दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 18 ऑक्टोबर 2025; वार : शनिवार
- भारतीय सौर : 26 आश्विन शके 1947; तिथि : द्वादशी 12.18; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 15:40
- योग : ब्रह्मा 25:47; करण : गरज 25:01
- सूर्य : कन्या; चंद्र : सिंह 22:10; सूर्योदय : 06:32; सूर्यास्त : 18:15
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
धनत्रयोदशी
शनिप्रदोष
गुरुद्वादशी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस अनेक शक्यतांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळतील. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. वरिष्ठांकडून प्रशंसा होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून एखादी चांगली बातमी ऐकू येईल. आज आरोग्य थोडेसे बिघडू शकते.
वृषभ – दिवसभरात गोंधळाची परिस्थिती असेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. काही लोक प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र, आत्मविश्वासाने आणि संयमाने या अडथळ्यांवर मात करू शकाल. आज आर्थिक बाबींबाबत खूप काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. कुटुंबात एखादा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो.
मिथुन – दिवस उत्साह आणि आनंदाने भरलेला असेल. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत दिवस सामान्य राहील. मित्र आणि नातेवाईकांसोबत आनंदात दिवस घालवाल. ग्रहांचे संक्रमण तुमच्या बाजूने होत असल्याने आर्थिक लाभाची चांगली शक्यता आहे. कौटुंबिक जीवनातील आनंदाचे क्षण अपार आनंद आणि शांती देतील.
कर्क – घर आणि काम यांच्यात संतुलन राखावे लागेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी समन्वय असणे आवश्यक असेल. कामे पूर्ण व्हावीत, यासाठी ध्येयांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. खर्चाबाबत मात्र खूप काळजी घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घेणेही उचित ठरेल. बेरोजगार जातकांना नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.
सिंह – आज नशिबाची साथ मिळेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. मन आनंदी आणि आत्मविश्वासाने भरलेले असेल. आर्थिक परिस्थितीत पूर्वीपेक्षा अधिक सुधारणा होईल. व्यवसायात असलेल्यांना फायदेशीर सौदा मिळू शकेल. आरोग्यात सुधारणा होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल.
हेही वाचा – विदर्भातील आठवीची पूजा!
कन्या – दिवस एकाच वेळी अनेक आव्हानांना तोंड देण्याचा असेल. म्हणून प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलावे लागेल. कामाच्या ठिकाणी शांत राहून अत्यंत सावधगिरीने काम करा. एखाद्या प्रकल्पावर काम करण्याचा विचार करत असाल तर तो विचार पुढे ढकला. भविष्यात काही काळासाठी ते बाजूला ठेवा. अविवाहितांना लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील.
तुळ – दिवस सकारात्मक आणि सर्जनशील कामांनी भरलेला असेल. दिवसभर नवीन लोकांशी भेटीगाठी सुरू राहतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांचे आवडते काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. कामावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. व्यवसायिकांना कामात अडथळे आणि विलंब यांचा अनुभव येऊ शकतो. मात्र चातुर्याने त्यावर सहज मात कराल.
वृश्चिक – नशिबाची साथ मिळेल. कामावर लक्ष केंद्रित करा. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कौटुंबिक स्तरावर आनंदाचे वातावरण असेल. सासरच्या लोकांकडून तुम्हाला विशेष अधिकार मिळू शकतात. घराचे नियोजन करण्यात जोडीदाराच्या मदतीची आवश्यकता असेल.
धनु – आज अत्यंत व्यग्र दिवस असेल. काही कामे पूर्ण कराल, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. व्यवसाय असलेल्यांना नवीन प्रकल्पावर काम करावे लागेल. यावेळी तुमचे शत्रू वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. नोकरदार जातकांना नवीन संधी मिळतील. जोडीदाराला एखादी भेटवस्तू देऊन आश्चर्यचकित कराल.
मकर – आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. गाडी चालवताना जास्त काळजी घ्या. अर्थात, अंगभूत बुद्धिमत्ता आणि विवेक तुम्हाला कोणत्याही संकटांना तोंड देण्यास मदत करेल. तुमचे गोड बोलणे आणि वागणे, यामुळे सर्वांना सहज जिंकून घ्याल. नोकरी आणि व्यवसायात आदर मिळेल. नोकरदार व्यक्तींना लक्षणीय यश मिळू शकते.
