दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 10 आषाढ शके 1947
अर्थात,
दिनांक : 01 जुलै 2025, वार : मंगळवार, तिथि : षष्ठी 10:20, नक्षत्र : पूर्वा 08:53
योग : व्यतिपात 17:17. करण : गरज 23:54
सूर्य : मिथुन, चंद्र : सिंह 15:50
सूर्योदय : 06:04, सूर्यास्त : 19:20
पक्ष : शुक्ल, मास : आषाढ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947
विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. भावंडांच्या मदतीने धनप्राप्ती होईल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल. कामाच्या निमित्ताने प्रवास घडेल. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला असेल.
वृषभ – व्यावसायिकांना ऑर्डर पूर्ण करण्यासाठी पुरेशी मुदतवाढ मिळू शकते. दिवस व्यग्र असूनही स्वतःसाठी पुरेसा वेळ काढाल आणि आवडीचे काम करू शकाल. जोडीदाराची साथ मिळेल. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल.
मिथुन – आरोग्य चांगले राहील. आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम जाईल. बचत करण्यात यशस्वी व्हाल. परदेशी व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात.
कर्क – पालकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. भरमसाठ खर्चामुळे मन अस्वस्थ असेल. सकारात्मक दृष्टीकोन फायदेशीर ठरेल. स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्यात आवडीचे काम करू शकाल. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला असेल.
सिंह – मानसिक ताणाला बळी पडू नका. जोडीदाराबरोबर गुंतवणुकीबद्दल चर्चा होईल. भविष्यासाठी पैशांचे नियोजन करू शकाल. कुटुंबाला पुरेसा वेळ द्या. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या – मानसिक आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी दिवसाची सुरुवात व्यायामाने करा. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
तुळ – स्वभावात विनम्रता आणणे गरजेचे आहे. पैशाशी संबंधित प्रकरणात अडकले असाल तर, न्यायालयाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदा होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या मदतीने एखाद्या कामात यश मिळेल.
वृश्चिक – निराशाजनक प्रसंग आले तरी खचून जाऊ नका. कामाच्या ठिकाणी प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी दिवस उत्तम जाण्यासाठी आंतरिक ऊर्जा मदत करेल. संध्याकाळी जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवाल.
धनु – एखाद्या प्रदीर्घ आजारापासून सुटका होईल. पैशाशी संबंधित प्रकरणात अडकवले गेले असेल तर, त्यातून निर्दोष सुटका होईल. व्यापारी वर्गाला चांगला सौदा मिळू शकतो. त्यातून आर्थिकदृष्ट्या फायदा होईल. जोडीदाराचे आरोग्य चिंतेचे कारण ठरू शकते.
मकर – कामाच्या निमित्ताने लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते. रागावर नियंत्रण ठेवा आणि कार्यालयातील सर्वांशी चांगले वागा. आर्थिक घडी विस्कटू शकते. व्यावसायिक जीवनात चांगल्या संधी मिळतील. जोडीदाराशी असलेले गैरसमज दूर होऊ शकतात.
कुंभ – मानसिक शांततेचा दिवस. जुन्या वाईट सवयी सोडण्याचा निर्णय घ्या. त्यासाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल. हृदयाचे ऐकून काम करण्याचा सल्ला दिला जातो. ऊर्जावान दिवस असेल. नशीब तुमच्यासोबत असेल. तारे लवकरच चमकणार आहेत.
मीन – महत्त्वाचे निर्णय घेताना इतरांच्या भावना विचारात घ्या. यामुळे मानसिक ताण कमी होईल. प्रियजनांची भेट होईल. कामाच्या ठिकाणी एखाद्या बड्या व्यक्तीशी भेट होईल. जोडीदाराकडून आश्चर्याचा सुखद धक्का दिला जाईल. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला असेल.
दिनविशेष
‘भारतरत्न’ डॉ. बी. सी. रॉय
1 जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. याचे कारण म्हणजे भारतातील प्रसिद्ध डॉक्टर बिधान चंद्र किंवा बी. सी. रॉय यांचा हा जन्मदिवस आहे. बी. सी. रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी बिहारच्या पाटणा येथे झाला. महात्मा गांधी यांचे वैयक्तिक डॉक्टर आणि स्वतंत्र भारताचे पहिले वैद्यकीय सल्लागार म्हणून देखील ते ओळखले जातात. कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी 1901 प्रवेश घेतला. हे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी त्यांनी लंडनमधील सेंट बार्थोलोम्यू हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज केला. मात्र आशियाई विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश दिला जात नाही हे कारण देत डीनने 29 वेळा त्यांचा अर्ज फेटाळला होता. अखेर 30व्या वेळी त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला. पुढे 1911 साली ते एकाच वेळी रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्सचे सदस्य आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जनचे फेलो होण्यासाठी पात्र ठरले. भारतात परतल्यानंतर ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी 14 वर्षे कार्यभार सांभाळला. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने “भारतरत्न” या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. वैद्यकीय क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधनासाठी 1976 सालापासून त्यांच्या नावे वार्षिक पुरस्कार प्रदान केला जातो. अशा या थोर व्यक्तिमत्त्वाचे निधनही 1 जुलै 1962 या दिवशी झाले.