Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 ऑक्टोबर 2026

    October 3, 2026

    माधवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली…

    October 2, 2026

    सासूबाईंनी उमाला माहेरी जाण्यापासून थांबवलं…

    October 2, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, October 3
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 ऑक्टोबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 ऑक्टोबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 3, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 03 ऑक्टोबर 2026; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 11 आश्विन शके 1948; तिथि : सप्तमी 07:59, अष्टमी 29:51; नक्षत्र : आर्द्रा 25:29;
    • योग : वरियान 15:21; करण : बालव 18:54;
    • सूर्य : कन्या; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:27;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    कालाष्टमी

    अष्टमी श्राद्ध

    मराठी अभिजात भाषा गौरव दिन

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यातील नेते स्वामी रामानंद तीर्थ

    टीम अवांतर

    हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यातील एक नेते, समाजसुधारक, शिक्षण तज्ज्ञ, विद्वान स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 रोजी कर्नाटकातील सिंदगी येथे झाला. त्यांचे मूळ नाव होते व्यंकटेश भगवान खेडगीकर. सोलापूर, अंमळनेर आणि पुणे येथे त्यांचे शिक्षण झाले. पुणे येथील महाराष्ट्र विद्यापीठातून इतिहास, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांसह बी.ए. तसेच ‘लोकशाहीचा विकास’ हा प्रबंध लिहून एम.ए. पदवी संपादन केली.

    1926  मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर  काही वर्षे प्रसिद्ध कामगार नेते श्री. एन. एम. जोशी यांच्याकडे त्यांनी काम केले. सामाजिक जीवनाची पहिली ओळख त्यांना तेथे झाली. इथे असतानाच सोलापूर येथील कामगार संपात त्यांनी तुरुंगवास देखील भोगला. पुढे त्यांनी देशसेवेसाठी ही नोकरी सोडली.

    त्यानंतर त्यांनी हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेत सहा वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम केले. हिप्परगा येथे असतानाच त्यांनी संन्यास पत्करला आणि ‘स्वामी रामानंद तीर्थ’ या नावाने ते ओळखले जाऊ लागले.  हिप्परगा हे तत्कालीन हैदराबाद संस्थानातील लहानसे गाव. निजामाच्या सरंजामशाही आणि धर्मवेड्या राजवटीची पहिली ओळख स्वामीजींना हिप्परगा येथे झाली. हैदराबाद संस्थानात राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि जनमानसात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांनी मोमिनाबाद (आजचे अंबाजोगाई) येथे श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेची  स्थापना केली.

    हेही वाचा – नवमांश आणि विवाह

    स्वामीजींच्या राजकीय जीवनाची खऱ्या अर्थाने सुरुवात 1938 साली झाली. मोमिनाबाद येथील आपले वास्तव्य संपवून स्वामीजी पूर्णवेळ राजकारणात उतरले. “मी हैदराबाद राज्यातील जनतेच्या स्वातंत्र्यासाठी लढेन आणि त्यासाठी माझे सर्वस्व पणाला लावेन.” अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली.

    त्याच सुमारास हैदराबाद संस्थानात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. 1938 ते 1948 या दशकात हैदराबाद संस्थानात फार मोठया राजकीय घडामोडी घडल्या. स्वामीजींनी या चळवळीचे समर्थ नेतृत्व केले. तेलगू, कानडी आणि मराठी भाषिक कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन निजामाविरुद्ध राज्यव्यापी लढा त्यांनी उभा केला. त्यामुळे त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला.

    स्वामीजींच्या नेतृत्वात हैदराबाद स्टेट काँग्रेसने 7 ऑगस्ट 1947 रोजी बंड पुकारले. निजामाने स्वतंत्र भारतात बिनशर्त विलीन व्हावे अशी निर्वाणीची घोषणा स्वामीजींनी केली. स्वामीजींना अटक झाली. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या सहकाऱ्यांनी लढा पुढे नेला. अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद राज्य स्वतंत्र भारतात विलीन झाले. पोलीस कारवाईनंतर राज्यात शांतता प्रस्थापित करण्यात स्वामीजींनी मोलाची कामगिरी बजावली.

    स्वामीजी 1952 ते 1962 या काळात केंद्रात लोकसभेचे सभासद म्हणून निवडून आले. हैदराबाद राज्याचे त्रिभाजन करून तेलगू भाषिक प्रदेश आन्ध्र प्रदेशात, कानडी भाषिक प्रदेश कर्नाटकात आणि मराठी भाषिक मराठवाडा महाराष्ट्रात विलीन करावा याचा आग्रह स्वामीजींनी धरला. त्याला यश येऊन मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाला.

