दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 21 ऑगस्ट 2025; वार : गुरुवार
भारतीय सौर : 30 श्रावण शके 1947; तिथि : त्रयोदशी 12:44; नक्षत्र : पुष्य 24:08
योग : व्यतिपात 16:13; करण : विष्टी 24:16
सूर्य : सिंह; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:20; सूर्यास्त : 19:02
पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
बृहस्पती पूजन
गुरुपुष्यामृत योग (सकाळी 06:23 पासून उत्तर रात्री 00.08 पर्यंत)
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – मानसिक ताणतणावापासून मुक्त असाल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. अनावश्यक खर्चाचा भविष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वैवाहिक जीवन चांगले राहील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते.
वृषभ – आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी कोणीतरी महत्त्वाचा सल्ला देऊ शकतो. ऑफिसमध्ये बढती मिळू शकते. एखाद्या खास व्यक्तीच्या भेटीची शक्यता आहे. आकर्षक व्यक्तिमत्वामुळे काही नवीन मित्र बनवण्यास मदत होईल. जोडीदारासोबतचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे.
मिथुन – पैशांशी संबंधित बाबींवरून जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळावे लागतील. मात्र त्याचबरोबर आत्मविश्वास वाढेल. विवाहोत्सुक जातकांच्या संदर्भात अचानक प्रेमसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे.
कर्क – कामाच्या ठिकाणी सहकाऱ्याकडून पाठिंबा मिळेल. आर्थिक स्थिती ठीकठाक असाल. तुमच्या नम्र स्वभावाची प्रशंसा होऊ शकेल. जोडीदार तुमच्यासाठी काहीतरी खास सरप्राइज प्लॅन करू शकेल. संततीकडून पाठिंबा मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
सिंह – आज मन काहीसे अस्वस्थ असेल. शारीरिक तंदुरुस्तीसाठी दिवसाची सुरुवात व्यायामाने करा. आर्थिक नियोजन करा, अन्यथा बजेट बिघडू शकते. प्रवास करणे टाळा. संध्याकाळी जोडीदारासोबत रोमॅंटीक डेटवर जाल.
कन्या – आत्मविश्वास वाढलेला असेल, मात्र आर्थिक परिस्थितीबाबत मनात अनेकदा सकारात्मक, नकारात्मक विचार येतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात यश मिळेल. जोडीदाराकडून एखादे सरप्राइज गिफ्ट मिळू शकते.
हेही वाचा – तरंगिणी… संसारात राहून संन्यस्त जीवन
तुळ – आरोग्य चांगले राहील. कामाच्या ठिकाणी एखाद्या प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते. व्यवसायाची परिस्थिती सुधारेल. अनपेक्षित नफा मिळण्याची चिन्हे आहेत. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदाराची तुमच्याकडून काहीतरी खास अपेक्षा असेल.
वृश्चिक – मनात विचारांचे प्रचंड वादळ सुरू असेल. विद्यार्थ्यांचा अभ्यासात रस वाढेल. शिक्षणात यश मिळेल. नोकरदार जातकांबद्दल समाजात आदर वाढेल. बौद्धिक कामामुळे उत्पन्न वाढेल. नोकरीत बदल झाल्याने प्रगतीच्या संधी मिळतील. उत्पन्न वाढेल.
धनु – संवेदनशील वागण्याचा तुम्हालाच त्रास होऊ शकतो. आज कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस ठीकठाक असेल. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने दिवस फारसा चांगला असणार नाही.
मकर – छोट्या छोट्या गोष्टींचा स्वतःला त्रास करून घेऊ नका. जवळच्या व्यक्तीशी मतभेद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. प्रकरण हाताबाहेर गेले तर, न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल. आजच्या दिवसात कमाईच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण जास्त असेल. त्यातच कुटुंबासह सहलीला जाण्याचा बेत बनला तर खर्च आणखी वाढेल.
कुंभ – आज वागण्यात बरेच चढउतार दिसून येतील. आर्थिक आणि व्यावसायिक परिस्थिती चांगली राहणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
मीन – बौद्धिक कामांमुळे समाजात आदर मिळेल. रागावर नियंत्रण आवश्यक आहे. नोकरीत बढतीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्न वाढेल, परंतु खर्च जास्त होईल. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. वडिलांकडून पाठिंबा मिळेल.
हेही वाचा – मीरासाहेब दर्ग्याचे आजोबा…
दिनविशेष
भारतरत्न सनई वादक बिस्मिल्ला खाँ
टीम अवांतर
जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध सनईवादक आणि भारतरत्न पुरस्काराचे मानकरी बिस्मिल्लाखाँ यांचा जन्म 21 मार्च 1916 रोजी सनईवादकांच्या कुटुंबात बिहारमधील दुमराव या गावात झाला. वडिलांकडून म्हणजे खाँसाहेब पैगंबरबक्ष यांच्याकडून बालपणी सनईवादनाचे संस्कार त्यांच्यावर झाले. पुढे मामा खाँसाहेब अलिबक्ष यांच्याकडे वयाच्या सहाव्या वर्षापासून वाराणसी येथे बिस्मिल्लाखाँ यांनी सनईवादनाचे पद्धतशीर शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मामांबरोबर बिस्मिल्लाखाँ यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी 1930 साली अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत पहिल्यांदा सनई वादनाचा सार्वजनिक कार्यक्रम केला. दुसरा कार्यक्रम लखनऊ येथे, प्रदर्शनानिमित्त झालेल्या संगीत संमेलनात करून उत्तम वादनाबद्दल सुवर्णपदक मिळवले. पुढे 1937 मधील कलकत्त्याच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत त्यांनी तीन सुवर्णपदके मिळवून रसिकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. 1938 मध्ये लखनऊ येथे ऑल इंडिया रेडिओ केंद्रावर त्यांनी आपला कार्यक्रम सादर केला. इथूनच त्यांच्या सनई वादनाच्या उज्ज्वल कारकीर्दीला सुरुवात झाली. कन्नड अभिनेते राजकुमार यांच्या सनादी अप्पण्णा या चित्रपटासाठी त्यांनी सनईवादन केले. सत्यजित राय यांच्या जलसाघर या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली. सनईसारख्या वाद्यावर गायकीचे सर्व प्रकार लीलया निर्माण करणारा अत्यंत सुरेल वादक म्हणून बिस्मिल्लाखाँ यांची ख्याती होती. ख्याल, ठुमरी वगैरे संगीतप्रकारांप्रमाणेच कजरी, चैती, पूरबी अशा लोकधुनीही ते कौशल्याने हाताळत असत. 1955 मध्ये त्यांना ‘नॅशनल कल्चरल ऑर्गनायझेशन’ या राष्ट्रीय सांस्कृतिक संघटनेकडून ‘अखिल भारतीय शहनाई चक्रवर्ती’ हा किताब मिळाला. 1956 मध्ये संगीत नाटक अकादमीतर्फे त्यांचा सन्मान केला गेला, 1961 मध्ये भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ तर 1968 मध्ये ‘पद्मभूषण’ आणि 1980 मध्ये ‘पद्मविभूषण’ ह्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. मध्य प्रदेश शासनाकडून तानसेन पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. ‘रॉयल नेपाळ आर्ट अकॅडमी’ तर्फेही त्यांना सर्वोच्च मान लाभला. 2001 मध्ये भारत सरकारने सनई वादनातील त्यांच्या अद्वितीय कामगिरीकरिता ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना गौरविले होते. याशिवाय भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी सनईवादनाकरिता बिस्मिल्लाखाँ यांना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर आमंत्रित केले होते. 21 ऑगस्ट 2006 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले