा डोंगर हातावेगळा करणे सोपे जाईल. व्यवसायात नवीन समन्वय आणि सहकार्य विकसित करा. गोड बोलणाऱ्यांपासून मात्र सावध रहा. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो.
तुळ – आज जोडीदारासोबत किंवा मित्रांसोबत एकत्र काम करणे फायदेशीर ठरेल. पूर्वनियोजित कार्यक्रम सुरळीतपणे पूर्ण होतील. जोखीम टाळणे शहाणपणाचे ठरेल. सौदेबाजी करून कामाच्या वाटाघाटी करणे सध्याच्या काळात योग्य नाही. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करणे उत्तम. वरिष्ठांच्या मर्जीमुळे कामच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील.
वृश्चिक – नफ्यात अनपेक्षित वाढ निश्चित आहे, परंतु नकारात्मक दृष्टिकोन टाळा. आशा आणि उत्साहामुळे तुमची क्षमता वाढेल. आरोग्य ठीक राहील. समाजात आदर वाढेल. उत्पन्न आणि खर्च समान राहतील. व्यवसायाकडे लक्ष दिल्याने यश मिळेल. आज महत्त्वाच्या व्यक्तींशी भेटीगाठी होतील.
धनु – आज आर्थिक स्थिती मजबूत राहील. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल. व्यवसाय आणि नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल राहतील. चांगल्या कृतींचे सकारात्मक परिणाम मिळतील. भरपूर कामे होतील. व्यावसायिक समृद्धी शक्य आहे, त्यामुळे आनंद वाढेल. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक कार्यांमध्ये रस निर्माण होईल.
मकर – अतिकामाचे वेळापत्रक तुमच्या आराम आणि विश्रांतीवर परिणाम करेल. प्रियजनांना भेटण्याची संधी मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. मान्यवरांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. योग्य लोकांसमोर तुम्ही तुमची कौशल्ये आणि बुद्धिमत्तेची चुणूक दाखवलीत तर, सार्वजनिक प्रतिमा अधिक चांगली बनेल. प्रवासाचे फलदायी परिणाम होतील.
कुंभ – सावधगिरीने काम करा. शक्य होईल तितकेच काम हाती घ्या. सध्या व्यवसायाशी संबंधित प्रवास पुढे ढकला. उत्पन्न आणि खर्च तेवढाच राहील. तथापि, काही आर्थिक अडचणी येऊ शकतात. हितचिंतक मानले जाणारे लोक पाठीमागे तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. आज आरोग्याच्या तक्रारी राहतील.
हेही वाचा – नावात काय आहे?
मीन – वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा मिळेल. व्यावसायिक प्रवास पुढे ढकलू नका. शैक्षणिक कामे सहज पूर्ण होतील. व्यवसायावर लक्ष केंद्रित केल्याने यश मिळेल. कष्ट घेऊन केलेल्या कामांची योग्य दखल घेतली जाईल. काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ होईल. तथापि, एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
दिनविशेष
ख्यातनाम मराठी कथाकार दि. बा. मोकाशी
टीम अवांतर
ख्यातनाम मराठी कथा-कादंबरीकार दिगंबर बाळकृष्ण म्हणजेच दि. बा. मोकाशी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1915 रोजी रायगड जिल्ह्यातील उरण येथे झाला. विविध अनुभूतींतून माणूस शोधण्याचा, व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न हे त्यांच्या कथालेखनाचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. रहस्यकथा, पिशाच्चकथा असे कथाप्रकारही त्यांनी हाताळले आहेत. याखेरीज, कादंबरी लेखन, प्रवास वर्णने, बालसाहित्य, अनुवादित लेखन अशा क्षेत्रांमध्ये देखील त्यांनी मुशाफिरी केली. ‘लामणदिवा’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. यात त्यांची प्रयोगशीलता जाणवते. त्यानंतर आलेल्या कथामोहिनी या कथासंग्रहातील कथांनी खूपच पुढचा टप्पा गाठला आहे, हे लक्षात येते. याशिवाय, आमोद सुनासि आले, वणवा, चापलूस, एक हजार गायी, आदिकथा, माऊली, तू आणि मी हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेण्याचे त्यांचे सामर्थ्य गोष्टीची मोहिनी, रहस्यकथेचा एक दिवस यासारख्या कथांमधून दिसून येते. स्थलयात्रा, पुरुषास शंभर गुन्हे माफ, देव चालले, आनंद ओवरी, वात्स्यायन या कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. पालखी आणि अठरा लक्ष पाऊले ही त्यांची प्रवासवर्णनपर पुस्तके आहेत. पण त्यांत प्रवासवर्णनापेक्षा समाजजीवनाचा शोध घेण्यावर अधिक भर दिसतो. अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या फॉर व्हूम द बेल टोल्स ह्या प्रसिद्ध कादंबरीचा घणघणतो घंटानाद या नावाने त्यांनी केलेला अनुवाद उल्लेखनीय आहे. संध्याकाळचे पुणे हे त्यांचे अखेरचे पुस्तक. मोकाशी यांना संध्याकाळच्या पुण्याची जी विविध रूपे दिसली, त्यांचे लालित्यपूर्ण दर्शन त्यांनी या पुस्तकात घडविले आहे. 29 जून 1981 रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.


