दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 10 ऑगस्ट 2025; वार : रविवार
भारतीय सौर : 19 श्रावण शके 1947; तिथि : प्रतिपदा 12:10; नक्षत्र : धनिष्ठा 13:52
योग : शोभन 24:01; करण : तैतील 23:24
सूर्य : कर्क; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:17; सूर्यास्त : 19:09
पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
आदित्य पूजन
हेही वाचा – Ayurveda : आदान काल आणि विसर्ग काल
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
जनरल अरुणकुमार वैद्य
टीम अवांतर
भारताचे दहावे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्म अलिबाग येथे 27 जानेवारी 1926 रोजी झाला. 1944 साली त्यांनी सैन्यात कॅडेट म्हणून प्रवेश मिळविला. 1945 मध्ये ‘डेक्कन हॉर्स’ या चिलखती दलात त्यांची सेकंड लेफ्टनंट या पदावर नेमणूक झाली. निजामाच्या हैदराबाद संस्थानावरील कारवाईत त्यांनी 1948 मध्ये दौलताबाद, परभणी या भागांत कॅप्टन या नात्याने महत्त्वाची कामगिरी पार पाडली. ते लडाखमध्ये एक वर्ष कामगिरीवर होते. काही काळ दिल्ली येथे सैनिकी सचिवाच्या विभागात लेफ्टनंट कर्नल म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. 1965च्या भारत आणि पाकिस्तान युद्धात वैद्य यांनी दाखविलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने महावीरचक्र बहाल करून त्यांचा गौरव केला. त्यानंतर ब्रिगेडिअर या पदावर त्यांची पदोन्नती झाली. पूर्व विभागात 167 पर्वतीय ब्रिगेडचे कमांडर म्हणूनही त्यांनी काम केले. त्यावेळी नागा बंडखोरांना पकडण्याची यशस्वी मोहीम त्यांनी पार पाडली. त्याबद्दल त्यांना अतिविशिष्ट सेवापदकाने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी धैर्य आणि रणनेतृत्व दाखवून शत्रूला नामोहरम केले. त्यांच्या तुकडीने शत्रूच्या प्रदेशात 20 किमी आतमध्ये मजल मारून शत्रूचे 60 रणगाडे नष्ट केले, याशिवाय बसनारनजिकचा महत्त्वाचा पूलही काबीज केला. त्यांच्या कुशल रणनीतीबद्दल भारत सरकारने त्यांना दुसऱ्यांदा महावीरचक्र प्रदान केले. दोनदा महावीरचक्र मिळविणारे अरुणकुमार वैद्य हे एकमेव सेनाधिकारी ठरले. पुढे 1983 साली ते भारतीय लष्कराचे प्रमुख बनले. 1984 मध्ये अमृतसर येथील सुवर्णमंदिरातून खलिस्तानवादी सशस्त्र अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार ही सैनिकी कारवाई करण्यात आली. त्याचा राग मनात धरून शीख अतिरेक्यांकडून त्यांना सातत्याने धमक्या मिळत होत्या. 31 जानेवारी 1986 रोजी जनरल वैद्य लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झाले आणि पुण्यात स्थायिक झाले. 10 ऑगस्ट 1986 या दिवशी पुण्यातील क्वीन्स गार्डन भागात अतिरेक्यांनी त्यांच्या मोटारीचा पाठलाग करून त्यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली.
हेही वाचा – Ayurveda : शिशिर ऋतुचर्या