Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शार्वीची वेगळी खेळी

    August 13, 2026

    कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    August 13, 2026

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, August 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 ऑगस्ट 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 ऑगस्ट 2026

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 13, 2026Updated:August 13, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 13 ऑगस्ट 2026; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 22 श्रावण शके 1948; तिथि : प्रतिपदा 20:41; नक्षत्र : मघा 28:37;
    • योग : वरियान 12:15; करण : किंस्तुघ्न 09:50;
    • सूर्य : कर्क; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:18; सूर्यास्त : 19:09;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    श्रावण मासारंभ

    बृहस्पती पूजन

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे

    टीम अवांतर

    आधुनिक मराठी भाषेतील श्रेष्ठ कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1890 रोजी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे झाला. वडिलांची पोलीस खात्यातील नोकरी फिरतीची असल्यामुळे बालकवींच्या शिक्षणाची आबाळ झाली. त्यांनी बराचसा अभ्यास घरीच केला. बालकवींची वडील बहीण जिजी हिने त्यांना संस्कृत भाषा शिकविली. कवितेची गोडीही तिनेच लावली. पुढे त्यांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविले. त्यामुळे त्यांच्या कवितेतील शब्दयोजनेत संस्कृतचा मोठा प्रभाव जाणवतो. पंडिती कविता आणि शाहिरी कविता यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. इंग्रजी कवितेचे त्यांचे वाचन मर्यादित असले, तरी इंग्रजी कवितेची त्यांची समज उत्तम होती.

    वयाच्या तेराव्या वर्षी नवापूर येथे असताना त्यांनी आपली पहिली कविता लिहिली. मात्र त्या कवितेला त्यांनी शीर्षक दिले नव्हते. कवितेच्या लयीची जाणीव, निसर्गप्रेम, श्रद्धा ही बालकवींच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये त्यांच्या या पहिल्या कवितेत बीजरूपाने जाणवतात. पुढे तीन-चार वर्षांत त्यांची कविता अधिकाधिक खुलत गेली. 1907 साली जळगाव येथे भरलेल्या पहिल्या मराठी कविसंमेलनात त्यांनी केलेल्या काव्यवाचनामुळे प्रभावित होऊन संमेलनाध्यक्ष कान्होबा कीर्तिकर यांनी त्यांना ‘बालकवी’ हे नाव देऊन त्यांचा गौरव केला. त्यानंतर लवकरच मराठीतील श्रेष्ठ कवी म्हणून त्यांचा लौकिक झाला आणि ‘बालकवी’ हे नावही रूढ झाले.

    हेही वाचा – हिथ लिजर आणि आपण

    निसर्गकवी म्हणून बालकवी ओळखले जातात. त्यांच्या बहुतांश कवितांमध्ये निसर्ग हा मध्यवर्ती असल्याचे दिसते. रूढ अर्थाने निसर्गसौंदर्याचे वर्णन हा अशा कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी एकरूप झालेल्या कवीचे ते शब्द आहेत. निसर्गातील विविध दृश्यांमध्ये त्यांना मानवी भावना दिसतात. ही गोष्ट आधुनिक मराठी कवितेत काहीशी अनोखी होती.

    बालकवींचा पिंडच निराळा होता पण बालकवी म्हणजे स्वप्नाळू, निरागस वृत्तीचे कवी नव्हते, कारण त्यांच्या उत्तर आयुष्यातील काही कवितांचा सूर अगदी निराळा होता. निसर्गाची खिन्न, उजाड रूपे त्यांच्या मनाला घेरून होती. ‘काय बोचते ते समजेना, हृदयाच्या अंतर्हृदयाला’ अशी जीवघेणी अस्वस्थता त्यांना विफल करणारी होती. ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे’ असं सांगणारे बालकवी ‘झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर’ अशा गूढ वाटणाऱ्या ओळीही लिहिताना दिसतात.

