Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बचतीचे अनेक मार्ग…

    October 25, 2026

    Homeopathy : हॅनिमनला प्रश्न पडला…

    October 25, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 25 ते 31 ऑक्टोबर 2026

    October 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, October 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » बचतीचे अनेक मार्ग…
    ललित

    बचतीचे अनेक मार्ग…

    डॉ. विवेक वैद्यBy डॉ. विवेक वैद्यOctober 25, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, विवेक वैद्य, लेखका विवेक वैद्य, डॉक्टर विवेक वैद्य, लेखक डॉ विवेक वैद्य, पाणीटंचाई, नात्यातील प्रेम, पाणी बचतीचे मार्ग, जलपुर्भरण, वॉशिंग मशीनचा वापर, कपडे धुणे, पाण्याचे जतन, पाणी हेच जीवन, पाण्याचे महत्त्व
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    टाकी अर्धीच भरली

    ” भाऊ, आमच्याकडचे पाणी संपले. जरा तुमचे बोरिंग चालू करता का? मी माझ्याकडची नळी लावून थोडी टाकी भरून घेतो.”

    दहा मिनिटांनी…

    “भाऊ, अजून तर टाकी अर्धीच भरली आणि तुम्ही बोरिंग बंद केली.”

    “दादा, मी तुम्हाला वापरण्यासाठी पाणी देत होतो. तुम्ही तर त्या पाण्याने पोर्च धुतला, तुमची गाडी धुतली. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई असताना असे पाणी वाया घालवणे, मला चालत नाही. तुम्हाला राग आला तरी चालेल.”

    0000

    प्रेम

    “हॅलो वहिनी, या सुट्टीत मी आणि मुले येणार होतो ना? ते कॅन्सल केले.”

    “का हो वन्स? तुम्ही आणि मुलं दरवर्षी येतात. छान धमाल येते. यावर्षी काय झाले? आमच्यकडून काही चूक झाली का?”

    “काहीही काय वहिनी! पण गावाकडच्या बातम्या येतात इकडे… खूप पाणीटंचाई आहे तिकडे. मिळणाऱ्या पाण्यात तुमचेच भागत नाही, तर आमच्या तीन जणांची अजून कशाला भर?  पुढच्या वर्षी नक्की येऊ… आणि एक वर्ष न येण्याने आपल्यातले प्रेम थोडे कमी होणार?”

    हेही वाचा – असेही काही तर्काच्या पलीकडचे!

    0000

    जल पुनर्भरण

    “हॅलो, नमस्कार बाबा. तुम्ही सारखे बोलवत आहात ना? अधिक महिन्याचे या जावईबापू… तर या शनिवार, रविवार येतो आम्ही दोघे. ”

    “जरूर जरूर. आम्ही वाट पाहू.”

    “बरं… ते अधिक महिन्याचे काय देणार?”

    “रितीप्रमाणे सगळे! 33 अनारसे… तुमच्यासाठी शर्ट, पॅन्ट… पोरीसाठी साडी… चांदीची थाळी…”

    “बस्स एवढेच.”

    “अजून काही लागत असेल तर सांगा जावईबापू… नक्की व्यवस्था करू?”

    “ठीक आहे. आम्ही दोघे येतो, पण तुम्ही जे देतायेत त्यातले काहीच नको. आम्हाला फक्त एक आमरसपुरीचे जेवण द्या आणि अनारसे स्टीलच्या डब्यात द्या. जेवढे पैसे माझ्या मानपानावर खर्च करणार ते बाजूला ठेवा… आपली बोरिंग चालू आहे?”

    “हो. पण आता उन्हाळ्यात पाणी कमी झाले आहे.”

    “मी येताना माझ्या एका मित्राला घेऊन येतो. तो जल पुनर्भरणाचे काम करतो. यावर्षी ते करून टाकू. म्हणजे दर उन्हाळ्यात पाण्याचा जो त्रास होतो, तो कमी होईल. चालेल ना?”

    “चालेल काय पळेल…”

    हेही वाचा – दारू सोडली… कायमची!

    0000

    वॉशिंग मशीन

    “अगं शांता… एक विचारायचं होतं?

    “बोला ना ताई. काही जास्तीचे काम करून द्यायचे आहे का? कोणी पाहुणेराऊणे येणार आहेत का? ”

    ” नाही गं. तू आमच्याकडे भांडी घासायला येतेच, धुणे धुवायला पण येशील? तुझे जे काही पैसे ते मी देऊन टाकेन.”

    “येईन की ताई… त्यात काय? पण तुम्ही तर वॉशिंग मशीन लावतात ना?”

    “हो. पण यावर्षी पाणीटंचाई आहे ना. मशीन लावले के खूप पाणी वापरले जाते आणि बरेचदा आवश्यकता नसताना जास्तीचे कपडे टाकले जातात. तू कामाला येशील, तर मोजकेच कपडे धुवायला टाकू… आणि पाणीही जपून वापरता येईल.”

    0000

    Avatar photo
    डॉ. विवेक वैद्य

    General practitioner असून ते नंदुरबार येथे राहतात. गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या FB वॉल वर तसेच साहित्यिक ग्रुप आणि वेबसाइटवर कथा लिहित असतात. नुकताच त्यांचा ‘काही कथा काही व्यथा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या कथा सामाजिक तसेच खासकरून स्त्रियांविषयी असतात. स्त्रियांची घरात होणारी घुसमट आणि हतबलता... तसेच शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाविषयीही त्यांनी लिहिले आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक अलकही लिहिल्या.

    Related Posts

    कविताचा मोठा निर्णय…

    October 24, 2026 ललित

    पाणीपुरी आणि फक्त पाणीपुरी

    October 24, 2026 ललित

    माधवसोबतची ती अज्ञात व्यक्ती कोण?

    October 23, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    कविताचा मोठा निर्णय…

    By प्रदीप केळुस्करOctober 24, 2026

    उत्तरार्ध कविता आणि निरंजनचे लग्न होऊन 18 वर्षं झाली तरी, त्यांना मुलबाळ नव्हतं. कविताला हेच…

    पाणीपुरी आणि फक्त पाणीपुरी

    October 24, 2026

    माधवसोबतची ती अज्ञात व्यक्ती कोण?

    October 23, 2026

    शरयूच्या प्रश्नाने उमाला चिंता

    October 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    बचतीचे अनेक मार्ग…

    October 25, 2026

    Homeopathy : हॅनिमनला प्रश्न पडला…

    October 25, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 25 ते 31 ऑक्टोबर 2026

    October 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : रात्रि तैसें पाहलें, हें धारणा जेवीं एक जालें

    October 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 25 ऑक्टोबर 2026

    October 25, 2026

    कविताचा मोठा निर्णय…

    October 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 482
    • अवांतर 217
    • आरोग्य 164
    • पंचांग आणि भविष्य 646
    • फिल्मी 75
    • फूड काॅर्नर 262
    • मैत्रीण 33
    • ललित 1015
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    बचतीचे अनेक मार्ग…

    October 25, 2026

    Homeopathy : हॅनिमनला प्रश्न पडला…

    October 25, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 25 ते 31 ऑक्टोबर 2026

    October 25, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.