Friday, January 16, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 01 जानेवारी 2026

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 01 जानेवारी 2026

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 01 जानेवारी 2026; वार : गुरुवार
  • भारतीय सौर : 11 पौष शके 1947; तिथि : त्रयोदशी 22:23; नक्षत्र : रोहिणी 22:48
  • योग : शुभ 17:12; करण : कौलव 12:06
  • सूर्य : धनु; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 07:10; सूर्यास्त : 18:10
  • पक्ष : शुक्ल; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

प्रदोष

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – मेष राशीच्या जातकांना वर्षाच्या पहिल्या दिवशी एखादी चांगली बातमी मिळेल. मात्र तुम्हाला असे काही काम करण्यास भाग पाडले जाऊ शकते, जे इतरांसाठी गैरसोयीचे असेल. कायदेशीर वादात यश मिळाल्याने आर्थिक फायदा होईल. जागा बदलण्याची योजना असेल तर, ती देखील यशस्वी होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या किंवा संततीच्या वागण्यावरून नाराज असाल.

वृषभ – वृषभ राशीच्या जातकांनी वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आजचा दिवस कुटुंबासोबत आनंदाने व्यतित कराल. दुपारपर्यंत एखादी चांगली बातमी मिळेल. संध्याकाळी, दीर्घकाळापासून वाट पाहत असलेल्या पाहुण्यांचे आगमन आनंद देऊन जाईल. रात्री एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी झाल्याने तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल.

मिथुन – तुम्ही ज्या प्रकारे सोशल मीडियाचा वापर करत आहात, त्यामुळे लोकांन तुमच्याबद्दल सकारात्मक भावना आणि आधार वाटेल. दुपारपर्यंत आर्थिक अडचणीही कमी होतील. मात्र नोकरीच्या ठिकाणी मंद गतीने सुरू असणाऱ्या कामामुळे मानसिक ताण येऊ शकतो. प्रत्येक गोष्टीचा दुहेरी अर्थ असू शकतो, म्हणून बोलताना शब्द काळजीपूर्वक वापरा.

कर्क – वर्षाचा पहिला दिवस थोडा त्रासदायक असेल. सकाळपासूनच तुम्हाला नकारात्मकता जाणवत राहील. आज आरोग्याच्या समस्या देखील जाणवू शकतात. दिवसाच्या पूर्वार्धात स्वतःच्या आरोग्यासाठी योग, प्राणायम करणे योग्य ठरेल. त्यानंतर, महत्त्वाची कामे पूर्ण करू शकता.

सिंह – सिंह राशीच्या जातकांसाठी वर्षाचा पहिला दिवस अत्यंत शुभ राहणार आहे. व्यवसाय, नोकरी आणि कौटुंबिक जीवनात तुमच्यासाठी सर्व काही चांगले घडत आहे. व्यवसायाची परिस्थिती देखील सुधारत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने, कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.

कन्या – कन्या राशीचे जातक आजचा दिवस धर्मादाय कार्यात घालवतील. तुम्ही चांगल्या मूडमध्ये असता तेव्हा प्रियजनांना मदत करण्यास तत्पर असता, आज अशाच लोकांना मदत करण्यात पुढाकार घेणार आहात, असे दिसते. मात्र लक्षात ठेवा की, फक्त त्यांनाच मदत करा जे खरोखरच पात्र आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने मित्रांसोबत चर्चा शक्य आहे.

तुळ – या राशीच्या जातकांना आज नशिबाची मोठी साथ मिळेल. तुम्हाला कोणत्याही परीक्षा किंवा स्पर्धांसाठी तयार राहावे लागेल. व्यवसायाशी संबंधित काही व्यवहार किंवा कागदपत्रे तयार करायची असतील तर, त्यासाठी आजचा दिवस अतिशय योग्य आहे.

वृश्चिक – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी वर्षाचा पहिला दिवस संमिश्र परिणाम घेऊन येईल. काही गोष्टी तुमच्या अपेक्षांविरुद्ध घडतील. ज्याला सज्जन मानता तोच तुमचा विश्वासघात करू शकतो. तुम्हालाही अशाच घटनांना सामोरे जावे लागू शकते, ज्यामुळे तुम्हाला दुःख होईल‌. काही कामे वेळेत पूर्ण केल्याने आर्थिक फायदा होईल. एखाद्या चांगल्या बातमीमुळे निराशा दूर होईल.

धनु – धनु राशीच्या जातकांना सकाळीच एखादी चांगली बातमी मिळेल. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही एखाद्या छोट्या कामात चूक होण्याची चिंता करत होता. मात्र आज कामात सुधारणा होत असल्याने तुम्हाला बरे वाटेल. दुपारी थोडीशी धावपळ होईल, पण त्याचा फायदा होऊ शकतो.

