दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 06 जुलै 2025, वार : रविवार
भारतीय सौर : 15 आषाढ शके 1947, तिथि : एकादशी 21:14, नक्षत्र : विशाखा 22:40
योग : साध्य 21:26, करण : वणिज 08:08
सूर्य : मिथुन, चंद्र : तुला 15:59, सूर्योदय : 06:05, सूर्यास्त : 19:20
पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
आषाढी एकादशी
देवशयनी एकादशी
चातुर्मास्यारंभ
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – नशिबावर हवाला ठेवून न राहता, आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, परंतु या सोबतच दान-पुण्यही केले पाहिजे. त्यामुळे मानसिक शांती मिळेल. तुमच्या कामाबद्दल सीनिअर कौतुक करतील.
वृषभ – आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करा. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मनावर दडपण येईल. रिकाम्या वेळेत कुठल्याही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा.
मिथुन – कुठलाही टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी परिणामांचा विचार करा. कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करणे, ही प्राथमिकता असेल. दिखावा करण्याचे टाळा, अन्यथा जवळचे लोक तुमच्यापासून दूर होतील.
कर्क – घरी बसून आराम करण्याची गरज आहे. आवडते छंद जोपासा आणि आनंद वाटेल अशा गोष्टी करा. अधिक काही खरेदी करण्याऐवजी आधीपासून ज्या गोष्टी आहेत, त्यांचा वापर करा. मानसिक शांततेचा अनुभव होईल.
सिंह – अत्यंत व्यग्र वेळापत्रकातदेखील आरोग्य चांगले राहील. बचतीचे नवे मार्ग सापडतील. शिवाय, दागदागिन्यांची खरेदी किंवा गृहोपयोगी वस्तूंची खरेदी संभवते. सावधनता बाळगा, कोणीतरी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्या सृजनशीलतेला पुढे नेण्यास चांगला दिवस आहे.
कन्या – प्रकृती चांगली नसल्यास लांबचे प्रवास टाळा. झटपट पैसा कमावण्याची इच्छा होईल. कुटुंबात पैशांवरून वाद होऊ शकतात. अयोग्य वाटणाऱ्या लोकांसोबतची संगत टाळा. वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल.
हेही वाचा – आयुर्वेद अन् ऋतुचक्र
तुळ – सकारात्मक विचार आणि उजळ बाजू विचारात घेतली तर, मनातील भीती दूर लोटू शकाल. घरातील काही कार्यक्रमानिमित्त जास्त खर्च करावा लागू शकतो. जीवनात सर्व गोष्टी तेव्हाच चांगल्या राहतात, जेव्हा व्यवहार सरळ असतात, त्यामुळे व्यवहारात सरळपणा आणण्याची आवश्यकता आहे.
वृश्चिक – दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. नातेवाईक अथवा जवळचे मित्रमंडळी यांच्याकडून आनंदवार्ता मिळेल. उच्च आत्मविश्वास चांगल्या कामासाठी वापरा. धावपळीचा दिवस असला तरी ऊर्जा टिकून राहील. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण दूर होईल.
धनु – आपले मत मांडण्यास कचरू नका. आत्मविश्वास ढळू देऊ नका, अन्यथा त्यामुळे प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील.
मकर – भांडखोर व्यक्तींशी वाद घातल्यामुळे मूड खराब होईल. शहाणपणाने असे प्रसंग टाळा. वादविवाद, समज-गैरसमज कधीच उपयुक्त ठरणार नाहीत. निष्काळजीपणामुळे आर्थिक तोटा होऊ शकतो. कुटुंबात किंवा नातेवाईकांकडे कुठल्या जुन्या घटनेविषयी बोलू नका अथवा संबंध ताणले जातील.
कुंभ – अप्रत्यक्षरीत्या केलेल्या मदतीमुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून मुक्त व्हाल. पत्नीशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, त्या स्वीकारण्यास शिका. जीवनात त्याचा उपयोग होतो.
मीन – आरोग्य अतिशय उत्तम असेल. अचानकपणे खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेल्या उत्पन्नामुळे त्याचा ताण जाणवणार नाही. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस आहे.
दिनविशेष
Team Avaantar
कथाकार, कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर
मराठीतील श्रेष्ठ कथाकार, कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांचा आज जन्मदिवस. 6 जुलै 1927 रोजी सांगली जिल्ह्यातील माडगूळे गावात जन्मलेले व्यंकटेश माडगूळकर हे सुप्रसिद्ध साहित्यिक, गीतकार ग. दि. माडगूळकर यांचे लहान बंधू. मात्र त्यांची एवढीच मर्यादित ओळख नव्हती. 1949 साली त्यांचा ‘माणदेशी माणसे’ हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. सुरुवातीला काही काळ पत्रकारिता करून 1950च्या सुमारास व्यंकटेश माडगूळकर मुंबईत आले आणि मराठी चित्रपटसृष्टीत पटकथालेखक म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण केले. गावाकडच्या गोष्टी, हस्ताचा पाऊस, काळी आई, जांभळीचे दिवस हे कथासंग्रह तर बनगरवाडी, वावटळ, पुढचं पाऊल, कोवळे दिवस, करुणाष्टक आणि सत्तांतर या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले. सत्तांतर या कादंबरीला 1983 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. याशिवाय, 1983 मध्ये आंबेजोगाई येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. तू वेडा कुंभार, सती, पती गेले गं काठेवाडी यासारखी नाटके आणि पुढचं पाऊल, वंशाचा दिवा, जशास तसे, सांगत्ये ऐका, रंगपंचमी यासारख्या चित्रपटांच्या कथा, पटकथा, संवादलेखनही त्यांनी केले. याशिवाय रानोमाळ भटकंती करणारे निसर्गप्रेमी, शिकारी, चित्रकार म्हणून देखील त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. 28 ऑगस्ट 2001 रोजी त्यांचे निधन झाले.
हेही वाचा – आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान
तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचा जन्मदिवस
1989 सालच्या नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित तिबेटी धर्मगुरू 14वे दलाई लामा यांचा आज 90वा जन्मदिवस आहे. 6 जुलै 1935 रोजी जन्मलेले दलाई लामा 1950 साली झालेल्या अयशस्वी उठावानंतर तिबेटहून भारतात आश्रयाला आले. तेव्हापासून ‘आपण भारताचे सर्वाधिक काळ पाहुणचार घेणारे पाहुणे आहोत,” असे उद्गार ते नेहमी काढतात. दलाई लामा हे तिबेटीयन जनतेचे अध्यात्मिक तसेच राजकीय धर्मगुरू असले तरी 2011पासून दलाई लामांनी आपल्या राजकीय भूमिकेचा त्याग केला आहे. दलाई लामांचा पुनर्जन्म होतो, अशी श्रद्धा असल्याने यंदा दलाई लामा आपल्या उत्तराधिकाऱ्याबाबत काय घोषणा करतात, याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. चीनने मात्र हा उत्तराधिकारी निवडीचा अधिकार आपला असल्याचे सांगत नवा वाद निर्माण केला आहे.