Sunday, March 1, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 01 मार्च 2026

Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 01 मार्च 2026

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 01 मार्च 2026; वार : रविवार
  • भारतीय सौर : 10 फाल्गुन शके 1947; तिथि : त्रयोदशी 19:09; नक्षत्र : पुष्य 08:34;
  • योग : शोभन 14:32; करण : कौलव 07:54, गरज 30:29;
  • सूर्य : कुंभ; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:59; सूर्यास्त : 18:43;
  • पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण;
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127.

प्रदोष

वेद कन्सल्टन्सी / 9987433660

हेही वाचा – दीर्घ श्वसन अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य


दिनविशेष

श्रेष्ठ संस्कृत पंडित केवलानंद सरस्वती

टीम अवांतर

महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी, श्रेष्ठ संस्कृत पंडित केवलानंद सरस्वती यांचा जन्म 8 डिसेंबर 1877 रोजी तत्कालीन कुलाबा जिल्ह्यतील सुडकोली गावी झाली. त्यांचे मूळ नाव नारायण सदाशिव मराठे. त्यांचे शिक्षण प्राचीन पद्धतीने गुरूगृही झाले. 1895 मध्ये वाई येथे आल्यावर नव्य-न्यायाचे आणि शांकर अद्वैत वेदान्ताचे अध्ययन झाले. अध्यात्मविद्येचे अध्ययन त्यांनी प्रज्ञानंदसरस्वती यांच्यापाशी केले.

हेही वाचा – नेने सरांचा क्लास अन् कुंभकर्णी झोप!

ऋग्वेद, संस्कृत काव्यवाङ्‍मय आणि व्याकरण, न्याय, वेदान्त, मीमांसा इत्यादींत पारंगत झाल्यानंतर 1901 मध्ये त्यांनी वाई येथे स्वतःची पाठशाळा सुरू केली. पुढे त्याच पाठशाळेचे ‘प्राज्ञपाठशाळा’ असे 1916 साली नामकरण झाले. दिनकरशास्त्री कानडे, महादेवशास्त्री दिवेकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांसारखे नामवंत शिष्य याच प्राज्ञपाठशाळेत शिकले. 1920 साली प्राज्ञपाठशाळेस राष्ट्रीय शिक्षणसंस्थेचे स्वरूप मिळाले. त्यातून अनेक स्वातंत्र्यसैनिक तयार झाले. 1925 साली केवलानंद सरस्वती यांनी धर्मकोशाच्या कार्यास प्रारंभ केला. संस्कृतमध्ये मीमांसा कोशचे (7 खंड, 1952-66) संपादन केले.

धर्मसुधारणेची चळवळ चालू ठेवण्याकरिता 1934 साली त्यांनी डॉ. पां. वा. काणे , रघुनाथ शास्त्री कोकजे, केशव लक्ष्मण दप्तरी, ना. गो. चापेकर, ज. र. घारपुरे, म. म. श्रीधरशास्त्री पाठक इत्यादी विद्वानांच्या सहाय्याने धर्मनिर्णयमंडळाची स्थापना केली. 1931 साली त्यांनी संन्यास घेतला. संन्यास घेतल्यावर बद्रीनाथची पायी यात्रा केली. 

करारी स्वभाव, उज्ज्वल चारित्र्य, अध्यात्मनिष्ठा आणि त्यागी जीवन हे त्यांचे व्यक्तिमत्त्वविशेष होत. वाई येथे 1 मार्च 1955 रोजी त्यांचे निधन झाले. तेथेच त्यांचे स्मारकमंदिर उभारले असून धर्मकोशाचे संपादनकार्य तिथूनच चालते. 1975 पर्यंत त्याचे अकरा भाग प्रकाशित झाले. केवलानंद सरस्वती यांनी संपादित केलेल्या मीमांसाकोश आणि धर्मकोश या ग्रंथांना आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली.


विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!