    मराठी काव्य क्षेत्रात मर्ढेकरांच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या आरंभीच्या कवितेवर तो स्पष्टपणे दिसतोच. पण त्यांनी नंतर लिहिलेल्या आणि वरवर फार वेगळ्या वाटणाऱ्या, नवकवितेतही सूक्ष्मपणे  तो आढळतो. त्यानंतर ग्रेस आणि ना. धों. महानोर यासारख्या परस्परांहून भिन्न प्रकृतीच्या कवींच्या घडणीतही बालकवींचा मोठा प्रभाव होता. 5 मे 1918 रोजी जळगावजवळील भादली स्टेशनपाशी रेल्वे रूळ ओलांडताना गाडीखाली सापडून बालकवींना मरण आले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आजचा दिवस व्यग्र आणि धावपळीचा असू शकतो. अनेक जबाबदाऱ्यांमुळे मनावरचा ताण वाढू शकतो. त्यातून इतरांशी किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे  बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुमचा नम्रपणा आणि आनंदी स्वभाव बिघडत चाललेली परिस्थिती निवळण्यास मदत करेल. स्वतःच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून संतुलित आहार घ्या.

    वृषभ – आजचा दिवस यश आणि सन्मानांनी भरलेला असेल. प्रभावशाली व्यक्तींना भेटल्याने भविष्यासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. तुमच्या कार्यनिष्ठेचे आणि मेहनतीचे सर्वत्र कौतुक होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि तुमची एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. मात्र कामासोबतच स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्या.

    मिथुन – आनंद आणि शांतीने भरलेला असा दिवस असेल. कामाच्या ठिकाणी योग्य दिशा आणि मार्गदर्शनामुळे अनेक महत्त्वाची कामे सहजपणे पूर्ण होतील. राजकारण, सामाजिक क्षेत्र किंवा इतर कोणत्याही नवीन क्षेत्रात प्रवेश करण्याचा विचार करत असाल, तर प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या. भूतकाळातील एखादी गोष्ट उघडकीस येऊ शकते, त्यामुळे संयम बाळगा. मालमत्तेच्या संदर्भात किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, मात्र संयम बाळगल्यास अनुकूल परिणाम मिळण्यास मदत होईल.

    कर्क – आत्मविश्वास हीच तुमची आज सर्वात मोठी ताकद असेल. एक मोठा व्यावसायिक करार तात्पुरता थांबण्याची शक्यता आहे, पण निराश होण्याची गरज नाही. योग्य वेळ आल्यावर परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. महिला जातकांना माहेरून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सहलीचे नियोजन केले जाऊ शकते, ज्यामुळे मानसिक ताण कमी होईल. शेजारी किंवा जवळपासच्या लोकांशी अनावश्यक वाद टाळा. सरकारी कामात निष्काळजीपणा करण्याऐवजी, प्रत्येक दस्तऐवज आणि कार्यपद्धतीकडे बारकाईने लक्ष द्या.

    सिंह – घरी आणि कामाच्या ठिकाणी आज संतुलन राखावे लागेल. जबाबदाऱ्या वाढतील, पण तुमची मेहनत आणि आत्मविश्वास यामुळे यश निश्चित होईल. परदेशात काम करणाऱ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. घाईने घेतलेला निर्णय नंतर समस्या निर्माण करू शकतो. जर तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कर्ज किंवा आर्थिक व्यवस्थेबद्दल योग्य व्यक्तीशी चर्चा होऊ शकते.

    कन्या – आज तुमची सर्जनशील विचारसरणी आणि प्रतिभा लोकांना प्रभावित करेल. भविष्यातील आर्थिक अडचणी टाळण्यासाठी उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखणे आवश्यक असेल. कार्यालयीन जबाबदाऱ्या पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडाल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. संततीच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा.

