दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 18 ऑगस्ट 2025; वार : सोमवार
भारतीय सौर : 27 श्रावण शके 1947; तिथि : दशमी 17:22; नक्षत्र : मृगशीर्ष 26:05
योग : हर्षण 22:59; करण : बव 28:25
सूर्य : सिंह; चंद्र : वृषभ 14:39; सूर्योदय : 06:20; सूर्यास्त : 19:04
पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – तुमच्या निर्णय क्षमतेमुळे कामाच्या ठिकाणी फायदे मिळू शकतात. तसेच, काही धाडसी निर्णय आणि कृतींमुळे एखादी अभिमानास्पद घटना घडेल. नोकरदार जातकांचा दिवस चांगला जाईल, कामेही वेळेवर पूर्ण होतील. एखाद्या सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभाग घ्याल, ज्यामुळे मनाला शांती मिळेल.
वृषभ – कोणत्याही प्रकल्पात किंवा कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळू शकते, ज्यामुळे तुमच्याबद्दल आजूबाजूच्या लोकांमध्ये आदरही वाढेल. सांसारिक सुखांची साधने वाढतील, उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी पालकांचे आशीर्वाद घेणे फायदेशीर ठरेल. संध्याकाळी कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता.
मिथुन – व्यवसायात काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. एखादे कायदेशीर प्रकरण चालू असेल तर त्यात सावधगिरी बाळगा, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. कामाच्या ठिकाणी वेळेवर योग्य निर्णय न घेतल्यामुळे नुकसान सहन करावे लागू शकते. नोकरदार जातकांना वरिष्ठांच्या मदतीने अधिकारात वाढ मिळू शकते.
कर्क – कामाच्या ठिकाणी बढती बऱ्याच काळापासून प्रलंबित असेल, तर ती आता पूर्ण होऊ शकते. तसेच तुमच्या बोलण्याच्या पद्धती आणि वागण्याने वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. तुमच्या निर्णय क्षमतेचाही फायदा होईल. परंतु आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवू शकते.
सिंह – व्यवसाय करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी काही नवीन बदल दिसू शकतात. त्याचबरोबर नोकरदारांचे अधिकार वाढतील, ज्यामुळे आर्थिक लाभ देखील मिळू शकेल. समाजात आदर वाढेल. आर्थिक बाबतीत अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळू शकतील, ज्यामुळे मन आनंदी राहील. कुटुंबाकडूनही एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल.
कन्या – कामाच्या ठिकाणी अधिकार वाढू शकतात, काही नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता देखील आहे. आपल्या आनंदासाठी थोडाफार खर्च करू शकता. इतरांची सेवा करण्याचीही संधी मिळेल. व्यवसायाच्या बाबतीत, पैसे कमविण्याचे नवीन मार्ग सापडू शकतात. संततीकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, यामुळे मन आनंदी राहील.
हेही वाचा – Skin Care : त्वचेचा ओलसरपणा टिकवणारे ‘पंचामृत’
तुळ – कामाच्या बाबतीत दिवस नेहमीपेक्षा सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक काम करूनही थोडेफार नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला कोणतेही धोकादायक काम करणे किंवा कोणताही निर्णय घेणे टाळावे लागेल. व्यावसायिकांनाही लहान नुकसान होऊ शकते. कुटुंबासोबत वेळ घालवणे उत्तम.
वृश्चिक – नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते, अधिकारात वाढ होण्याची शक्यता आहे. एखाद्या मौल्यवान गोष्टीचा फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या धाडसाने पराभूत होतील. सुखांमध्येही वाढ होऊ शकते. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मुलांसोबत चांगला वेळ घालवू शकता.
धनु – कामाच्या ठिकाणी नवीन योजना बनवू शकता, नवीन प्रकल्पावर काम सुरू करू शकता. तुमचे पैसे बराच काळ कुठेतरी अडकले असतील तर ते आता परत मिळू शकतात. संध्याकाळी काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अशा परिस्थितीत विचारपूर्वक निर्णय घेणे चांगले राहील. मुलांशी संबंधित एखाद्या बातमीने निराश होऊ शकता.