कुंभ – दिवस संमिश्र असेल. काही बाबींमध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल, तर काही बाबींमध्ये दिवस निराशाजनक ठरू शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत वाद असलेल्यांना त्यांच्या बाजूने निर्णय मिळेल. विचारशील कामामुळे तुम्ही प्रत्येक समस्या सहजपणे सोडवू शकाल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. नियोजनात गुंतलेल्यांना व्यवसायात काहीतरी नवीन करायला मिळेल.
हेही वाचा – सायकल… अपराधीपणाच्या भावनेतून सुटका!
मीन – आज लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतो, कारण ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. जे बेरोजगार आहेत ते एखाद्यासोबत नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात. व्यवसायासाठी चांगला दिवस असेल. नोकरी करणाऱ्यांना काही नवीन संधी मिळू शकतात. वैवाहिक जीवनात चढ-उतार येऊ शकतात.
दिनविशेष
मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार हिराबाई पेडणेकर
टीम अवांतर
सावंतवाडीत 22 नोव्हेंबर 1885 रोजी शेवन्तुबाई या देवदासीच्या पोटी हिराबाई पेडणेकर यांचा जन्म झाला. आठव्या वर्षी आईचे छत्र हरपल्यावर छोटी हिरा मावशीकडे मुंबईला आली. तिची जडणघडण पुढे मुंबईत मावशीच्या सहवासात, कलावंतिणींच्या वस्तीत झाली. शंकरराव धुळेकर बुवा, परशुरामबुवा बर्वे, भास्करबुवा बखले, बडोद्याचे फय्याज खान यांच्याकडून हिराला संगीताचे धडे मिळाले. याशिवाय बंगाली, मराठी, संस्कृत, इंग्रजी या भाषांवरही तिने प्रभुत्व मिळवले होते. गोविंद बल्लाळ देवल यांचे हिराच्या मावशीकडे जाणे- येणे होते. तिथे चालणाऱ्या नाटकांच्या चर्चांमुळे हिराला नाटकाबद्दल आत्मीयता निर्माण झाली. त्यातूनच ‘जयद्रथ विडंबन’ या नाटकाचे लेखन हिराने केले. 1904 साली 19 वर्षांच्या हिरा यांच्या 71 पानांच्या ‘जयद्रथ विडंबन’ या नाटकाला पुस्तकाचे स्वरूप प्राप्त झाले. जयद्रथ विडंबननंतर हिरा यांनी कल्पनारम्य सुखांतिकेवर एक नवीन नाटक लिहायला घेतले. त्याचे नाव होते ‘संगीत दामिनी’. ‘संगीत दामिनी’ रंगमंचावर यावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. ते नाटक एका नायकिणीचे होते आणि असे नाटक रंगभूमीवर आणण्यास कोणच तयार नव्हते. मात्र, केशवराव भोसले यांच्या ‘ललितकलादर्श’ या कंपनीने 1911 साली ‘संगीत दामिनी’ चा पहिला प्रयोग नाशिकमध्ये केला. ‘संगीत दामिनी’मध्ये हिराबाई पेडणेकर यांच्या क्रांतिकारक विचारांचे प्रतिबिंब दिसते. या नाटकात एकूण बहात्तर पदे आहेत, हेही एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. ज्या काळात नाट्य व्यवसायात स्त्रीच्या सहभागाचा कुणी विचारही करू शकत नव्हते, अशा काळात पुरुष नाटककारांच्या पंक्तीत एका कनिष्ठ म्हणून हिणवल्या जाणाऱ्या समाजातील स्त्रीने नाटककार म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले. याखेरीज, अनेक नाटके त्यांनी संगीतबद्ध केली होती. ‘माझे आत्मचरित्र’ नावाची एक विनोदी लघुकथाही लिहिली होती. मात्र पुढे आयुष्यात आलेल्या दारूण अनुभवांमुळे त्यांनी लेखन करणे सोडले ते कायमचेच. 18 ऑक्टोबर 1951 रोजी हिराबाई यांचे निधन झाले.


