दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 01 सप्टेंबर 2025; वार : सोमवार
भारतीय सौर : 10 भाद्रपद शके 1947; तिथि : नवमी 26:42; नक्षत्र : ज्येष्ठा 19:53
योग : विष्कंभ 16:30; करण : बालव 13:53
सूर्य : सिंह; चंद्र : वृश्चिक 19:53; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:53
पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
ज्येष्ठागौरी पूजन
भागवत सप्ताहारंभ
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला जाणार आहे. मालमत्तेशी संबंधित क्षेत्रात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रातही लाभ मिळेल. लोकप्रियता वाढेल आणि कुटुंबाचे आशीर्वाद राहतील. मात्र संध्याकाळी काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
वृषभ – कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध रहा. काळजीपूर्वक विचार करून कोणताही निर्णय घेणे चांगले. तुमच्या क्षमतेने आणि बुद्धिमत्तेने महत्त्वाची कामे पूर्ण कराल. व्यवसायाच्या दृष्टीने प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य राहील. कुटुंबात जोडीदाराशी उत्तम समन्वय असेल.
मिथुन – आर्थिक बाबतीत दिवस चांगला जाईल. पैसे बऱ्याच काळापासून कुठे अडकले असतील तर, ते आता परत मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी बुद्धी आणि विवेकाने घेतलेले निर्णय मोठे फायदे देऊ शकतात. परंतु वादांपासून दूर राहावे लागेल आणि कामाच्या ठिकाणी काळजीपूर्वक विचार करून बोलणे महत्त्वाचे ठरेल.
कर्क – कामाच्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी अधिक मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील. प्रत्येक काम आज गांभीर्याने करा. भौतिक सुखांवर जास्त पैसे खर्च करू शकता. कामाच्या ठिकाणी विरोधकांचा पराभव होईल. वरिष्ठही कामावर खूष असतील.
सिंह – कामाच्या ठिकाणी प्रत्येक काम आत्मविश्वासाने करा. प्रयत्न आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक कामात यश मिळेल. एखादे काम बराच काळापासून अडकले असेल तर, आता ते पूर्ण होईल. मात्र, यासाठी थोडा खर्च करावा लागेल. व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू होण्याची शक्यता आहे. तुमचे काम पाहून विरोधकही तुमची प्रशंसा करतील.
कन्या – नशिबाची पूर्ण साथ मिळेल, ज्यामुळे काम सोपे होईल. कामातील कार्यक्षमतेमुळे बरेच फायदे होतील. तसेच, सर्वच कामात यश मिळेल. चांगल्या आरोग्यामुळे पूर्ण उत्साहाने कामात व्यग्र रहाल. फक्त बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल. त्याच वेळी, संततीकडून काही चांगली बातमी मिळू शकते.
हेही वाचा – मुकी होत चाललेली घरे
तुळ – तुम्ही दृढनिश्चयाने पुढे जाल आणि सांगितलेल्या गोष्टी पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. मात्र प्रवासादरम्यान सावधगिरी बाळगा, काही वस्तूंची चोरी होण्याची किंवा किरकोळ दुखापत होण्याची भीती आहे. विद्यार्थ्यांची शिक्षण क्षेत्रात आवड वाढेल आणि या दिशेने काही सकारात्मक बदल दिसून येतील. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल, ज्यामध्ये यश मिळेल.
वृश्चिक – कामाच्या ठिकाणी प्रत्येक काम संयम आणि बुद्धिमत्तेने केल्यास प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकाल. तसेच, विरोधकांचाही पराभव होईल. आर्थिक बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना आखाल. संततीने केलेल्या चांगल्या कामामुळे समाजात आदर वाढेल.
धनु – विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम आणि मेहनत केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. संध्याकाळी काही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. एकंदरीत दिवस शुभ राहणार आहे.
मकर – घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आशीर्वादामुळे आणि पाठिंब्यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कोणालाही अनावश्यक सल्ला देणे टाळा, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. नोकरी करणारे जातक कामात व्यग्र राहतील. धार्मिक कार्यात सवड काढून सहभागी व्हाल. कौटुंबिक स्तरावर दिवस शांततापूर्ण राहील.
कुंभ – दिवस खूप चांगला जाईल. उत्पन्न वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. त्यामुळे आर्थिक स्थितीही मजबूत होईल. योग्य स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेली गुंतवणूक अधिक परतावा देणारी असेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. आज नवीन मित्र देखील बनतील.
मीन – संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. आईच्या माहेराहून एखादी आनंदाची बातमी मिळेल. नोकरदार जातकांनी विरोधकांपासून सावध रहावे. तुमच्या विरोधात एखादे कटकारस्थान रचले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे. कुटुंबात जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
हेही वाचा – गणपती तू गुणपती तू…
दिनविशेष
प्राच्यविद्या संशोधक काशिनाथ तेलंग
टीम अवांतर
प्राच्यविद्या संशोधक, कायदेपंडित, सुधारक आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक असणारे आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म 30 ऑगस्ट 1850 रोजी मुंबईत झाला. वयाच्या चौदाव्या वर्षी ते मॅट्रीक झाले. मॅट्रिकला संस्कृत विषय घेऊन उत्तीर्ण होणारे ते पहिले विद्यार्थी होत. पुढील शिक्षणाकरिता त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश केला. 1868 मध्ये बी. ए. तर, 1869 सालच्या अखेरीस ते एम्. ए. झाले. एम्. ए. करता करताच त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. त्यामुळे वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी एम्. ए., एल्एल्. बी. झाले. नेहमीच प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे अनेक शिष्यवृत्त्या आणि बक्षिसांचे ते मानकरी ठरले. नंतर त्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात वकिलीस सुरुवात केली. पुढे 1889मध्ये उच्च न्यायालयात त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. हिंदू कायद्यातील सुधारणांचा त्यांनी पुरस्कार केला. संमतीवयाच्या कायद्यासही त्यांची मान्यता होती. 1892 साली मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली. कायद्याप्रमाणेच इतिहास, राज्यशास्त्र, भाषासाहित्य या विषयांचा त्यांचा व्यासंग मोठा होता. मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते, तर फ्रेंच, जर्मन या भाषाही त्यांना अवगत होत्या. संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. मराठी भाषा आणि मराठी वाङ्मय यांच्या समृद्धीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्र भाषासंवर्धक मंडळाची त्यांनी स्थापना केली. तिचा उद्देश ऐतिहासिक, चरित्रात्मक, बोधपर आणि उपयुक्त विषयांवर ग्रंथनिर्मिती करावी असा होता. 1 सप्टेंबर 1893 साली त्यांचे निधन झाले.