हेही वाचा – Alcoholism : क्रांतिकारी शोधामागची कथा!

मकर – मकर राशीच्या जातकांसाठी, वर्षाचा पहिला दिवस त्यांच्या बौद्धिक क्षमता वाढवणारा असेल. चांगल्या लोकांशी होणाऱ्या भेटीगाठी आणि महत्त्वपूर्ण लाभाची शक्यता, यामुळे दिवस फलदायी वाटेल. कुटुंबातील सदस्यांकडूनही चांगली बातमी मिळेल आणि शुभ कार्यक्रमाचे नियोजन करताना तुमचा सल्ला घेतला जाईल.

कुंभ – आजचा दिवस कामावर वेळेत जाण्याचा आणि उशिरापर्यंत थांबून सर्व कामे पूर्ण करण्याचा आहे. काही जवळच्या लोकांमुळे तुमची चिंता वाढेल. दिवसाच्या अखेरीस तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. त्याचबरोबर, तब्येतीची काळजी घ्या, पथ्येपाणी सांभाळा.

मीन – दिवसाच्या पूर्वार्धात तुम्हाला एकाच वेळी अनेक कामे करावी लागतील. शक्य तितक्या महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करा. दुपारनंतर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. परिणामी काम अनावश्यकपणे रखडेल. निराश न होता, गरज पडली तर मित्रांची मदत अवश्य घ्या.


दिनविशेष

विचारवंत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर

टीम अवांतर

प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा जन्म 1 जानेवारी 1943 रोजी गोव्यातील माशेल गावी झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक अडचणी सोसून त्यांना आपले शिक्षण पूर्ण करावे लागले. मुंबईच्या Institute of Chemical Technology मधून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. नंतर मुंबई विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर सहा वर्षे ते अमेरिकन विद्यापीठात शिकविण्याचे काम करीत होते.

भारतात परत आल्यावर पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत वैज्ञानिक म्हणून त्यांनी संशोधनाला सुरूवात केली. Fluid mechanics, Polymer Chemistry, Gel Science हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. यात मूलभूत काम करून त्यांनी औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त रसायने तयार केली.

1989 मध्ये ते राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक तर 1995 मध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ या राष्ट्रीय संघटनेचे महासंचालक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. या दोन्ही संस्थांमध्ये कार्यरत असताना त्यांनी देशातील संशोधनक्षेत्राला योग्य दिशा देण्याचे काम केले. 2006 मध्ये ते महासंचालक पदावरून निवृत्त झाले.

हेही वाचा – समीर अन् अपर्णा… दैव जाणिले कुणी?

अमेरिकेतील काही शास्त्रज्ञांनी हळदीच्या औषधी गुणधर्माचे आणि बासमती तांदुळाचे स्वमित्व हक्क मिळविण्यासाठी प्रयत्न केले, तेव्हा हे भारताचे पारंपरिक ज्ञान आहे हे जगाला पटवून देण्यात माशेलकर यांनीच पुढाकार घेतला होता. त्यानंतर त्यांनी भारतीय पारंपरिक ज्ञानाची जंत्री बनविण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले.

राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. एस. एस. भटनागर पुरस्कार, पंडित जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान पुरस्कार, जी. डी. बिर्ला वैज्ञानिक संशोधन पुरस्कार, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार, जे. आर. डी.  टाटा औद्योगिक नेतृत्व पुरस्कार हे त्यातील काही पुरस्कार आहेत. भारत सरकारच्यावतीने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण देऊन गौरविण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील माशेलकर यांच्या कामाची दखल घेतली गेली आहे. थर्ड वर्ल्ड अकॅडेमी ऑफ इंजिनिअरिंगचे सभासदत्व, लंडनच्या रॉयल सोसायटीचे सभासदत्व, वर्ल्ड अकॅडेमी ऑफ आर्ट अँड सायन्सचे सभासदत्व, यूएस नॅशनल अकॅडेमी ऑफ इंजिनीअरिंगचे सभासदत्व, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्रीचे सभासदत्व, यूएस ॲकॅडेमी ऑफ इनोव्हेटर्सचे सभासदत्व असे अनेक बहुमान त्यांना बहाल करण्यात आले आहेत.

भारतात संशोधन करण्यासाठी लागणाऱ्या सुविधा पुरविणे हे त्यांचे ध्येय आहे. त्यासाठी त्यांनी नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनची स्थापना केली आहे. फाऊंडेशनच्या स्थापनेपासून 2018 पर्यंत ते स्वत: या संस्थेचे अध्यक्ष होते. वैयक्तिक स्तरावर नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या आईच्या नावाने अंजनी माशेलकर पुरस्काराची सुरूवात केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!