दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 22 ऑगस्ट 2025; वार : शुक्रवार
भारतीय सौर : 31 श्रावण शके 1947; तिथि : चतुर्दशी 11:55; नक्षत्र : आश्लेषा 24:16
योग : वरियान 14:34; करण : चतुष्पाद 23:41
सूर्य : सिंह; चंद्र : कर्क 24:16; सूर्योदय : 06:21; सूर्यास्त : 19:01
पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
पोळा
दर्श अमावास्या (प्रारंभ सकाळी 11:55) / पिठोरी अमावास्या
मातृदिन
जिवंतिका पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी काम सामान्य गतीने पूर्ण होईल. मात्र कामाच्या ठिकाणी नकारात्मक परिस्थिती उद्भवली तर गोड बोलण्याने आणि वागण्याने ती हाताळावी लागेल. याशिवाय प्रलंबित कामेही हळूहळू पूर्ण होऊ लागतील. जोडीदाराकडूनही पूर्ण पाठिंबा मिळेल. काही प्रियजनांच्या भेटी होण्याची शक्यता आहे.
वृषभ – कामाच्या ठिकाणी दिवस शांततेत आणि समाधानात व्यतीत होईल. राजकारणाशी संबंधित जातकांना प्रयत्नांमध्ये यश मिळेल. सरकार आणि सत्तेशी चांगली मैत्री असल्याचा संपूर्ण फायदा मिळेल. नोकरी करणाऱ्यांना नवीन करारांद्वारे उच्च पद मिळू शकते आणि त्यांची प्रतिष्ठा देखील वाढेल. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते.
मिथुन – कामाच्या ठिकाणी मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा. अन्यथा, काहीतरी गहाळ होण्याची किंवा चोरीला जाण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या बाबतीत, काही प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तसेच कामाच्या निमित्ताने प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. संतती एखाद्या शैक्षणिक प्रकल्पात किंवा स्पर्धेत यशस्वी होईल.
कर्क – दिवस चांगला जाईल. एखाद्या मालमत्तेतून फायदा मिळू शकेल. व्यवसायासाठी केलेले प्रवास यशस्वी होतील. जीवनात यश मिळवण्याचे नवीन मार्ग सापडतील. प्रियजनांकडून काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. कुटुंबासाठी संततीने केलेल्या एखाद्या कामामुळे मनाला शांतता लाभेल.
सिंह – नोकरदारांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे मन आनंदी असेल. कामाच्या ठिकाणी गोड बोलणे आणि वागण्यामुळे आदर वाढेल. त्याच वेळी, विरोधकांची रणनीती देखील अपयशी ठरेल. विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धेतही विशेष यश मिळू शकेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. मात्र, डोळ्यांशी संबंधित एखादी समस्या त्रास देऊ शकते.
कन्या – दिवस चांगला जाईल. व्यवसायातील प्रयत्नांना अकल्पनीय यश मिळेल. यामुळे मनापासून आनंद होईल. एखाद्या कायदेशीर वादात अडकला असाल तर, त्यातून सुटका मिळू शकेल आणि तुमचा विजय होईल. विविध क्षेत्रांमध्ये संततीची होणारी प्रगती सुखावह असेल.
हेही वाचा – स्वाभिमानी की हेकेखोर?
तुळ – आर्थिक आणि व्यवसायिक पातळीवर दिवस चांगला जाईल. बऱ्याच काळापासून पैशांशी संबंधित व्यवहारात समस्या येत असेल तर, आता त्यातून मार्ग निघेल. व्यवसायाच्या बाबतीत, पुरेसा आर्थिक फायदा झाल्यामुळे आनंद वाढेल. घरात आणि कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. परंतु नोकरदार जातकांनी कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहावे.
वृश्चिक – शरीराशी संबंधित काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. बिघडलेल्या आरोग्याचा कामावरही परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी थोडेसे दमल्यासारखे वाटेल. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणेही महत्त्वाचे आहे. व्यवसाय किंवा कामाच्या बाबतीत अनुभवी व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरू शकतो.
