दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 07 जुलै 2025, वार : सोमवार
भारतीय सौर : 16 आषाढ शके 1947, तिथि : द्वादशी 23:09, नक्षत्र : अनुराधा 25:11
योग : शुभ 22:01, करण : बव 10:15
सूर्य : मिथुन, चंद्र : वृश्चिक, सूर्योदय : 06:06, सूर्यास्त : 19:20
पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
वामन पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे पंचांग
मेष – अवतीभवतीचे लोक कामाच्या खूप अपेक्षा ठेवतील. परंतु जेवढे काम करू शकता तेवढ्याचेच वचन द्या. फक्त लोकांना खुश ठेवण्यासाठी कामाचा ताण घेऊन नका. सहजपणे भांडवल उभे राहील. गरजवंतांना मदत करण्याच्या वृत्तीमुळे आदर मिळेल.
वृषभ – आर्थिकदृष्ट्या दिवस लाभदायक ठरेल. अनुकूल ग्रह नक्षत्रांमुळे धनप्राप्तीचे चांगले योग आहेत. त्याचबरोबर कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा.
मिथुन – इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी विचार आणि ऊर्जा वापरा, फक्त कल्पनाविश्वात रमू नका. केवळ विचार करता, प्रयत्न करत नाही, हा खरा प्रश्न आहे. आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. नवीन गोष्टी शिकण्याकडे असलेला कल उल्लेखनीय ठरेल.
कर्क – निडरपणा मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल. कोणतीही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खंबीर भूमिका सहाय्यभूत ठरेल. पर्यटन क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत. महत्त्वाकांक्षा ओळखण्याची वेळ आहे आणि त्यानुसार मेहनत करायला हवी.
सिंह – मानसिक शांततेसाठी तणाव दूर करा. खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. – सल्ला मागण्यासाठी लोक तुमच्याकडे येतील आणि तुमचा प्रत्येक शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल.
कन्या – प्रदीर्घ काळापासून असलेल्या तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केलात तर कौटुंबिक जीवनावर परिणाम होईल.
हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान
तुळ – प्रचंड प्रमाणात ऊर्जा असूनही कामाच्या ताणामुळे त्रासून जाल. अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील, त्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण कराल.
वृश्चिक – संयम बाळगा. निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्याच्या वृत्तीमुळे यशप्राप्ती होईल. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. कठीण समयी मदत करणाऱ्या नातेवाईकांप्रती कृतज्ञता व्यक्त करा.
धनु – चार भिंतींबाहेरील खेळ आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा फायदा होईल. पैशांची आवश्यकता भासेल परंतु, ते सहजपणे मिळणार नाहीत. आपल्या कामाबाबत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल.
मकर – स्वत:साठी काय चांगले आहे, हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. आर्थिक स्थितीतील बदल होतील. तुमच्या कामाचे श्रेय दुसरेच कुणीतरी घेण्याची शक्यता आहे.
कुंभ – अनेक दिवस प्रलंबित निर्णयांना अंतिम स्वरूप मिळेल आणि नवे संयुक्त प्रकल्प मार्गी लागतील. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील परंतु, जसजसा दिवस पुढे जाईल, लाभ होईल. घरातून बाहेर पडताना मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, त्यामुळे धन लाभ होऊ शकतो.
मीन – चांगल्या कामाबद्दल आज कामाच्या ठिकाणी सन्मान केला जाईल. एखाद्या वस्तूच्या चोरीची शक्यता आहे, त्यामुळे सजग राहा. आर्थिक मुद्द्यावर कुणी टीका-टिपप्णी केल्यास लक्ष देऊ नका. मुलांकडे लक्ष द्या.
हेही वाचा – आयुर्वेद अन् ऋतुचर्या
दिनविशेष
टीम अवांतर
दिग्गज अभिनेते दिलीप कुमार
हिंदी सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये अग्रणी असलेले दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी स्वातंत्र्यपूर्व भारतातील पेशावर (सध्या पाकिस्तान) येथे झाला. त्यांचे मूळ नाव मोहम्मद युसूफ खान होय. त्यांचे कुटुंब 1930 साली मुंबई (बॉम्बे) येथे स्थलांतरित झाले. पुढे 1940मध्ये वडिलांशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी घर सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात करार पद्धतीवर काही काळ मिलिटरी कँन्टीनमध्ये काम करून ते पुन्हा घरी परतले. वडिलांना आर्थिक मदत करता यावी, यासाठी ते काम शोधत असताना 1943 साली त्यांची भेट तत्कालीन प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मसानी यांच्याशी झाली. त्यांनी दिलीप कुमार यांना प्रसिद्ध चित्रपट निर्मितीसंस्था बॉम्बे टॉकीजमध्ये काम करण्यास सुचविले आणि बॉम्बे टॉकीजच्या मालक अभिनेत्री देविका राणी यांनी त्यांना महिना साडेबाराशे रुपये पगारावर अभिनेता म्हणून कामावर रुजूही करून घेतले. याच दरम्यान देविका राणी यांच्या आग्रहावरून त्यांनी स्वतःचे नाव बदलून दिलीप कुमार केले. भारतीय सिनेसृष्टीत मेथड ॲक्टिंग हा प्रकार रुजवणारे ते पहिलेच अभिनेते होते. शोकांत, प्रगल्भ, अवखळ, संयत, तरल अशा अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांनी नटलेल्या आणि 65पेक्षा जास्त चित्रपट नावावर असलेल्या दिलीप कुमार यांच्या देदीप्यमान कारकिर्दीची सुरुवात 1944च्या बॉम्बे टॉकीजनिर्मित ज्वार भाटा या चित्रपटापासून झाली. 1950चे दशक हे दिलीपकुमार यांच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळ ठरले. या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक यशस्वी व प्रसिद्ध चित्रपटांत प्रमुख भूमिका केल्या. 1998 सालचा किला हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. सिनेसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल 1991मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. 1994 साली ‘दादासाहेब फाळके’ या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 2015 मध्ये ‘पद्मविभूषण’ या भारताच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. उत्तुंग प्रतिभेच्या या अभिनेत्याचे 7 जुलै 2021 रोजी वयाच्या 98व्या वर्षी निधन झाले.