Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    August 14, 2026

    भैरू आणि पारू

    August 14, 2026

    आनंदाच्या राज्यातले चार मित्र

    August 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, August 14
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 ऑगस्ट 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 ऑगस्ट 2026

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 14, 2026Updated:August 14, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 14 ऑगस्ट 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 23 श्रावण शके 1948; तिथि : द्वितीया 18:46; नक्षत्र : पूर्व फाल्गुनी 27:42;
    • योग : परिघ 09:28; करण : बालव 07:39, तैतिल 30:02;
    • सूर्य : कर्क; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:18; सूर्यास्त : 19:08;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    जरा जिवंतिका पूजन

    महालक्ष्मी स्थापना पूजन

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर

    टीम अवांतर

    पहिल्या स्त्री वकील आणि वारली समाजाच्या जागृतीचे काम हाती घेतलेल्या गोदावरी परुळेकर यांचा जन्म 14 ऑगस्ट 1907 रोजी पुण्यात झाला. त्यांचे मूळ नाव गोदावरी लक्ष्मण गोखले. त्यांचे वडील हे पुण्यामध्ये प्रसिद्ध वकील होते. गोदावरीताई यांचं शिक्षण हुजुरपागेत झालं. पुढे त्या पुण्यातच आपल्या वडिलांसारख्या वकीलही झाल्या. मात्र त्यात त्या फार रमल्या नाहीत. वकिलीचं थोडंफार काम केल्यानंतर त्यांनी मुंबईत ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया’चं काम सुरू केलं. मुंबईत प्रौढ शिक्षणासाठी, कामगारांच्या शिक्षणासाठी त्या काम करू लागल्या. मुंबईत काम करत असताना गोदूताईंचा कामगार नेते ना. म. जोशी यांच्याशी संपर्क आला. त्यांच्यामुळे कामगारांचे प्रश्न, आदिवासींचे प्रश्न यांच्याशी त्यांची ओळख झाली.

    हेही वाचा – रामरक्षेचे चिलखत

    1945 साली कॉ. शामराव परुळेकर यांनी गोदूताईंना वारली समाजाच्या समस्या पाहाण्यासाठी ठाणे जिल्ह्यात पाठवले. तिकडे गेल्यावर खऱ्या अर्थाने आपल्याला आदिवासींच्या जगाचं दर्शन झाल्याचं गोदूताईंनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. डहाणू, उंबरगाव, तलासरी या आदिवासी भागांमध्ये गोदूताईंनी स्थानिक वारलींचे संघटन सुरू केले. सावकार आपल्यावर अन्याय करतात, त्याचा प्रतिकार करायचा असतो, आपण प्रतिकार करू शकतो इथपासून वारलींना शिकवावे लागले. याचीच जाणीव करून देण्याचं महत्त्वाचं काम गोदावरी परुळेकरांनी केलं. याबरोबरच सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तो वेठबिगारीचा. ‘आता वेठबिगारी करायची नाही’ हे वाक्य गोदूताईंनी वारली समाजाच्या मनावर कायमस्वरूपी कोरले.

    पुढे गोदावरी गोखले आणि कॉ. शामराव परुळेकर यांनी लग्न केले. आपण करत असलेलं काम, आपला ध्यास यांच्याशी ते दोघेही एकरूप झाले होते. वारली समाजाच्या लढ्याच्या वेळेस आलेले अनुभव गोदूताईंनी लिहून काढावेत यासाठी शामराव अत्यंत प्रयत्नशील होते. मात्र ते हयात असेपर्यंत पुस्तकाचे काम पूर्ण झाले नाही. 1965 साली शामरावांचे निधन झाल्यावर मात्र गोदूताईंनी पुस्तक पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि 1970 साली ‘आणि माणूस जागा झाला’ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्याला 1972 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. याखेरीज त्यांनी आर्थर रोड, ठाणे, दिल्ली येथील तुरुंगात भेटलेल्या महिला गुन्हेगारांवर आधारित ‘बंदिवासाची आठ वर्ष’ हे पुस्तक लिहिले. 8 ऑक्टोबर 1996 रोजी गोदावरी परुळेकर यांचे निधन झाले. गोदूताईंच्या नावाने सध्या तलासरीत एक महाविद्यालय आणि सोलापुरात विडी कामगाराचं गृहसंकुल आहे.


    आजचे राशिभविष्य

    मेष – सुधारलेली कार्यशैली आणि नवीन विचार तुम्हाला आज पुढे जाण्यासाठी मदत करतील. समस्या सोडवण्याची तुमची क्षमता कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना प्रभावित करू शकते. दीर्घकाळ रखडलेल्या प्रकल्पांना वेग येईल. व्यावसायिकांना नवीन पुरवठादार किंवा वितरकांशी संपर्क साधण्याची संधी मिळू शकते. लहान पण दीर्घकाळ टिकणारे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भविष्याचे नियोजन करण्यासाठी कुटुंबाचा सल्ला उपयुक्त ठरेल.

    वृषभ – व्यावहारिक विचार आज तुम्हाला अनेक गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यात मदत करतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला असे काम मिळू शकते, ज्यासाठी संयम आणि अचूकतेची आवश्यकता असेल. व्यवसायात, ग्राहकांच्या पसंतीनुसार स्वतःला जुळवून घेणे फायद्याचे ठरेल. कृषी, दुग्धव्यवसाय, वस्त्रोद्योग आणि बांधकाम या क्षेत्रांतील लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नियमित दिनचर्या आणि पुरेसे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

    मिथुन – नवीन गोष्टी शिकण्याची तुमची इच्छा आणि कल्पनाशक्ती यामुळे आज यश मिळण्याची शक्यता वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान किंवा सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळेल. डिजिटल प्रसिद्धीमुळे तुमच्या व्यवसायाला फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये प्रगती करता येईल. भविष्यात एक नवीन संधी फायदेशीर ठरू शकते.

