Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    गोट्या… अप्पांची सावली!

    May 13, 2026

    जगातली पहिली यशस्वी ॲपेंडिसेक्टॉमी…

    May 13, 2026

    टेरर बोका आणि ओल्या रुमालाचे फटके

    May 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, May 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari :  अर्जुना तोचि योगी, विशेषिजे जो जगीं…
    अध्यात्म

    Dnyaneshwari :  अर्जुना तोचि योगी, विशेषिजे जो जगीं…

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 19, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.

    अध्याय तिसरा

    आतां देई अवधान । प्रसंगे तुज सांगेन । या नैराश्याचें चिन्ह । धनुर्धरा ॥67॥

    यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्याऽऽरभतेऽर्जुन । कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः न विशिष्यते ॥7॥

    जो अंतरी दृढु । परमात्मरूपीं गूढु । बाह्य तरी रूढु । लौकिक जैसा ॥68॥ तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचें भय न धरी । प्राप्त कर्म न अव्हेरी । उचित जें जें ॥69॥ तो कर्मेंद्रियें कर्मी । राहाटतां तरी न नियमी । परी तेथिचेनि उर्मी । झांकोळेना ॥70॥ तो कामनामात्रें न घेपे । मोहमळें न लिंपे । जैसें जळीं जळें न शिंपें । पद्मपत्र ॥71॥ तैसा संसर्गामाजि असे । सकळांसारिखा दिसे । जैसें तोयसंगें आभासे । भानुबिंब ॥72॥ तैसा सामन्यत्वें पाहिजे । तरी साधारणुचि देखिजे । येरवीं निर्धारितां नेणिजे । सोय जयाची ॥73॥ ऐसां चिन्हीं चिन्हितु । देखसी तोचि मुक्तु । आशापाशरहितु । वोळख पां ॥74॥ अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगीं । म्हणोनि ऐसा होय यालागीं । म्हणिपे तूंते ॥75॥ तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरी । मग कर्मेंद्रियें हीं व्यापारीं । वर्ततु सुखें ॥76॥

    नियतं कुरु कर्म त्वं ज्यायो ह्यकर्मणः । शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धयेदकर्मणः ॥8॥

    म्हणशी नैष्कर्म्य होआवें । तरी एथ तें न संभवे । आणि निषिद्ध केवीं राहाटावें । विचारी पां ॥77॥ म्हणोनि जें जें उचित । आणि अवसरेंकरूनि प्राप्त । तें कर्म हेतुरहित । आचर तूं ॥78॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : जया नैष्कर्म्यपदीं आस्था, तया उचित कर्म सर्वथा…

    अर्थ

    अर्जुना, प्रसंग आलेला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो. इकडे तू लक्ष दे. ॥67॥

    (पण) हे अर्जुना, मनाने इंद्रियांचे नियमन करून, जो आसक्त न होता कर्मेंद्रियांनी कर्मयोगाला आरंभ करतो (म्हणजे कर्मेंद्रिये कर्मात राबवतो) त्याची योग्यता विशेष होय. ॥7॥

