दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 03 ऑगस्ट 2025; वार : रविवार
भारतीय सौर : 12 श्रावण शके 1947; तिथि : नवमी 09:41; नक्षत्र : विशाखा 06:34
योग : शुक्ल 06:23; करण : तैतील 22:44
सूर्य : कर्क; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:15; सूर्यास्त : 19:13
पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
आदित्य पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
दिनविशेष
क्रांतिसिंह नाना पाटील
टीम अवांतर
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म 03 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील येडे मचिंद्र या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. 1916 मध्ये मुलकीपरीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना तलाठ्याची नोकरी मिळाली. पुढे सत्यशोधक चळवळीकडे ते आकृष्ट झाले. त्यांनी ग्रामीण भागातून दौरे काढून तत्कालीन समाजातील अंधश्रद्धा, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा आणि चालीरीती याविरुद्ध लोकमत जागृत केले. नाना पाटील प्रभावी वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. 1930 साली महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकारच्या चळवळीत ते सहभागी झाले. पुढे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीवर ते निवडून आले. 1942 च्या ‘छोडो भारत’ आंदोलनात त्यांनी भूमिगत राहून कार्य केले. सातारा जिल्ह्यात काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी प्रतिसरकार स्थापन केले आणि ब्रिटिश शासन बंद पाडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. सरकारतर्फे हेरगिरी करणाऱ्यास तसेच जबरीने सारा वसूल करणाऱ्या पाटील-तलाठ्यांस पायांवर काठीचे तडाके मारून पत्रेही ठोकण्यात येत. यावरून त्यांच्या या प्रतिसरकारला पत्रीसरकार हे नाव रूढ झाले होते. ब्रिटिश सरकारने नाना पाटलांना पकडून देणाऱ्यास दहा हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. ते महात्मा गांधी यांचे अनुयायी होते, तथापि सशस्त्र क्रांतिमार्गाने ब्रिटिश सत्ता उलथून पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 1946मध्ये काँग्रेस मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाल्यावर त्यांच्याविरुद्धचे वॉरंट रद्द करण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि ते शेतकरी कामगार पक्षात गेले. अखेरच्या दिवसांत त्यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला होता. 1957 ते 1967 असे दोन वेळा ते लोकसभेवर निवडून आले. सत्यशोधक चळवळ, भारतीय स्वातंत्र्यसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन या सर्वांना महाराष्ट्रात नाना पाटलांचे नेतृत्व लाभले. 06 डिसेंबर 1976 रोजी मिरज येथे त्यांचे निधन झाले.
हेही वाचा – Mental Health : मानसिक ताणतणाव
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.