दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 11 सप्टेंबर 2025; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 20 भाद्रपद शके 1947; तिथि : चतुर्थी 12:45; नक्षत्र : अश्विनी 13:57
- योग : ध्रुव 17:04; करण : कौलव 23:21
- सूर्य : सिंह; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:45
- पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
पंचमी श्राद्ध
भरणी श्राद्ध
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकेल, ज्यामुळे ताण कमी होईल आणि मन आनंदी राहील. राजकारणाच्या क्षेत्राशी संबंधित जातकांना त्यांच्या अपेक्षेनुसार यश मिळू शकते. नोकरदार जातकांसाठी कामाच्या ठिकाणी वातावरण आनंददायी राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल, मात्र आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
वृषभ – व्यवसायाच्या दृष्टीने एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. परिस्थिती तुमच्या बाजूने असेल, त्यामुळे नफा कमावण्याच्या संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतीतही दिवस अनुकूल राहणार आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम बघायला मिळतील. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंददायी वेळ घालवाल.
मिथुन – आज एखाद्या मौल्यवान वस्तू किंवा दागिना यांचा लाभ होऊ शकेल. नोकरीच्या ठिकाणी जास्त कामामुळे व्यग्र रहाल. अनावश्यक खर्च टाळावा लागेल, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे कौटुंबिक कामे हातावेगळी कराल. वाहन चालवताना मात्र काळजी घ्यावी लागेल.
कर्क – या राशीच्या जातकांसाठी दिवस खूप चांगला जाणार आहे. आर्थिक बाबतीत अचानक मोठी रक्कम मिळू शकते, त्यामुळे आर्थिक स्थितीही मजबूत असेल. व्यवसाय योजना वेगाने पुढे जातील आणि समाजातील आदर वाढेल. मात्र घाईघाईने किंवा विचार न करता कोणताही निर्णय घेण्याचे टाळावे लागेल.
सिंह – कामाच्या ठिकाणी काही सकारात्मक बदल दिसू शकतात, जे तुमच्या बाजूने असतील. मात्र यामुळे विरोधकांची संख्या वाढू शकते. अर्थात, तुमच्या गोड बोलण्याने आणि वागण्याने परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळाल. गरजवंत व्यक्तीला मदत देखील करू शकता. त्याच कौटुंबिक बाबींच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
हेही वाचा – तीन पिढ्यांची कहाणी…
कन्या – दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. काही महत्त्वाच्या कामांवर पैसे खर्च करावे लागू शकतात. त्याच वेळी, कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्याविरुद्ध योजना आखू शकतात, परंतु तुम्ही हुशारीने परिस्थिती सहजपणे हाताळाल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
तुळ – शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला असेल, तर आज काहीतरी विशेष साध्य करू शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे मन आनंदी राहील. समाजात विशेष आदर मिळेल. कामाच्या बाबतीत जास्त मेहनत आरोग्यावर परिणाम करू शकते. व्यवसायाच्या दृष्टीने प्रवास केल्यास त्याचे अनुकूल परिणाम मिळतील.
वृश्चिक – आर्थिक बाबतीत दिवस सकारात्मक आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल. कोणतेही महत्त्वाचे काम बराच काळ अडकले असेल तर ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र काही प्रकरणांमध्ये बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. संध्याकाळी काही प्रिय व्यक्तींची भेटू होऊ शकते.
धनु – सांसारिक सुखांच्या साधनांमध्ये वाढ होऊ शकते. मात्र कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल, अन्यथा पैसे अडकू शकतात. कोणत्याही प्रकारच्या न्यायालयीन किंवा कायदेशीर बाबींपासून दूर राहणे फायदेशीर ठरेल. घरासाठी काही आवश्यक वस्तू खरेदी करू शकता.
मकर – व्यवसायात चांगला नफा मिळेल, ज्यामुळे मानसिकदृष्ट्या शांतता मिळेल. व्यवसाय बदल करण्याची योजना देखील आखता येईल. शिक्षण क्षेत्रात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा वाहन दुरुस्तीचा खर्च वाढू शकतो.
कुंभ – मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत आवश्यक कागदपत्रे नीट वाचा आणि काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्या. खर्च वाढण्याची शक्यता आहे. शिवाय जास्त कामामुळे मान मोडून काम पूर्ण करावे लागेल. कौटुंबिक बाबतीत दिवस सामान्य राहणार आहे.
हेही वाचा – परतवारी… ही देखील ऐश्वर्यवारीच!
मीन – व्यवसायाच्या निमित्ताने एखाद्या प्रवासाला जावे लागू शकते, यातून मनाजोगे परिणाम मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या बाबतीत, प्रगतीच्या मार्गावर प्रवास सुरू आहे. संध्याकाळी कुठेतरी बाहेर जाण्याची योजना आखाल ज्यामुळे काही काळ तरी तुम्ही रिलॅक्स व्हाल. विद्यार्थ्यांची मानसिक तणावातून सुटका होऊ शकते.
दिनविशेष
आधुनिक मराठी कवी अनिल
टीम अवांतर
कवी ‘अनिल’ या टोपण नावाने काव्यलेखन करणारे आधुनिक कवी अनिल म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे यांचा जन्म 11 सप्टेंबर 1901 रोजी मूर्तिजापूर येथे झाला. बीए,एल्एल् बी झालेल्या कवी अनिल यांचा 1932 साली फुलवात हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यात 1920 ते 1931 या कालखंडातील त्यांच्या कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या कवितांमध्ये प्रेमजीवनातील उत्कट अनुभूतींचा गूढ आणि प्रतीकात्मक आविष्कार बघायला मिळतो. त्यानंतर प्रेम आणि जीवन, भग्नमूर्ति आणि निर्वासित चिनी मुलास ही त्यांची खंडकाव्ये मुक्तच्छंदातच रचलेली आहेत. याशिवाय, ‘सांगाती’ हा काव्यसंग्रहही प्रसिद्ध झाला आहे. मुक्तछंद हा अनिलांच्या पुरस्काराचा, प्रयोगशीलतेच्या आणि जिव्हाळ्याचा विषय होता. याशिवाय दशपदी म्हणजे 10 चरणांची कविता हा प्रकार कवी अनिल यांनी सुरू केला. 1966मधील विदर्भ साहित्य संमेलनाचे तसेच 1958 मधील मालवण येथील महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1964पासून ते साहित्य अकादमीचे सभासद होते. या संस्थेने त्यांच्या भग्नमूर्ति या खंडकाव्याची अन्य भारतीय भाषांतील अनुवादासाठी निवड केली. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचेही ते सभासद होते. प्रसिद्ध मराठी लेखिका आणि टीकाकार कुसुमावती देशपांडे या त्यांच्या पत्नी होत्या. 8 मे 1982 रोजी नागपूर येथे त्यांचे निधन झाले.