Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 12 जानेवारी 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 12 जानेवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 12, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 12 जानेवारी 2026; वार : सोमवार
    • भारतीय सौर : 22 पौष शके 1947; तिथि : नवमी 12:42; नक्षत्र : स्वाती 21:04
    • योग : धृति 18:11; करण : वणिज 25:59
    • सूर्य : धनु; चंद्र : तुळ; सूर्योदय : 07:14; सूर्यास्त : 18:17
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – आज आत्मविश्वासाने भरलेले असाल. कामाच्या बाबतीत जलद निर्णय घ्याल आणि बहुतांश निर्णय बरोबर असतील. ऑफिसमध्ये तुमचे कठोर परिश्रम दिसून येतील. आर्थिक परिस्थिती चांगली असेल, परंतु अनावश्यक खर्च टाळा. कौटुंबिक पाठिंब्यामुळे मन हलके आणि मजबूत होईल.

    वृषभ – आजचा दिवस स्थिरता आणि विश्रांतीचा आहे. संयमाने तुमचे काम करा. आज कौटुंबिक मार्गदर्शन मिळेल, एखाद्या कायदेशीर खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने येईल. आर्थिक निर्णय सुज्ञपणे घ्या. नातेसंबंधांवरील विश्वास वाढेल, कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

    मिथुन – दिवस व्यग्र राहील. संभाषणे, बैठका यामुळे तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी येऊ शकतात. अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात, म्हणून स्वतःच्या बजेटचे भान ठेवा. मित्रांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचे एखादे काम सोपे होईल.

    कर्क – आज भावनाशीलता थोडी जास्त असेल. कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला संतुलन राखावे लागेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याने सांगितलेली गोष्ट तुम्हाला विचार करायला लावू शकते. आर्थिक बाबी सामान्य राहतील. स्वतःसाठी थोडा वेळ काढा.

    सिंह – तुमचे नेतृत्व कौशल्य दिसून येईल. कामाच्या ठिकाणी तुमचे म्हणणे ऐकले जाईल आणि तुम्हाला जबाबदारी मिळू शकते. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे आहेत. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. फक्त नातेसंबंधांमधील अहंकार टाळा, कारण यामुळे सुसंवाद टिकेल.

    कन्या – जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण तुम्ही त्या व्यवस्थित सांभाळाल. मेहनतीचे फळ तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. तुमचे कुटुंब तुम्हाला सतवणाऱ्या चिंतांकडे गांभीर्याने बघेल. स्वतःच्या आरोग्याकडे मात्र लक्ष द्या. पथ्यपाणी व्यवस्थित सांभाळा.

    तुळ – आज तुमचे  सगळे लक्ष कामाकडेच असेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या मेहनतीने खूश असतील. आर्थिक परिस्थिती संतुलित राहील. फक्त स्वतःच्या आरोग्याबद्दल निष्काळजीपणा टाळा. जंक फूडपासून दूर राहा.

    वृश्चिक – आज नवीन कल्पना आणि योजना मनात येतील. कामावर काहीतरी वेगळे करण्याचा विचार करत असाल तर हा अनुकूल काळ आहे. मित्र आणि सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. खर्च नियंत्रणात ठेवा. आज मानसिकदृष्ट्या हलके वाटेल.

    धनु – आज मानसिक संतुलन राखणे महत्त्वाचे असेल. आज काम आणि वैयक्तिक जीवन या दोन्हीमध्ये देखील संतुलन राखावे लागेल. भागीदाराशी वाटाघाटी केल्याने तुमच्या समस्या सोडवण्यास मदत होईल. हुशारीने खर्च करा. नातेसंबंधांमध्ये सुसंवाद राहील.

    हेही वाचा – परतीचा प्रवास… डोक्यात त्याचाच विचार

    मकर – आज आंतरिक शक्ती आणि आत्मविश्वास जाणवेल. करिअरबाबत मोठा निर्णय घ्यावासा वाटेल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. आज कुटुंबात तुमच्या मतांना महत्त्व दिले जाईल. राग मात्र नियंत्रित करा.

