Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeअवांतरसंशयिताकडून खरं वदवून घेण्यासाठी…

संशयिताकडून खरं वदवून घेण्यासाठी…

सुहास गोखले

(निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष)


अनेकदा राजकीय पक्षांच्या वादात आपण एखाद्याची नार्को टेस्ट करावी, असा उल्लेख ऐकतो, वाचतो. याच पॉलीग्राफ आणि Narco Analysis Test बद्दल थोडी प्राथमिक माहिती आज पाहुया.

आरोपी पकडल्यावर त्याच्याकडे पुरावे शोधण्याच्या चौकशीत पोलिसांच्या कुप्रसिद्ध थर्ड डिग्री मेथडला पर्याय म्हणून या टेस्ट योग्य ठरतात; मात्र कायद्यानेही या टेस्टना मर्यादा आहेत.

यात मुख्य तीन प्रकारच्या टेस्ट असतात –

  1. Polygraph test
  2. Narco analysis
  3. Brain Electro Oscillatory Signature Profile

यातील नार्को ॲनलिसीस टेस्ट ही वैद्यकीय देखरेखीखालीच पार पडते; कारण यात व्यक्तीच्या शरीरात सोडियम पेंटोथल नावाचे नार्कोटिक ड्रग टोचतात. या ड्रगचा मेंदूवर परिणाम झाला की, ती व्यक्ती कोणतीही बाब लपवून ठेवू शकत नाही. मात्र, काही व्यक्ती जर एखाद्या दडपणाखाली असल्या तर ड्रगचा परिणाम 100% होईलच, असे नाही. (तेलगीच्या नार्को टेस्टमध्ये त्याला राजकीय नेत्यांच्या सहभागाबद्दल विचारले, तेव्हा त्याने ड्रगच्या अंमलाखालीही उत्तरे देणे टाळले होते.)

हेही वाचा – मुलींमधला आवडता आणि नैसर्गिक ट्रेंड… पाऊट

नार्कोव्यतिरीक्त इतर दोन टेस्ट non-invasive प्रकारच्या आहेत. त्यात कोणतेही ड्रग न वापरता विविध शरीर प्रक्रियांवर होणारा मेंदूचा प्रभाव आलेख काढून मोजला जातो. त्यामुळे या टेस्टना ब्रेन फिंगरप्रिटिंग टेस्ट (BFT) असेही म्हणतात.

पॉलीग्राफ टेस्टचे तत्व आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती खोटे बोलते, तेव्हा तिच्या तळव्यांना घाम येणे, नाडी जलद होणे, ओठ आणि डोळ्यांभोवतीचे स्नायू आकुंचित पावणे… असे बदल होतात. हे बदल शरीराला, ईसीजी काढताना लावतात तसे इलेक्ट्रॉडस लावून मोजले जातात. असे विविध ग्राफ्स असल्याने त्याला पॉलीग्राफ टेस्ट म्हणतात. सवयीच्या खोटे बोलणाऱ्याच्या (Habitual lier) बाबतीत ही टेस्ट निष्फळ ठरते.

पॉलीग्राफ आणि नार्को टेस्ट निष्फळ झाल्यास शेवटी ब्रेन इलेक्ट्रिक ऑसिलेटरी सिग्नेचर प्रोफाईल (BEOSP) टेस्ट वापरतात. ही टेस्ट बंगलोरचे न्युरोसायंटिस्ट सी. आर. मुकुंदन यांनी विकसित केली आहे.

याचे तत्व म्हणजे प्रत्येक व्यक्ती कायमच दृश्य, वास, स्पर्श, चव अशा संवेदना स्वीकारत असतात आणि वर्गीकृत करून संग्रहित करतात. ज्या घटनेत प्रत्यक्ष सहभाग असतो, त्याच्या मेमरिज स्वतंत्र संग्रहित असतात आणि शोधता येतात. त्या व्यक्तीला त्यानुसार प्रश्न विचारून सहभागी असलेल्या आठवणी आलेखाद्वारे नोंदवता येतात. त्यामुळे अशा टेस्ट तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच केल्या जातात.

हेही वाचा – …आणि पोलीस दलात जाण्याचा निश्चय केला!

अशा टेस्टची कायदेशीर वैधता

आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 20 नुसार कोणत्याही व्यक्तीला स्वत:विरुद्ध साक्ष देण्यास भाग पाडता येत नाही. या टेस्ट म्हणजे एका अर्थी आरोपीची स्वत:विरुद्धची साक्षच असते. त्यामुळे हे सबळ पुरावे म्हणून वैध नाहीत; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन नोंदीनुसार पुरावे मिळवण्यासाठी या टेस्टचा आरोपीच्या संमतीनंतर वापर करता येतो. या टेस्टनंतर सापडलेले पुरावे न्यायालयात सहाय्यक पुरावे (Corroborative evidence) म्हणून सादर होऊ शकतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!