    तुळ – आजचा दिवस एखादा मोठा बदल आणि एका नव्या पर्वाची सुरुवात दर्शवतो. नोकरी बदलण्याची किंवा नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळू शकते. स्वतःसाठी एखादी नवीन आणि आवडती वस्तू खरेदी करावीशी वाटेल.  सभोवतालच्या लोकांवर आंधळा विश्वास ठेवणे टाळा. एखादा प्रलंबित व्यवहार किंवा योजना आज पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला प्रचंड आनंद होईल.

    वृश्चिक –  बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ लागतील. प्रत्येक टप्प्यावर आज तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आईच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने मोठा दिलासा मिळेल. प्रवासादरम्यान तुम्हाला महत्त्वाची माहिती किंवा नवीन संधी मिळू शकते. जुने कौटुंबिक मतभेद संवाद आणि सामंजस्याने मिटतील, ज्यामुळे आनंदी आणि सकारात्मक वातावरण पुन्हा निर्माण होईल.

    हेही वाचा – एआयच्या पलीकडे…

    धनु – आजचा दिवस व्यग्र असेल, पण तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. जबाबदारी वेळेवर पूर्ण करण्याची सवय यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठराल. जोडीदाराकडून मिळालेली एखादी भेटवस्तू तुमचा दिवस अविस्मरणीय बनवू शकते. प्रवासादरम्यान, तुम्हाला अशी माहिती मिळू शकते जी भविष्यात फायदेशीर ठरेल. संततीचे यश किंवा त्यांच्याशी निगडीत एखादी बातमी संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आणेल.

    मकर – तंत्रज्ञान, शिक्षण आणि ज्ञान क्षेत्राशी संबंधित जातकांसाठी दिवस अनुकूल असेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल आणि प्रत्येक अनुभवातून तुम्ही काहीतरी नवीन शिकाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे त्यांच्या अभ्यासात सकारात्मक परिणाम दिसून येतील. शासकीय कामात काही विलंब किंवा घाई होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम बाळगा. इतरांवर जास्त अवलंबून राहणे टाळा.

    कुंभ – नवीन सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्याच्या किंवा नवीन उपक्रम राबवण्याच्या कल्पना यशस्वी ठरू शकतात. आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी उचललेली पावले भविष्यात फायदेशीर ठरतील. कुटुंबाचा पाठिंबा आणि सहकार्य तुम्हाला प्रत्येक निर्णयात आत्मविश्वास देईल. जुनी कर्जे किंवा आर्थिक जबाबदाऱ्या कमी करण्यात चांगली प्रगती होईल. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि गरज भासल्यास वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या.

    मीन – आज व्यवसाय आणि करिअरमध्ये यशाची सकारात्मक चिन्हे दिसत आहेत. नवीन प्रकल्पांमुळे खर्च निश्चितपणे वाढेल, परंतु त्या गुंतवणुकीतून भविष्यात नफा मिळेल. एका दीर्घकाळच्या समस्येचे निराकरण झाल्याने दिलासा मिळेल. आर्थिक संतुलन राखण्यासाठी अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल. मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्या. जोडीदारासोबत समन्वय आणि परस्पर सामंजस्य राखल्यास प्रत्येक काम यशस्वी होईल याची खात्री बाळगा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 ऑगस्ट 2026

    August 12, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 ऑगस्ट 2026

    August 11, 2026 पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश

    August 10, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 ऑगस्ट 2026

    By Team AvaantarAugust 12, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 12 ऑगस्ट 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 21…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 ऑगस्ट 2026

    August 11, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – मानसिक आरोग्य, यश

    August 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑगस्ट 2026

    August 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    शार्वीची वेगळी खेळी

    August 13, 2026

    कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    August 13, 2026

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026

    आई लहान की मुलगी?

    August 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे

    August 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 ऑगस्ट 2026

    August 13, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 394
    • अवांतर 204
    • आरोग्य 138
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 531
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 847
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शार्वीची वेगळी खेळी

    August 13, 2026

    कोणाशी बोलावे, आई की…? उमाला प्रश्न

    August 13, 2026

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.