    कर्क – या राशीच्या जातकांसाठी कौटुंबिक गरजा पूर्ण करण्याचा आजचा दिवस आहे. कुटुंबातील सदस्याचे यश किंवा एखादी सकारात्मक बातमी आनंद घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. जुन्या ग्राहकांचा विश्वास व्यवसायाला स्थिरता देईल. घराच्या सजावटीवर किंवा देखभालीवर खर्च होऊ शकतो. मानसिक शांतीसाठी सकारात्मक विचारसरणीच्या लोकांसोबत वेळ घालवा.

    सिंह – तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्ये यामुळे तुमच्यावर आज नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. कामाच्या ठिकाणी एखाद्या टीमचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांना एखाद्या मोठ्या ग्राहकाशी किंवा संस्थेशी संपर्क साधण्याची संधी मिळू शकते. ज्यामुळे तुमचा सामाजिक प्रभाव वाढेल. यश मिळूनही नम्रता टिकवून ठेवणे फायदेशीर ठरेल.

    कन्या – बारकाईने सर्व कामे हातावेगळी करण्याची सवय तुम्हाला यश मिळवून देईल. कामाच्या ठिकाणी अहवाल, लेखापरीक्षण आणि विश्लेषण चांगल्या प्रकारे पूर्ण होईल. व्यावसायिकांनी मालसाठा आणि खर्च व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळू शकते. वेळेवर जेवणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी शिस्त आवश्यक असेल.

    तुळ – नवीन नातेसंबंध आणि संधी यामुळे सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या नवीन टीमसोबत काम करण्याची संधी मिळेल. व्यवसायातील भागीदारी फायदेशीर ठरेल. कला, मीडिया, फॅशन आणि इंटिरियर डिझाइन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखा.

    वृश्चिक – तुमच्यातील संयम आणि समजूतदारपणा कठीण परिस्थिती हाताळण्यास मदत करेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या गोपनीय प्रकल्पात तुमची महत्त्वाची भूमिका असू शकते. एक उत्तम व्यावसायिक धोरण तुम्हाला तुमच्या स्पर्धकांपेक्षा पुढे नेईल. आर्थिक बाबींमध्ये घाई टाळा. जुने कौटुंबिक वाद चर्चेद्वारे सोडवले जाऊ शकतात. अनावश्यक चर्चांपासून दूर राहा आणि आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा.

    हेही वाचा – आई लहान की मुलगी?

    धनु – सकारात्मक विचार आणि दूरदृष्टी यामुळे नवीन संधी निर्माण होतील. शिक्षण, प्रशिक्षण, परदेश प्रवास, लेखन आणि पर्यटन या क्षेत्रांतील व्यक्तींसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या प्रगतीचा मार्ग मोकळा करतील. व्यवसायामुळे नवीन बाजारपेठांशी जोडले जाण्याची संधी मिळू शकते. कुटुंबासोबत धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करता येईल.

    मकर – तुमची मेहनत आणि शिस्त यामुळे वरिष्ठांचा तुमच्यावरील विश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. व्यवसायात संसाधनांचा योग्य वापर केल्यास आर्थिक लाभ होईल. बचत किंवा गुंतवणुकीसाठी नवीन योजना आखू शकता. तुमचे कुटुंब तुमच्या सल्ल्याला महत्त्व देईल. स्वतःच्या आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती आणि संतुलित आहार आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा.

    कुंभ – तुमची मौलिक विचारसरणी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवेल. तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, संशोधन आणि डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या सूचनांना महत्त्व दिले जाईल. तुमचा व्यवसाय ऑनलाइन वाढवणे फायदेशीर ठरेल. मित्रांसोबत एखादा नवीन, सर्जनशील प्रकल्प सुरू करू शकता. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील.

    मीन – संवेदनशीलता आणि सर्जनशीलता ही आज तुमची बलस्थाने बनतील. साहित्य, संगीत, अभिनय, वैद्यकशास्त्र, योग आणि अध्यात्म या क्षेत्रांत गुंतलेल्यांना यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्याला मदत केल्याने तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. व्यवसायातील ग्राहकांचा विश्वास हा प्रगतीचा पाया ठरेल. जुन्या मित्राला किंवा प्रिय नातेवाईकाला भेटल्याने आनंद होईल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 ऑगस्ट 2026

    August 13, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 ऑगस्ट 2026

    August 12, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 ऑगस्ट 2026

    August 11, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 ऑगस्ट 2026

    By Team AvaantarAugust 13, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 13 ऑगस्ट 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 22…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 ऑगस्ट 2026

    August 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 ऑगस्ट 2026

    August 11, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश

    August 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    August 14, 2026

    भैरू आणि पारू

    August 14, 2026

    आनंदाच्या राज्यातले चार मित्र

    August 14, 2026

    समजून घेणं

    August 14, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : सापाच्या तोंडीं, पडली जे उंडी

    August 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 ऑगस्ट 2026

    August 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 395
    • अवांतर 204
    • आरोग्य 138
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 532
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 851
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    August 14, 2026

    भैरू आणि पारू

    August 14, 2026

    आनंदाच्या राज्यातले चार मित्र

    August 14, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.