    कुंभ – आज नशीब तुमच्या बाजूने असेल. प्रलंबित कामे पुढे सरकू शकतात. प्रवास घडण्याची किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. सुरक्षित गुंतवणुकीवर भर द्या. कौटुंबिक नातेसंबंध सकारात्मक राहतील. तुमचे मन उत्साही राहील.

    मीन – आज मन शांत आणि संवेदनशील असेल. तुम्हाला सर्जनशील कामांमध्ये रस वाटेल. तुमच्या कारकिर्दीत हळूहळू सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. पैशाच्या बाबतीत जोखीम घेण्याचे टाळा. कुटुंब आणि प्रियजनांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला शांती मिळेल.


    दिनविशेष

    भारतीय संस्कृतिकोशाचे व्यासंगी संपादक महादेवशास्त्री जोशी

    टीम अवांतर

    भारतीय संस्कृतिकोशाचे व्यासंगी संपादक आणि मराठी लेखक महादेवशास्त्री जोशी यांचा जन्म 12 जानेवारी 1906 रोजी गोव्यातील सत्तरी विभागातील आंबेडे या गावी झाला. शालेय शिक्षण त्यांनी घेतले नसले तरी, पारंपरिक पद्धतीने संस्कृत व्याकरण, काव्यशास्त्र तसेच ज्योतिष या विषयांचे अध्ययन त्यांनी आंबेडे, धावे आणि सांगली येथे केले. त्यानंतर 1926 साली ‘सत्तरी शिक्षण संस्था’ स्थापन करून त्यांनी स्वतःला शिक्षणप्रसारास वाहून घेतले.
    1935 साली ते पुण्यास आले; तेथे पुराणे-प्रवचने करू लागले. 1938 पासून भक्तिज्ञान, वैराग्यादी विषयांना वाहिलेल्या चैतन्य मासिकाचे सहसंपादक म्हणून ते काम पाहू लागले. याच नियतकालिकात 1934 मध्ये ‘राण्यांचे बंड’ ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर अनेक वर्षे त्यांनी सातत्याने कथालेखन केले.

    वेल विस्तार त्यांचा हा पहिला कथासंग्रह 1941 मध्ये प्रकाशित झाला. 1957 पर्यंत त्यांचे एकूण दहा कथासंग्रह प्रसिद्ध झाले. खडकांतले पाझर, विराणी, घररिघी हे त्यांपैकी काही प्रसिद्ध कथासंग्रह. त्यांच्या अनेक कथा गोव्यातील जीवनाच्या पार्श्वभूमीवर आहेत. त्यांच्या काही कथांवर मराठीत चित्रपट काढण्यात आलेले आहेत; काही कथांचे हिंदी अनुवादही झाले आहेत.

    विविध भारतीय भाषांमधील, तसेच परभाषांतील संस्कृतिविषयक ग्रंथांचे अवलोकन करून दशखंडात्मक भारतीय संस्कृतिकोश  त्यांनी निर्माण केला. 1962 ते 1974 ह्या कालखंडांत य कोशाचे एकूण आठ खंड प्रसिद्ध झाले. भारतीय संस्कृतीच्या विविध अंगांची उपयुक्त माहिती त्यांत संग्रहित झालेली आहे. पुढील दोन खंडांचे कार्यही त्यांनी अल्पावधीत पूर्ण केले.

    भारतातील विविध प्रदेश, तीर्थक्षेत्रे, लोककथा, कर्तृत्ववान व्यक्ती यांसंबंधीचे स्वतंत्र ग्रंथही त्यांनी लिहिले. भारतदर्शन ही त्यांची प्रवासवर्णनमाला होय. त्यांची ग्रंथसंपदा मोजली तर ती संख्या चाळीसहून अधिक भरेल. 12 डिसेंबर 1992 रोजी त्यांचे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    By Team AvaantarApril 16, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 एप्रिल 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 26…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य;13 एप्रिल 2026

    April 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 269
    • अवांतर 182
    • आरोग्य 101
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 386
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 557
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026
    Most Popular

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.