दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 14 जुलै 2025, वार : सोमवार
भारतीय सौर : 23 आषाढ शके 1947, तिथि : चतुर्थी 23:59, नक्षत्र : धनिष्ठा 06:48
योग : आयुष्यान 16:13, करण : बव 12:33
सूर्य : मिथुन, चंद्र : कुंभ, सूर्योदय : 06:08, सूर्यास्त : 19:19
पक्ष : कृष्ण, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
संकष्ट चतुर्थी चंद्रोदय 10.03
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कामाचा थकवा जाणवू शकतो. कार्यालयीन राजकारणापासून दूर रहा. मालमत्ता खरेदी किंवा विक्री करायची असेल तर, आजचा दिवस शुभ असेल. एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला आर्थिक मदत करावी लागेल, परंतु दिलेले पैसे वेळेवर परत मिळतील याची आधी खात्री करा.
वृषभ – आजचा दिवस आनंदात जाईल. आत्मविश्वासाने नवीन कामाला सुरुवात कराल. घरात शुभ कार्याचे आयोजन केल्याने आनंदाचे वातावरण निर्माण होईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. नव्या कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा.
मिथुन – सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. पैशाचा ओघ वाढेल. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळतील. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर कुटुंबातील सदस्यांशी चर्चा होऊ शकते. जुन्या मित्रांना भेटण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी होईल.
कर्क – व्यावसायिक आयुष्यातील वादविवाद टाळा. आत्मविश्वासाने नवीन कामांची जबाबदारी घ्या. कारकिर्दीतील आव्हानांवर मात करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबासमवेत वेळ घालवा. यामुळे तणाव कमी होईल.
सिंह – आजचा दिवस थोडा तणावपूर्ण असेल. कार्यालयात कामामुळे व्यग्र वेळापत्रक राहिल. व्यवसायात नफा मिळेल. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. पैसे वाचवण्यावर लक्ष केंद्रित करा. उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल ठेवा. जोडीदारासोबत वेळ घालवा.
कन्या – उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. उत्पन्नात वाढ होईल. जमीन किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. त्यामुळे मानसिक शांती लाभेल. घाईघाईने कोणतेही काम करू नका किंवा निर्णय घेऊ नका.
हेही वाचा – लोकल ट्रेन आणि मोबाइल एटिकेट्स
तुळ – कार्यालयातील कामाचा ताण वाढेल, मात्र सहकाऱ्यांबरोबर केलेल्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. व्यवसायात नफा मिळेल. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या संपतील. घरी एखादी चांगली बातमी मिळेल.
वृश्चिक – व्यावसायिक जीवनात सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. सांघिक कार्यामुळे चांगले परिणाम मिळतील. गुंतवणुकीबाबतचे निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे निरुपयोगी युक्तिवादांपासून दूर रहा.
धनु – खर्चावर नियंत्रण ठेवा. घरात भावंडांशी वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक जीवनातील समस्या तणाव वाढवू शकतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. धीराने समस्या सोडवा.
मकर – आर्थिक बाबींमध्ये कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. त्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनातील समस्या प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करा. घरगुती जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल.
कुंभ – बऱ्याच काळापासून रखडलेली कामे यशस्वी होतील. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. एखाद्या जुन्या मित्राची भेट घडेल. यामुळे मन आनंदी होईल. पैशाचे व्यवहार करताना थोडीशी सावधगिरी बाळगा.
मीन – दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कार्यालयात वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना धीर धरा. आर्थिक स्थिती सुधारेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात शांतता आणि आनंद राहील.
दिनविशेष
संगीतकार मदन मोहन
टीम अवांतर
संगीतकार मदन मोहन यांचे संपूर्ण नाव मदन मोहन कोहली होते. 25 जून 1924 रोजी इराकच्या बगदाद येथे त्यांचा जन्म झाला. म्हणजे मागील वर्ष हे त्यांचे जन्म शताब्दी वर्ष होते. कामाच्या निमित्ताने इराकमध्ये असलेले त्यांचे वडील कुटुंबकबिल्यासह 1932 साली भारतात परतले. लखनऊ, मुंबई, डेहराडून या ठिकाणी शिक्षण पूर्ण करून मदन मोहन सैन्यात भरती झाले खरे, पण तिथे ते फारसे रमले नाहीत. संगीत क्षेत्रात आपले नशीब आजमावून बघण्यासाठी त्यांनी सैन्यातील नोकरी सोडली आणि लखनऊच्या आकाशवाणी केंद्रात ते नोकरीला लागले. तिथे अनेक दिग्गज संगीतकार, गायक, वादक यांच्या भेटी होत गेल्या. 1948 साली ‘शाहीन’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत गायक म्हणून त्यांचा प्रवेश झाला. 1950 साली ‘ऑंखे’ या चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत देण्याची संधी त्यांना मिळाली. मात्र चित्रपट फारसा चालला नाही. त्यांना खऱ्या अर्थाने यश मिळाले ते ‘भाई भाई’ या चित्रपटाद्वारे. नंतर त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले, अनेक गायकांसोबत काम केले, विशेषत: गायिका लता मंगेशकर यांच्यासोबत केलेली गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 1970 साली ‘दस्तक’ चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या आयुष्यातला हा पहिला आणि एकमेव पुरस्कार ठरला. 14 जुलै 1975 रोजी वयाच्या अवघ्या 51व्या वर्षी यकृताच्या आजाराने त्यांचे निधन झाले.
हेही वाचा – वहिनीची माया