    जो अंतर्यामी निश्चळ आणि परमात्म्याच्या स्वरूपात गढलेला असतो आणि बाहेरून मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करीत असतो, ॥68॥ तो इंद्रियांना हुकूम करत नाही आणि विषय बांधतील, अशी त्यास भीती नसते. तो अधिकारपरत्वे प्राप्त झालेले जे जे विहित कर्म, त्याचा अनादर करत नाही. ॥69॥ कर्मेंद्रिये कर्मे करीत असली तरी, त्यांना तो पुरुष आवरीत नाही; पण त्यामुळे उत्पन्न होणार्‍या विकारांनी तो लिप्त होत नाही. ॥70॥ ज्याप्रमाणे पाण्यातील कमळाचे पान पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो कोणत्याही कामनेने लिप्त होत नाही आणि अविवेकरूपी मलाच्या योगाने तो मलीन होत नाही. ॥71॥ त्या कमलाच्या पानाप्रमाणे तो अलिप्तपणाने संगामध्ये रहातो. तो दिसण्यात सामान्य लोकांप्रमाणे दिसतो. ज्याप्रमाणे सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असूनही (प्रतिबिंबामुळे) पाण्याच्या संगतीत रहाताना दिसते, ॥72॥ त्याप्रमाणे वरवर पाहिले तर तो इतर सामान्य लोकांसारखाच दिसतो. बाकी त्याच्या संबंधी निश्चित विचार ठरवू म्हटले तर, त्याच्या स्थितीविषयी काहीच कल्पना करता येत नाही ॥73॥ अशा लक्षणांनी युक्त असलेला जो तुला दिसेल, तोच आशापाशरहित आणि मुक्त आहे, असे तू ओळख. ॥74॥ अर्जुना, जगामधे ज्याचे विशेष वर्णन केले जाते, असा तोच योगी होय. याकरिताच तू असा हो, म्हणून मी तुला म्हणतो. ॥75॥ तू मनाला आवरून धर आणि अंत:करणात स्थिर हो; मग ही कर्मेंद्रिये आपापले व्यवहार करीत खुशाल राहू देत. ॥76॥

    विहित असे जे कर्म आहेत ते तू करीत जा. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे अधिक चांगले. कर्म न करण्याने तुझी देहयात्राही सिद्धीला जाणार नाही. ॥8॥

    कर्म टाकून देऊ, असे म्हणशील तर, विहित कर्मे करणे टाकून कर्मातीत (होणे) देहधार्‍यास संभवत नाही. (असे जर आहे तर मग) शास्त्रबाह्य कर्माचे आचरण काय म्हणून करावे, याचा तू विचार कर. ॥77॥ म्हणून जे जे करणीय आणि प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म आहे, ते तू फलाशा सोडून करीत जा. ॥78॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : कर्म पराधीनपणे, निपजतसे प्रकृतिगुणें…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

     

    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana,

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : ऐसा अर्जुन दुःखें शिणतु, शोचित असे जिवाआंतु

    May 13, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु

    May 12, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : पैं अखंड डोळ्यांपुढें, फुटलें जैसें महाभयाचें भांडें

    May 11, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : ऐसा अर्जुन दुःखें शिणतु, शोचित असे जिवाआंतु

    By Team AvaantarMay 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा कृतांताचिया जावळी । जें एकचि विश्वातें गिळी । तियें कोटीवरील सगळीं…

    Dnyaneshwari : कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु

    May 12, 2026

    Dnyaneshwari : पैं अखंड डोळ्यांपुढें, फुटलें जैसें महाभयाचें भांडें

    May 11, 2026

    Dnyaneshwari : ऐसें वाऊनि महाभयाचें भोज, एथ काय निपजवूं पाहातोसि काज

    May 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    गोट्या… अप्पांची सावली!

    May 13, 2026

    जगातली पहिली यशस्वी ॲपेंडिसेक्टॉमी…

    May 13, 2026

    टेरर बोका आणि ओल्या रुमालाचे फटके

    May 13, 2026

    Dnyaneshwari : ऐसा अर्जुन दुःखें शिणतु, शोचित असे जिवाआंतु

    May 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 मे 2026

    May 13, 2026

    Bookshelf : गारंबीचा बापू… बंडखोर बापू प्रत्येकाच्या मनात!

    May 13, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 296
    • अवांतर 185
    • आरोग्य 110
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 417
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 206
    • मैत्रीण 19
    • ललित 622
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    गोट्या… अप्पांची सावली!

    May 13, 2026

    जगातली पहिली यशस्वी ॲपेंडिसेक्टॉमी…

    May 13, 2026

    टेरर बोका आणि ओल्या रुमालाचे फटके

    May 13, 2026
    Most Popular

    गोट्या… अप्पांची सावली!

    May 13, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.