धनु – कामाच्या ठिकाणी नफा कमावण्याच्या भरपूर संधी उपलब्ध होतील. याशिवाय, प्रलंबित काम पूर्ण झाल्याने मनाला शांती मिळेल. विरोधकही कामाची प्रशंसा करतील. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी दिवस अनुकूल राहील. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ आणि पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
मकर – कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत दिवस अतिशय चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी कनिष्ठांकडून सहकार्य आणि आदर मिळेल, ज्यामुळे हातातील कामे लवकर पूर्ण होतील. आर्थिक बाबींमध्ये यश मिळेल. पालकांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल.
कुंभ – कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक हुशारीने केलेले काम मधेच थांबू शकते. त्यामुळे काही नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, सध्या कोणतेही जोखमीचे काम किंवा निर्णय घेणे टाळावे लागेल. अनावश्यक वादांपासूनही दूर राहा, नाहीतर काहीतरी समस्या उद्भवू शकतात.
मीन – कामाच्या ठिकाणी कार्यालयीन कामांपेक्षा घरातील कामे जास्त करावी लागतील. याशिवाय , कामाच्या ठिकाणी महत्त्वाची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकते. जोडीदारासोबत सुरू असलेले मतभेद संभाषणाद्वारे सोडवता येतील.
हेही वाचा – भगवान नरसिंहाना शांत करणारा, ‘शरभ’ अवतार…
दिनविशेष
पंडित गोपीकृष्ण
टीम अवांतर
भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीमधील जवळपास चार शैलींमध्ये पारंगत असणारे पंडित गोपीकृष्ण यांची खरी ओळख होती ती कथ्थकमधील बनारस घरण्याचे प्रसिद्ध नर्तक आणि गुरू म्हणून. 22 ऑगस्ट 1934 रोजी बनारस येथे पंडित गोपीकृष्ण यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा सुखदेव महाराज हे प्रसिद्ध गायक आणि नृत्यगुरू होते. तर, मावशी होत्या कथ्थक सम्राज्ञी सीतारादेवी. त्यामुळे गोपीकृष्ण यांना नृत्याचे बाळकडू घरातूनच मिळाले. सहा वर्षांचे असताना लखनऊ घरण्याचे प्रसिद्ध गुरू आणि पं. बिरजू महाराज यांचे वडील पं. अच्छन महाराज यांचे ते शिष्य बनले. पुढे आजोबा पं. सुखदेव महाराजांनी गोपीजींना वयाच्या तेराव्या वर्षी ‘ऑल बंगाल कॉन्फरन्स’मध्ये नृत्याचे सादरीकरण करायला लावले. त्यावेळी त्यांच्या अप्रतिम नृत्य निपुणतेमुळे गोपीजींना ‘नटराज’ ही पदवी देण्यात आली. त्याच सुमारास व्ही. शांताराम यांनी नृत्यप्रधान ’झनक झनक पायल बाजे’ हा चित्रपट तयार करण्यास सुरुवात केली. या चित्रपटात गोपीजींनी प्रमुख नायकाची व्यक्तिरेखा साकारली. या भूमिकेमुळे ते संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले. गोपीजींनी भरतनाट्यमबरोबरच कथकली आणि मणिपुरी या नृत्यशैलीचाही त्यांनी अभ्यास केला. चित्रपटांच्या माध्यमातून कथ्थक शैली घरोघरी पोहोचविण्याचे सर्व श्रेय गोपीकृष्ण यांनाच जाते. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी मेहबूबा, दास्तान, उमराव जान, मुघल-ए-आझम, आम्रपाली आणि द परफेक्ट मर्डर यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केले. मधुबाला, वैजयंतीमाला, मुमताज, संध्या, झेबा बख्तियार, मनीषा कोईराला, रवीना टंडन, बेबी नाझ, माला सिन्हा, अनिता राज, पद्मा खन्ना, ट्विंकल खन्ना, आशा पारेख, डिंपल कपाडिया, रीना अशा अनेक भारतीय अभिनेत्रींना त्यांनी कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण दिले. सलग नऊ तास नृत्य करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. नृत्यातील त्यांच्या योगदानाबद्दल 1975 साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. कथ्थक नृत्यशैलीत बनारस घराण्याचे अस्तित्व त्यांनी टिकवले आणि त्या नृत्यशैलीला पुढल्या पिढीपर्यंत घेऊन जाणारे अनेक शिष्य घडवले. 19 फेब्रुवारी 1994 रोजी त्यांचे निधन झाले.