दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 02 ऑगस्ट 2025; वार : शनिवार
भारतीय सौर : 11 श्रावण शके 1947; तिथि : अष्टमी 07:23; नक्षत्र : विशाखा अहोरात्र
योग : शुक्ल अहोरात्र; करण : बालव 20:33
सूर्य : कर्क; चंद्र : तुळ 23:51; सूर्योदय : 06:15; सूर्यास्त : 19:13
पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
अश्वत्थमारुती पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – कामाच्या ठिकाणी काही समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे मानसिक ताण वाढेल. मात्र तुमच्या वागण्याने आणि बोलण्याने वातावरण सामान्य करण्यात यशस्वी व्हाल. नोकरदार मंडळींवरील कामाचा दबाव वाढू शकतो. कौटुंबिक बाबींमध्ये जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता भासू शकते.
वृषभ – दिवस शुभ असेल. कामाच्या ठिकाणी दिवस उत्तम जाईल. नफा कमावण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. दुपारी काही सकारात्मक बातम्या मिळतील. कुटुंबासोबतही चांगला वेळ घालवाल. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. संध्याकाळी एखाद्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
मिथुन – कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या मदतीने कोणतीही मौल्यवान वस्तू किंवा मालमत्ता मिळवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. यामुळे दिवसभर मनही आनंदी राहील. कामात खूप व्यग्र असाल. अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे टाळावे लागेल. वाहन चालवताना काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
कर्क – नशिबाची पूर्ण साथ मिळेल, व्यवसायाच्या बाबतीत अचानक मोठ्या प्रमाणात पैशांची आवक वाढू शकते आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायासाठी बनवलेल्या योजनांनाही आता गती मिळेल. मात्र कामाच्या ठिकाणी घाईघाईने किंवा भावनिकतेने निर्णय घेणे टाळावे लागेल, अन्यथा भविष्यात नुकसान होऊ शकते.
सिंह – राजकीय क्षेत्रात असणाऱ्या जातकांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळू शकते. स्पर्धेच्या क्षेत्रात यशाचा मार्ग मोकळा होईल, त्यामुळे मानसिक ताण कमी होईल आणि मन आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी कोणतेही काम प्रलंबित असेल तर, ते आता पूर्ण होऊ शकते. पचनाशी संबंधित समस्या उद्भवेल. त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष द्या.
कन्या – कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम आणि समर्पणाचे चांगले फायदे मिळतील. सर्जनशील कामात रस वाढू शकतो. आजूबाजूला प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, प्रकरण आणखी बिकट होऊ शकते. घरात सुरू असलेल्या समस्याही आता दूर व्हायला सुरुवात होईल.
हेही वाचा – Relation : ‘मेल इगो’… नातं बाप आणि मुलाचं
तुळ – शिक्षण क्षेत्रात किंवा कोणत्याही स्पर्धेत विशेष यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. वागण्या-बोलण्याच्या पद्धतीमुळे समाजात विशेष आदर मिळेल. कामासंदर्भात खूप धावपळ करावी लागेल, त्यामुळे प्रकृतीत काही चढ-उतार होऊ शकतात. त्यामुळे निष्काळजीपणा टाळा आणि काळजी घ्या.
वृश्चिक – आर्थिक बाबतीत दिवस चांगला जाणार आहे. नफा मिळविण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. यामुळे संपत्ती, आदर, कीर्ती आणि प्रतिष्ठा देखील वाढेल. कोणतेही काम प्रलंबित असेल, तर ते आता पूर्ण होऊ शकते. प्रियजनांच्या भेटी होऊ शकतात. मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा वादाचा प्रसंग निर्माण होऊ शकतो.
धनु – सांसारिक सुखांच्या साधनांमध्ये वाढ होईल. घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. कामाच्या ठिकाणी एखाद्या कनिष्ठ कर्मचाऱ्यामुळे किंवा नातेवाईकामुळे नाहक तणाव वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. कोणते कायदेशीर प्रकरण सुरू असेल तर त्यात यश मिळू शकते.
