दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 16 मार्च 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 25 फाल्गुन शके 1947; तिथि : द्वादशी 09:40; नक्षत्र : धनिष्ठा 30:21;
- योग : शिव 09:36; करण : गरज 21:36;
- सूर्य : मीन; चंद्र : मकर 18:13; सूर्योदय : 06:48; सूर्यास्त : 18:47;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : विश्वावसू;
- शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
सोमप्रदोष
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
प्रसिद्ध सतारवादक आणि संगीतकार पंडित भास्कर चंदावरकर
टीम अवांतर
प्रसिद्ध सतारवादक आणि संगीतकार पंडित भास्कर चंदावरकर यांचा जन्म 16 मार्च 1936 रोजी पुण्यात झाला. पंडित रवीशंकर, त्यांच्या पत्नी अन्नपूर्णादेवी आणि पंडित उमाशंकर मिश्रा यांच्याकडून सतारवादनाचे धडे त्यांनी गिरवले. त्यांचे भारतातील प्रांतोप्रांतीच्या लोकसंगीतांवर आधारित अनेक वाद्य अल्बम्स प्रकाशित झाले आहेत. याशिवाय, त्यांनी अनेक भाषांमधील चित्रपटांनाही संगीतही दिले. हे सर्व कलात्मक चित्रपट होते, ज्यांना भावपूर्ण आणि आशयानुरूप संगीत देऊन भास्कर चंदावरकर यांनी एक प्रतिभावंत संगीतकार म्हणून ठसा उमटवला.
घाशीराम कोतवाल, तीन पैशांचा तमाशा,, ये रे ये रे पावसा, जेतेगिरी ही नाटकं त्यांनी संगीतबद्ध केली. याशिवाय सामना, सिंहासन, एक डाव भूताचा, गारंबीचा बापू, आक्रित, चांदोबा चांदोबा भागलास का?, सर्वसाक्षी, मातीमाय, कैरी, बयो, श्वास, सरीवर सरी सारखे मराठी, नाइन अवर्स टू रामा, अ लँप इन द निश हे इंग्रजी, रावसाहब, थोडासा रुमानी हो जाए, जय जवान जय किसान, माया दर्पन, जादू का शंख, अरविंद देसाई की अजीब दास्तान, अल्बर्ट पिंटो को घुस्सा क्यो आता है, हमिदाबाई की कोठी सारख्या हिंदी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिलं.
हेही वाचा – रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’
‘स्वप्नकोष’ हा बॅले, ‘प्रतिमा’ हे नृत्यनाट्य, ‘वोल्गा ते गंगा’, ‘रंगविविधा’ यांसारख्या रंगमंचीय सादरीकरणातून आपल्या प्रतिभेचा प्रत्यय रसिकांना दिला. कविवर्य आरती प्रभू यांच्या कवितांवर आधारित ‘नक्षत्रांचे देणे’ हा चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेला काव्य-संगीताचा कार्यक्रमही एक वेगळा अनुभव देणारा ठरला.
1988 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले, तर ‘चैत्र’ या मराठी लघुपटासाठी 2002 साली सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला. रंगभास्कर, वाद्यवेध आणि चित्रभास्कर ही त्यांची अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी पुण्याच्या फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये सुमारे 15 वर्षे संगीत विषयाचं अध्यापन केलं. झेअशा या वादक तसेच संगीतकाराचे 26 जुलै 2009 रोजी निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस अनुकूल असेल. कामात यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते. शिवाय, अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल. आज जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्या, पौष्टिक आहार घ्या.
वृषभ – आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. खर्च वाढू शकतो, म्हणून आर्थिक व्यवस्थापनाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल मिळेल. तुमच्या मेहनतीची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने व्यवहारांवर नियंत्रण ठेवा. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
मिथुन – आजचा दिवस फलदायी असेल. तुमच्या कठोर परिश्रम आणि प्रयत्नांना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते. व्यवसायात चांगला नफा होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात काही किरकोळ तणाव असू शकतो, परंतु प्रेम कायम राहील. तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ वाटेल.
कर्क – आजचा दिवस सामान्य असेल. काही महत्त्वाची कामे मधेच अडकू शकतात. कामात यश मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. आर्थिक परिस्थिती फार बदल होणार नाही. कौटुंबिक जीवनात काही आव्हाने उद्भवू शकतात. थोडेसे अस्वस्थ वाटेल, म्हणून काळजी घ्या.
सिंह – आजचा दिवस चांगला राहील. कामावर तुमचा प्रभाव वाढू शकतो, त्याचबरोबर जबाबदाऱ्याही वाढू शकतात. खर्च नियंत्रणात राहतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती संतुलित राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याबद्दल काळजी वाटू शकते.
कन्या – शहाणपणाने निर्णय घेण्याची गरज आहे. नोकरीच्या ठिकाणी चांगल्या संधी येऊ शकतात. व्यवसायातही चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सामान्य राहील. प्रियजनांसोबत बाहेर जाण्याची योजना आखू शकता. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या.
हेही वाचा – कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…
तुळ – आजचा दिवस आनंदाचा असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगला समन्वय असेल. व्यवसायानिमित्त प्रवासाची शक्यता आहे आणि तिथे लोकांशी होणारी ओळख भविष्यात फायद्याची ठरेल. आर्थिक परिस्थिती संतुलित असेल. कुटुंबात वाद निर्माण होणार नाहीत, यासाठी संयम ठेवावा लागेल. आरोग्य सामान्य राहील.
वृश्चिक – आजचा दिवस अनुकूल असेल. अडकलेले पैसे परत मिळतील. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती पूरक असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
धनु – आज मानसिक ताण जाणवू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे देखील आहेत. नोकरीच्या ठिकाणी कामात मध्यम प्रगती होईल. खर्च आणि उत्पन्न दोन्ही वाढू शकतात. कौटुंबिक जीवनात थोडी कटूता निर्माण होऊ शकते. काळजीपूर्वक वाहन चालवा. पित्ताचा त्रास होऊ शकतो.
मकर – आजचा दिवस मध्यम स्वरूपात फलदायी असेल. जास्त कामामुळे थकवा आणि ताण येऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती हळूहळू सुधारेल. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. वरिष्ठ पातळीवर याची गांभर्याने दखल घेतली जाईल. वैवाहिक जीवन आनंददायी असेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
कुंभ – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. कार्यालयात सहकाऱ्यांची भूमिका सहकार्याची असते. व्यवसाय आणि नोकरीत यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नातही वाढ होऊ शकते. कुटुंबात किरकोळ वाद निर्माण होऊ शकतात. बाहेरच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे.
मीन – आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. तुमची बुद्धिमत्ता आव्हानांवर मात करण्यास मदत करेल. कामात प्रगतीची चिन्हे दिसतील. आर्थिक बाबी चांगल्या असतील. कौटुंबिक जीवनात जोडीदाराकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल.