मकर – दिवसभर उत्साहाने परिपूर्ण असाल, परंतु आर्थिक बाबतीत काही अनावश्यक खर्चांना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत बजेट बनवणे फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. गाडी चालवताना काळजी घ्या.
कुंभ – कामाच्या ठिकाणी घाईघाईने कोणतेही काम करणे टाळावे लागेल, अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. अशा परिस्थितीत प्रत्येक निर्णय शांतपणे घेणे किंवा संयमाने काम करणे चांगले राहील. नवीन काम सुरू केल्याने भविष्यात मोठे फायदे मिळू शकतात. भौतिक सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल. संततीशी संबंधित चांगली बातमी देखील मिळू शकते.
मीन – पोटाशी संबंधित काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. याचा कामावरही परिणाम होईल. व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असेल तर, ते सहजपणे मिळू शकते. नवीन योजना बनवून आणि त्या पुढे नेल्याने यश मिळू शकेल. यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि धैर्यही वाढेल.
हेही वाचा – संवादाची भाषा झाली ‘ॲडव्हान्स’
दिनविशेष
पं. विष्णू दिगंबर पलुस्कर
टीम अवांतर
प्रसिद्ध संगीतप्रसारक, गायनाचार्य आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेले पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा जन्म 18 ऑगस्ट 1872 रोजी कुरुंदवाड येथे झाला. त्यांचे मूळ आडनाव गाडगीळ पण पूर्वीचे पलुसचे रहिवासी असल्याने ते ‘पलुस्कर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांना लहानपणापासूनच गाण्याचे चांगले अंग असल्यामुळे मिरज येथील संगीताचार्य पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे संगीतविद्या शिकविण्यासाठी पाठविण्यात आले. पंडित बाळकृष्णबुवांकडून त्यांनी ग्वाल्हेर गायकी प्राप्त केली. कालांतराने 1893 साली त्यांनी मिरज सोडले आणि बडोद्याला गेले. महाराणी जमनाबाईसाहेब यांना गाणे आवडल्यामुळे विष्णूबुवांचा बडोद्यात तीन-चार महिने मुक्काम झाला. तिथे त्यांना आर्थिक प्राप्ती चांगली झाली. पण पैसा मिळविणे हे त्यांचे ध्येय नव्हते. संगीतकलेला सामाजिक प्रतिष्ठा आणि कलावंतांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी संगीताचा प्रसार करणे, संगीताचे शिक्षण जनतेला मुक्तहस्ते आणि कमी खर्चात मिळावे म्हणून ठिकठिकाणी संगीत विद्यालये स्थापन करणे हे विष्णूबुवांचे ध्येय होते. लाहोर येथे 5 मे 1901 रोजी त्यांनी ‘गांधर्व महाविद्यालय’ संस्थेची स्थापना केली. या विद्यालयाद्वारे त्यांनी पद्धतशीर अभ्यासक्रम आखून संगीत विषयाच्या निरनिराळ्या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी निर्माण केल्या आणि त्यायोगे संगीतविषयक पदव्या विद्यार्थ्यांना दिल्या. सुसंस्कृत आणि कुलीन स्त्रियांना व्यासपीठावर येण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. 1908 साली त्यांनी मुंबईत गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन त्यांनी जनसामान्यांत लोकप्रिय केले. ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत प्रत्येक सभेत म्हणण्याची प्रथा त्यांनी रूढ केली. त्यांनी सुमारे हिंदी-मराठी साठ पुस्तके लिहिली. 21 ऑगस्ट 1931 रोजी मिरज येथे त्यांचे निधन झाले. त्यांचे सुपुत्र पंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर (1921–1955) हेही नावाजलेले गायक होते.