    1962 मध्ये लोकसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर स्वामीजींनी  राजकारणातून संन्यास  घेतला. स्वामीजींनी त्यांचे उर्वरित आयुष्य पिठापुरम येथील रामतीर्थांच्या शांती-आश्रमात व्यतीत केले. 22 जानेवारी 1972 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी नवी आशा आणि आनंद घेऊन येऊ शकतो. वातावरण सकारात्मक असेल, आत्मविश्वासात पूर्वीपेक्षा वाढ झाल्यासारखे वाटेल. एखादी चांगली बातमी चेहऱ्यावर हास्य आणेल. सुसंवाद आणि समजूतदारपणा यामुळे संततीच्या मनात असणारी अभ्यासाविषयीची चिंता दूर करता येईल. स्वतःच्या आहाराकडे आणि झोपेकडे थोडे लक्ष दिल्यास ऊर्जा टिकून राहण्यास मदत होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. तुमचा नम्र स्वभाव तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर घालेल.

    वृषभ – आज भोवतालचे वातावरण शांततापूर्ण राहील आणि दिवस समाधानाने जाईल. नोकरी किंवा नवीन संधीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत प्रामाणिकपणा आणि योग्य निर्णय फायदेशीर ठरतील. पैसे उधार देण्यापूर्वी परिस्थिती पूर्णपणे समजून घ्या.  सासरच्या मंडळींशी संबंधित किरकोळ प्रश्न चर्चेद्वारे सहजपणे सोडवले जाऊ शकतात. कुटुंबासोबत संध्याकाळ घालवल्याने अधिक आनंद मिळेल.

    मिथुन – आर्थिक बाबींमध्ये आज विचारपूर्वक पावले उचलणे फायदेशीर ठरेल. घाईने घेतलेला निर्णय नंतर समस्या निर्माण करू शकतो. प्रवासादरम्यान किंवा विशेष बैठकीदरम्यान, तुम्हाला अशी महत्त्वाची माहिती मिळू शकते जी भविष्यात उपयुक्त ठरेल. वरिष्ठांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे कामावरील आत्मविश्वास वाढेल. भूतकाळातील चुका आज तुम्हाला खूप काही शिकवतील आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करतील. जर व्यावसायिक भागीदारीचा विचार केला जात असेल, तर समोरच्या व्यक्तीची विश्वासार्हता आणि कार्यनिष्ठा याचा अभ्यास करून मगच पुढे जा.

    कर्क – आज कुटुंबात आनंद आणि जिव्हाळा नांदेल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सामंजस्य वाढेल. जोडीदाराच्या करिअरबद्दलची चांगली बातमी घरातील आनंद आणखी वाढवू शकते. कुटुंबातील सदस्याच्या लग्नाशी संबंधित अडथळे जवळच्या मित्राच्या मदतीने दूर होण्याची शक्यता आहे. नवीन नातेसंबंधात पुढे जाण्यापूर्वी थोडा वेळ घेणे उत्तम राहील. चैनीच्या आणि गरजेच्या वस्तूंवरील खर्च वाढू शकतो, परंतु कुटुंबाच्या आनंदामुळे हा खर्च समाधानही देईल.

    सिंह – आज, तुमच्या मेहनतीची आणि वागणुकीची चर्चा कामाच्या ठिकाणी आणि सामाजिक स्तरावरही होऊ शकते. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या मोठ्या व्यवहारात शेवटच्या क्षणी अडथळा येऊ शकतो, परंतु संयम ठेवल्यास तो लवकरच दूर होऊ शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याने नवीन नातेसंबंध निर्माण होतील. गुंतवणूक करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित सगळी माहिती गोळा करणे फायदेशीर ठरेल. इतरांच्या भावना समजून घेतल्याने सौहार्दपूर्ण संबंध टिकून राहतील.

    कन्या – आज नशिबाची साथ असल्यामुळे, अनेक कामे अपेक्षेपेक्षा अधिक सहजपणे पूर्ण होऊ शकतात. जोडीदाराचा भावनिक आधार तुम्हाला आतून बळकट करेल आणि मनःशांती देईल. संततीच्या भविष्याबद्दल थोडी चिंता वाटू शकते, परंतु योग्य नियोजनामुळे तुम्हाला परिस्थिती हाताळण्यास मदत होईल. वादांपासून दूर राहणे शहाणपणाचे ठरेल. सरकारी योजना किंवा सुविधांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. भविष्यासाठी बचत किंवा गुंतवणूक केल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षा मिळण्यास मदत होऊ शकते.

    तुळ – आज अपूर्ण कामे पूर्ण करण्याची चांगली संधी मिळेल, बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या बाबींमध्येही प्रगती होऊ शकते. पोटाच्या समस्येमुळे दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे संतुलित आहार घ्या. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही आव्हानांना सामोरे जावे लागेल, परंतु सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे यश मिळेल. जुनी देणी फेडल्याने मानसिक ताण कमी होईल. जोडीदाराला दिलेले एक छोटेसे सरप्राईज नातेसंबंध पुन्हा जिवंत करू शकते. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे कुटुंबासोबत प्रवास करण्याचे बेत आखाल.