मकर – व्यवसायाच्या दृष्टीने वेळ अनुकूल आहे, त्यामुळे चांगला नफा मिळू शकेल. आर्थिक बाबतीतही दिवस चांगला जाईल आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. व्यवसायात काही बदल करण्याची योजना आखू शकता. स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या.
कुंभ – खर्च वाढू शकतो आणि जोडीदाराला अचानक शारीरिक समस्या उद्भवू शकते. यामुळे बराच वेळ धावपळीत जाण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारची मालमत्ता खरेदी किंवा विक्री करताना काळजी घ्यावी लागेल. घाईघाईने निर्णय घेतल्यास मोठे नुकसान होऊ शकते. संध्याकाळपर्यंत परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल.
मीन – व्यवसायात मोठे यश मिळेल, ज्यामुळे मन आनंदी राहील. कामाच्या निमित्ताने प्रवास घडतील. या राशीच्या जातकांना गेले काही दिवस उद्भवलेल्या मानसिक तणावातून आराम मिळेल. पालकांचा सल्ला आणि आशीर्वाद फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवन आनंद राहील.
हेही वाचा – Emotional scene : खरे अश्रू अन् खोटे अश्रू!
दिनविशेष
कादंबरीकार पु. शि. रेगे
टीम अवांतर
मराठीतील श्रेष्ठ कवी, कादंबरीकार, नाटककार, समीक्षक तसेच संपादक म्हणून ओळख असणाऱ्या पु. शि. तथा, पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मिठबाब येथे 2 ऑगस्ट 1910 रोजी झाला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून बी.एस्सी. झालेल्या रेगे यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून विविध महाविद्यालयांमध्ये काम केले. कालांतराने ते मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले. साधना, इतर कविता, फुलोरा, हिमसेक, दोला, गंधरेखा, पुष्कळा, दुसरा पक्षी, प्रियाळ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कवितांची इंग्रजी, जर्मन, डॅनिश, स्पॅनिश आणि चिनीमध्ये भाषांतरे झाली आहेत. सृजनशक्ती म्हणजेच स्त्रीशक्ती हा त्यांचा कवितेचा मुख्य विषय आहे. जीवनात विविध रूपाने वावरणारी सृजनशक्ती आणि विशेषतः तिचे स्त्रीदेहधारी स्वरूप वेगवेगळ्या रूपांनी आणि स्त्रीप्रतिमांच्या साह्याने त्यांच्या कवितेत प्रकट होत असे. रूपकथ्थक आणि मनवा हे दोन कथासंग्रह त्यांच्या नावावर असून त्यातील काही कथांचा इतर भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. सावित्री, अवलोकिता, रेणू आणि मातृका या रेगे यांच्या चारही कादंबऱ्या काव्यात्म आणि अर्थगर्भ आहेत. त्यातील भावविश्व गूढ, तत्वस्पर्शी, सखोल आणि समृद्ध आहे. सावित्री ही पत्ररूप कादंबरी असून सावित्री आणि अवलोकिता या कादंबऱ्या परस्परांना पूरक ठरतील अशा स्वरूपाच्या आहेत. रंगपांचालिक आणि दोन नाटके या त्यांच्या संग्रहात तीन छोट्या नाटकांचा समावेश आहे. छांदसी हा त्यांच्या समीक्षालेखांचा संग्रह प्रसिद्ध झाला आहे. छंद या द्वैमासिकाचे संपादन ही रेगे यांची आणखी एक महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणावी लागेल. भाषा, कला आणि साहित्य या विषयांना वाहिलेल्या या वाङ्मयीन नियतकालिकाने मराठीतील वाङ्मयीन नियतकालिकांच्या परंपरेत महत्त्वाची भर घातली. 1965मध्ये मॉस्को येथे लघुकथा या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात एक भारतीय प्रतिनिधी म्हणून रेगे यांनी भाग घेतला. त्याच वर्षी केरळ येथे आयोजित अखिल भारतीय लेखक परिषदेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. 1969 साली वर्धा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 17 फेब्रुवारी 1978 साली मुंबईत त्यांचे निधन झाले.