दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 19 सप्टेंबर 2025; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 28 भाद्रपद शके 1947; तिथि : त्रयोदशी 23:36; नक्षत्र : आश्लेषा 07:05
- योग : सिद्ध 20:40; करण : गरज 11:26
- सूर्य : कन्या; चंद्र : कर्क 07:05; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:37
- पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
प्रदोष
शिवरात्री
त्रयोदशी श्राद्ध
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कामाच्या ठिकाणी अधिक सतर्क राहावे लागेल, छोट्या चुका टाळा. आर्थिक स्थिती स्थिर राहील, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. कुटुंबात तणाव असू शकतो, त्यासाठी चर्चेद्वारे उपाय शोधा. सामाजिक जीवनात प्रतिष्ठा अबाधित राहील. घाई टाळा आणि संयम ठेवा.
वृषभ – तुमच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी व्हाल, परंतु थोडा संयम आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतांचे कौतुक केले जाईल. कुटुंबात शांतता राहील, याकडे लक्ष द्या. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील. सामाजिक संबंध सुधारतील आणि नवीन संधी निर्माण होतील.
मिथुन – तुमची ऊर्जा चांगली असेल, परंतु कामावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. आर्थिक परिस्थिती संतुलित राहील, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक संबंध फायदेशीर ठरतील, मात्र बोलताना सावधगिरी बाळगणे देखील आवश्यक आहे. कुटुंबाशी समन्वय वाढवा.
कर्क – आज भावनांवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी विश्वासपूर्ण संबंध राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. कुटुंबात किरकोळ वाद उद्भवू शकतात; विकोपाला जाऊ नयेत म्हणून ते हुशारीने सोडवा.
सिंह – तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास उंचावलेला राहील. कामातील यश प्रतिष्ठा वाढवेल. आर्थिक स्थिरता राहील. नवीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवा.
हेही वाचा – दांडूमारम्मा मंदिर… वर्षातून फक्त नवरात्रीतच होते देवीची पूजा!
कन्या – कामात सतर्कता वाढवावी लागेल. जुने प्रश्न सुटू शकतात. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील, परंतु अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. कुटुंबासोबत सहकार्याचे संबंध ठेवा. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात.
तुळ – सामाजिक कार्यात किंवा घरगुती कामांमध्ये व्यग्र राहाल. जुने वाद मिटतील आणि नातेसंबंध मजबूत होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतांचे कौतुक केले जाईल. आर्थिक परिस्थिती संतुलित राहील. कौटुंबिक संबंध चांगले राहतील.
वृश्चिक – आतापर्यंत घेतलेले कठोर परिश्रम यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळेल. कुटुंबाशी असलेले संबंध दृढ होतील. आर्थिक लाभ शक्य होईल. कोणाला पैसे उधार दिले असतील तर, ते परत मिळू शकतील. लहान प्रवास घडण्याची शक्यता आहे.
धनु – आज कर्तव्ये हुशारीने पार पाडा. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात नवा प्रकल्प हाती घेण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका. विचारपूर्वक पावले उचला. कुटुंबाशी उत्तम समन्वय असेल.
मकर – आजचा दिवस सकारात्मक असेल. कामात यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवणे आनंददायी राहील. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील. सामाजिक जीवनात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल.
कुंभ – आज अचानक नवीन प्रकल्पांवर काम करावे लागेल आणि त्यात यशही मिळेल. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पाठिंबा मिळेल. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतांचे कौतुक केले जाईल, ज्यामुळे मनोबल वाढेल.
हेही वाचा – ‘त्या’ राजस्थानी महिलांची ‘पॉवर बँक’!
मीन – भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. काही काळ संयम राखावा लागेल. कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु समजूतदारपणाने सर्वकाही ठीक होईल. कुटुंबाशी असणारे नाते अधिक घट्ट होईल. आर्थिक बाबींमध्ये हुशारीने गुंतवणूक करा.
दिनविशेष
ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर
टीम अवांतर
ज्येष्ठ संगीतकार दत्तात्रय शंकर डावजेकर तथा दत्ता डावजेकर यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. चित्रपटसृष्टीत डीडी या नावाने ते ओळखले जात. एकाहून एक अवीट गाण्यांचे संगीत देणाऱ्या दत्ता डावजेकरांनी साधारण 60 च्या वर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा या चित्रपटांतील त्यांचे संगीत विलक्षण गाजले. डीडींनी 10 ते 12 नाटकांचेही संगीत दिग्दर्शन केले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दत्ता डावजेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून लता मंगेशकर यांना पदार्पणाची संधी दिली. हिंदी चित्रपट होता आप की सेवा में आणि गाणे होते ‘पा लागूं कर जोरी रे…’ तर, मराठी चित्रपट होता ‘माझं बाळ’. केवळ लता दिदीच नाहीत तर आशा, उषा, मीना खडीकर आणि हृदयनाथ मंगेशकर या सगळ्याच भावंडांना संगीतक्षेत्रात पहिली संधी देणारे दत्ता डावजेकरच होते. याशिवाय, सुधा मल्होत्रा यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम त्यांनीच संधी दिली होती. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, संथ वाहते कृष्णामाई आणि धरतीची लेकरं या चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार, तर ‘यशोदा’ या चित्रपटाला शास्त्रीय संगीताचा सूरसिंगार पुरस्कार मिळाला आहे. 19 सप्टेंबर 2007 रोजी त्यांचे मुंबईमध्ये निधन झाले.