Monday, March 2, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरKitchen Tips : डोसा, सामोसे, बाकरवडी अन् सँडविच तयार करताना…

Kitchen Tips : डोसा, सामोसे, बाकरवडी अन् सँडविच तयार करताना…

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये डोशाबरोबरच बाकरवडी, सामोसे आणि सँडविच बनविण्याच्या टिप्स पाहूयात.

  • बाकरवडी, सामोसे किंवा खारी शंकरपाळी करताना कोरडा मैदा पुरचुंडीत बांधून 10 मिनिटे कुकरमध्ये डब्यात ठेवून वाफवून घ्यावा. कुरकुरमध्ये खाली पाणी घालावे. प्रेशर गेल्याबरोबर पिठात थोडेसे मोहन घालून पीठ मळावे. एका वाटीला एक चमचा मोहन पुरते. या पिठाची पारी खूपच खुसखुशीत होते. मुख्य म्हणजे मोहन खूपच कमी लागते.
  • डोसा कुरकुरीत होण्यासाठी अर्धा किलो तांदूळ, पाव किलो उडीद डाळीबरोबर एक मोठी वाटी भरून वऱ्याचे तांदूळ, मूठभर तूरडाळ, चमचाभर मेथी घातल्यास डोसा कुरकुरीत तर होतोच, पण त्याला रंगही सुरेख येतो.

हेही वाचा – Kitchen Tips : शिळ्या भाताचे उत्तप्पे, ब्रेडचे थालिपीठ अन् बरंच काही…

  • डोसे करतेवेळी डोशाच्या पिठातच एकदम डावभर तेल घालावे आणि पीठ चांगले ढवळून शक्यतो नॉनस्टिक तव्यावर डोसे घालावेत. म्हणजे कमी तेलात चांगले डोसे तयार होतात.
  • चकली करताना भाजणीच्या पिठामध्ये, पिठाच्या अंदाजाने कांदे किसून घालावेत आणि थोडे आंबट दही घालावे. नंतर नेहमीप्रमाणे तिखट, मीठ, तीळ, ओवा, खसखस आणि गरम तेलाचे मोहन घालून पीठ भिजवावे. चकलीला वेगळीच सुंदर चव येते.
  • तयार पिझ्झा बेस आणल्यावर प्रथम पाण्यातून काढावा आणि नंतर ओव्हनमध्ये किंवा तव्यावर पिझ्झा करण्यास ठेवावा. पाण्यातून न काढता लगेच ओव्हनमध्ये ठेवल्यास पिझ्झा कडक बनतो.
  • इलेक्ट्रिक सँडविच टोस्टरमध्ये ब्रेडच्या चार सँडविच तयार होतात. लहान मुलांना टोस्ट ब्रेडचा आकार थोडा मोठाच वाटतो. शिवाय, कपात बुडवायलाही ती सोयीस्कर वाटत नाहीत. तेव्हा सँडविच भाजताना, साधारण तयार होत आले असताना, टोस्टर उघडून ते त्याच साच्यांत उलटून घाला आणि टोस्टर परत बंद करा. आता आपल्याला लहान सोयीस्कर आकाराचे आठ सँडविच तयार मिळतात.

हेही वाचा – Kitchen Tips : बटाटेवडे, आलू पराठे, ढोकळा, उडीदवडे…

  • पावसाळ्यात चुरमुरे मऊ पडतात. त्याचे भडंग चांगले होत नाहीत. अशा वेळी चुरमुरे पोह्यांप्रमाणे भिजवून, पोहे करतो तसे करावेत. शिवाय, त्यात भाजके डाळे, शेंगदाणे अर्धवट कुटून घालावेत. म्हणजे, चवही छान येते आणि मुलांना शाळेतून आल्यावर नवीन पौष्टिक आणि चवदार पदार्थ मिळेल.
  • पेपर डोसा करतेवेळी थोड्याशा पाण्यात (अर्धी वाटी) थोडी तुरटी फिरवून ते पाणी पिठात घातल्यास डोसा पांढरा आणि कुरकुरीत होतो. तसेच त्यात साधारण एक किलो पिठात अर्धी वाटी मुगाची डाळ भिजवून वाटून घालावी. त्यामुळे डोसा हलका होऊन मऊ पडत नाही.

(‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!