Sunday, October 26, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 01 ऑक्टोबर 2025

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 01 ऑक्टोबर 2025

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 01 ऑक्टोबर 2025; वार : बुधवार
  • भारतीय सौर : 09 आश्विन शके 1947; तिथि : नवमी 19:00; नक्षत्र : पूर्वाषाढा 08:05
  • योग :  अतिगंड 24:32; करण : बालव 06:38
  • सूर्य : कन्या; चंद्र :  धनु 14:26; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:27
  • पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

महानवमी

नवरात्रोत्थापन

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – ऑक्टोबर महिन्याचा आजचा पहिला दिवस खूप शुभ असेल. दिवसभर सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असाल. नोकरी शोधणाऱ्यांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. एखादा महत्त्वाचा व्यवसाय करार मिळू शकतो, ज्यामुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल.

वृषभ – आर्थिक लाभाच्या संधी वाढण्याची शक्यता आहे.  गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना अनेक स्रोतांकडून नवीन संधींची माहिती मिळू शकते. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत उत्तम संवाद राहील. काही जातकांना तीर्थयात्रेचा योग आहे. प्रेमात असलेल्यांना जोडीदाराकडून एखादी छानशी वस्तू भेट म्हणून मिळेल.

मिथुन – आजचा दिवस फारसा अनुकूल नसेल. अडचणी वाढतील आणि अनावश्यक धावपळ करावी लागेल. आज शत्रू  वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. त्याचा सामना करावा लागेल. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा. कोणतेही आर्थिक निर्णय पूर्ण विचार करून घ्या. व्यवसायात, चांगला व्यवहार होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील.

कर्क – आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन आला आहे. आजचा दिवस खूप शुभ आहे. सर्व प्रकारच्या कामांमध्ये आज रस निर्माण होईल. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्याबद्दलचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायिकांना एखादा चांगला करार मिळू शकेल. न्यायालयात कायदेशीर प्रकरणे प्रलंबित असलेल्यांना दिलासा मिळू शकेल.

सिंह – नशिबाची मोठी साथ तुमच्यासोबत असेल, त्यामुळे कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही. आज अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात.

हेही वाचा – बोलीभाषेतली नाती अन् मी!

कन्या – नोकरीच्या शोधात असलेल्यांना काही चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. आज कामासाठी खूप धावपळ करावी लागेल. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तो टाळणे उत्तम.  स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थी उत्तम यश मिळवू शकतात. आरोग्याची मात्र विशेष काळजी घ्यावी लागेल.

तुळ – आजचा दिवस संमिश्र असेल. मात्र तुमच्यासाठी आर्थिक बळकटी घेऊन येणारा आहे. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करावे लागू शकतात. मात्र त्यामुळे तुमचा प्रभाव आणि तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. आज तुम्ही वाहनाच्या सुखसोयींचा आनंद घ्याल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सौहार्द नांदेल.

वृश्चिक – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. आज सामाजिक प्रतिष्ठा आणि पत यांचा लाभ मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना अनेक महत्त्वाच्या संधी मिळतील. लांब पल्ल्याच्या प्रवासाची योजना आखणाऱ्यांनी आज प्रवास टाळावा. आरोग्याच्या काही प्रमाणात कुरबुरी असतील.

धनु – आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. कारकिर्दीतील चांगल्या संधी मिळण्याची आणि प्रगतीची शक्यता आहे. मात्र त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. नोकरी करणाऱ्या जातकांची वरिष्ठांकडून  कामाबद्दल प्रशंसा केली जाईल. नोकरीव्यतिरिक्त इतर क्षेत्रातही यश मिळू शकेल. कौटुंबिक आनंद मिळेल, जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.

मकर – कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील, मात्र अनावश्यक खर्च कमी करा. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी काही मतभेद होऊ शकतात, परंतु तुम्ही ते का झाले यावर विचार करणे आवश्यक आहे. आज एखाद्या धार्मिक कार्यासाठी उपस्थित रहाल.

कुंभ – आज नवीन संधी निर्माण होतील. तुमच्या बोलण्याने आणि बुद्धीने सर्वांना प्रभावित करू शकाल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. मात्र कोणतेही आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंध मजबूत होतील.

हेही वाचा – सुरेखाच्या दुसर्‍या लग्नाची गोष्ट!

मीन – दिवस संमिश्र असेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना आज चांगला नफा होऊ शकतो. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. राजकारणात कार्यरत असलेल्यांना आज एखाद्या उच्चपदाचा लाभ मिळू शकतो.


दिनविशेष

गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर

टीम अवांतर

विख्यात मराठी कवी, पटकथा–संवाद-लेखक ग. दि. माडगूळकर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 रोजी शेटेफळ या गावी झाला. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागल्यानंतर मास्टर विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी या गाजलेल्या चित्रपटात छोटी भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली आणि लिहावेसे वाटू लागले. त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी आणि पहिला पाळणा या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. राजकमल पिक्चर्सच्या ‘लोकशाहीर रामजोशी’ या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहिली. शिवाय, त्यात त्यांनी एक भूमिकाही केली. या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर  मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला भरभरून प्रतिसाद दिला. त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला. त्यामुळे ‘महाराष्ट्र-वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने त्यांना दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले आणि अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांमध्येही याचा अनुवाद झाला आहे. त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये पुढचं पाऊल, बाळा जो जो रे, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, ऊन पाऊस, मी तुळस तुझ्या अंगणी, जगाच्या पाठीवर, संथ वाहते कृष्णामाई यांचा समावेश होतो. यातील काही चित्रपटांची कथा, पटकथा, संवाद, गीते त्यापैकी सर्व किंवा काहीच गोष्टी माडगूळकरांच्या लेखणीतून उतरल्या होत्या. याशिवाय तुफान और दिया, दो आँखे बारह हाथ, गूँज उठी शहनाई हे त्यांनी लिहिलेले काही उल्लेखनीय हिंदी चित्रपट आहेत. त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चैत्रबन इत्यादी अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला. 1973 मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचेही ते सदस्य होते. आधुनिक काळातील वाल्मिकी अशी ओळख असणाऱ्या ग. दि. माडगूळकर यांचे 14 डिसेंबर 1977 रोजी पुणे येथे निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!