Sunday, September 21, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधआजचे पंचांग आणि दिनविशेष : 03 जून 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष : 03 जून 2025

दर्शन कुलकर्णी

 

आज, भारतीय सौर : 13 ज्येष्ठ शके 1947

अर्थात,

दिनांक : 03 जून 2025

वार : मंगळवार

तिथि : अष्टमी 21:55

नक्षत्र : पू‌. फाल्गुनी  24:57

योग : हर्षण 08:07

करण : विष्टि 09:10

सूर्य : वृषभ

चंद्र : सिंह

सूर्योदय : 06.00

सूर्यास्त : 19:12

पक्ष : शुक्ल

मास : ज्येष्ठ

ऋतू : ग्रीष्म

सूर्य अयन : उत्तरायण

संवत्सर : विश्वावसू

शालिवाहन शक : 1947

विक्रम संवत : 2081

युगाब्द : 5127


वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – एखादी जुनी ओळख अडचण निर्माण करू शकते.

वृषभ – कामाच्या ठिकाणी सर्व काही अनुकूल असेल.

मिथुन – भागीदाराशी कोणताही व्यवहार करताना जपून करा.

कर्क – योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल.

सिंह – आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज.

कन्या – आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस.

तुळ – धनहानी होण्याची शक्यता.

वृश्चिक – मानसिक आरोग्यासाठी ध्यानधारणा आणि योगसाधना करा.

धनु – रागावर नियंत्रण ठेवा.

मकर – अतिकामामुळे त्रासून जाल.

कुंभ – वादग्रस्त विषय टाळा.

मीन – स्वप्न प्रत्यक्षात येईल.


दिनविशेष

कलामहर्षी बाबूराव पेंटर

प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार, चित्रपट दिग्दर्शक कलामहर्षी बाबूराव कृष्णाजी मेस्त्री तथा बाबूराव पेंटर यांचा जन्म 3 जून 1890 रोजी कोल्हापूर येथे झाला. आनंदराव मेस्त्री आणि बाबूराव रुईकरांच्या सहकार्याने त्यांनी सुरुवातीला डेक्कन आणि महाराष्ट्र सिनेमाची स्थापना केली. नंतर बाबूराव पेंटर यांनी 1 डिसेंबर 1917 रोजी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ काढली. 1919मध्ये त्यांनी कल्पकता, भव्यतेचे दर्शन घडवणाऱ्या सैरंध्री या मूकपटाची निर्मिती केली. 7 फेब्रुवारी 1920 रोजी पुण्याच्या आर्यन सिनेमागृहात सैरंध्री प्रदर्शित झाला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 फेब्रुवारी 1920 रोजी लोकमान्य टिळकांनी हा चित्रपट पहिला. त्यांनी बाबूराव पेंटर यांना ‘सिनेमा केसरी’ या उपाधीने गौरविले. महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून त्यांनी 1920-30 या दशकात एकूण 17 चित्रपटांची निर्मिती केली. 1923 सालचा सिंहगड हा त्यांचा चित्रपट सिनेसृष्टीसाठी मैलाचा दगड ठरला. या चित्रपटासाठी आऊटडोअर तसेच विजेच्या प्रकाशात प्रथमच शूटिंग करण्यात आले. त्यातील रात्रीच्या लढाईचे चित्रिकरण आर्क लँपच्या उजेडात करण्यात आले. तर, पन्हाळा किल्ल्याच्या परिसरात या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले. मुंबईमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी झालेल्या अलोट गर्दीमुळे सरकारचे लक्ष सिनेसृष्टीकडे वेधले गेले आणि या चित्रपटापासूनच करमणूक कर आकारण्यास सुरुवात झाली. 16 जानेवारी 1954 रोजी त्यांचे देहवसान झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!