    वृश्चिक – आज खर्चात संतुलन राखणे फायदेशीर ठरेल. अनियोजित खरेदी किंवा छंदांमुळे  बजेटमध्ये वाढ होऊ शकते.  घराच्या सजावटीसाठी किंवा नूतनीकरणासाठी एखादी नवीन कल्पना सुचू शकते. आज आईच्या तब्येतीबद्दल थोडी चिंता वाटू शकते, त्यामुळे तिच्यासोबत वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. कामातील मेहनतीची तुमच्या वरिष्ठांना दखल घ्यावी लागेल.  वरिष्ठांकडून प्रशंसा किंवा चांगली बातमी मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल. करिअरशी संबंधित एखादा सकारात्मक विचार तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करू शकते.

    हेही वाचा – विदर्भातील ‘हाडपक्या’ (मस्कऱ्या) गणपतीचा 239 वर्षांचा इतिहास!

    धनु – आज, कोणतेही काम घाईघाईने करण्याऐवजी, संयमाने आणि समजूतदारपणे करणे तुमच्यासाठी अधिक चांगले ठरेल. एका महत्त्वाच्या निर्णयासाठी  वडिलांचा सल्ला तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकतो. संततीच्या आनंदासाठी काहीतरी खरेदी करावीशी वाटेल आणि यामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या सल्ल्याकडे लक्ष दिल्यास तुमच्या कामात सुधारणा होईल. दीर्घकाळापासून जपलेली एखादी इच्छा पूर्ण झाल्याने दिवस खास बनू शकतो.

    मकर – आजचा दिवस तुमच्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. तुमची विवेकबुद्धी आणि सारासार विचारशक्ती तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करेल. लहान जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण केल्याने पुढील मार्ग सुकर होईल. एखाद्या जुन्या मित्रासोबतची भेट जुन्या आठवणींना उजाळा देऊन आनंद देऊ शकते. कामाच्या ठिकाणी, एखादे चांगले काम किंवा जबाबदारी मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल आणि आत्मविश्वास दृढ होईल.

    कुंभ – आज तुमचा आत्मविश्वास सर्वोच्च पातळीवर असेल,  तुमची निर्णयक्षमता मजबूत राहील. स्वतःची कामे आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण कराल. गरजू व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला खूप समाधान मिळेल. संवाद आणि सामंजस्याने कोणतेही कौटुंबिक प्रश्न सोडवण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावाल. मालमत्तेशी संबंधित एक चांगली संधी निर्माण होऊ शकते. संततीला दिलेले वचन पूर्ण केल्याने तुमचे त्यांच्यासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. व्यवसायात काही प्रमाणात घसरण होईल, परंतु हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल.

    मीन – आज स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे फायदेशीर ठरेल. लहानसहान समस्या त्वरित सोडवल्यास दिवस अधिक सुरळीत जाईल. कोणीतरी तुम्हाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करू शकते, म्हणून महत्त्वाचे निर्णय घेताना तुमच्या विचारांना प्राधान्य द्या. स्थावर मालमत्ता व्यवसायात गुंतलेल्यांना कायदेशीर किंवा शासकीय स्तरावर काही दिलासादायक बातमी मिळू शकते. कोणालाही वचन देण्यापूर्वी स्वतःच्या परिस्थितीचा विचार करा. संयमाने आणि संतुलित दृष्टिकोनाने पुढे गेल्यास दिवस सुरळीत आणि सकारात्मक जाऊ शकतो.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    नवमांश आणि विवाह

    October 2, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 ऑक्टोबर 2026

    October 2, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 ऑक्टोबर 2026

    October 1, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    नवमांश आणि विवाह

    By अस्मिता दीक्षितOctober 2, 2026

    || श्री स्वामी समर्थ || गुणमिलन करताना नवमांश महत्त्वाचा. नवमांश म्हणजे प्रत्येक राशीचा नववा भाग.…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 ऑक्टोबर 2026

    October 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 ऑक्टोबर 2026

    October 1, 2026

    घरातील देवघरात पूजा करताना तोंड कोणत्या दिशेला असावे?

    September 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 ऑक्टोबर 2026

    October 3, 2026

    माधवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली…

    October 2, 2026

    सासूबाईंनी उमाला माहेरी जाण्यापासून थांबवलं…

    October 2, 2026

    विदर्भातील ‘हाडपक्या’ (मस्कऱ्या) गणपतीचा 239 वर्षांचा इतिहास!

    October 2, 2026

    नवमांश आणि विवाह

    October 2, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जैसा रंकु भ्रमला, म्हणे जा रे मी रावो आला

    October 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 457
    • अवांतर 215
    • आरोग्य 153
    • पंचांग आणि भविष्य 610
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 965
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 ऑक्टोबर 2026

    October 3, 2026

    माधवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली…

    October 2, 2026

    सासूबाईंनी उमाला माहेरी जाण्यापासून थांबवलं…

    October 2, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.