आराधना जोशी
साहित्य
- हरभरा डाळ – दीड वाटी
- तेल – 3 टेबलस्पून
- हिरव्या मिरच्या – 2 ते 3
- आलं – 1 इंच
- कढीलिंब पाने – सात ते आठ
- साखर – 1 टेबलस्पून
- मीठ – चवीनुसार
- मोहरी – 1 लहान चमचा
- हिंग – पाव लहान चमचा
- हळद – अर्धा लहान चमचा
- लिंबू – अर्धे
- कोथिंबीर – आवडीनुसार (वरून सजावटीसाठी)
- ओलं खवलेलं खोबरं – आवडीनुसार (वरून सजावटीसाठी)
पुरवठा संख्या : 7 ते 8 जणांसाठी
तयारीस लागणारा वेळ :
- हरभरा डाळ भिजण्यासाठी 5 तास
- भिजवलेली डाळ वाटून घ्यायला 7 मिनिटे
- शिजवण्याचा वेळ : साधारणपणे 20 मिनिटे
- एकूण वेळ : 5 तास 27 मिनिटे
विशेष आहार माहिती : शाकाहारी
हेही वाचा – Recipe : खमंग आणि रुचकर मूंगलेट
कृती
- हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून 5 तासांसाठी पुरेशा पाण्यात भिजवून ठेवा.
- पाच तासांनी डाळ उपसून मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमधून फिरवून घ्या. फिरवताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. एकदा फिरवून झाल्यानंतर त्यात आलं, हिरवी मिरची घालून पुन्हा एकदा मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमधून फिरवून घ्या. वाटताना ही डाळ पूर्ण बारीक करायची नाही, जरा जाडसरच ठेवायची.
- कढईत फोडणीसाठी तेल तापायला ठेवा. तेल गरम झाले की, त्यात मोहरी घाला. मोहरी चांगली तडतडली की, मग त्यात हिंग, हळद आणि कढीलिंब पाने घाला. त्यात वाटलेली डाळ घालून एकदा छान ढवळून घ्या आणि त्यावर झाकण ठेवा.
- डाळ शिजायला साधारपणे पाच ते सहा वाफा द्याव्या लागतात. एक वाफ तीन मिनिटांची असते.
- डाळीला पाच वाफा आल्या की, त्यात चवीनुसार मीठ, साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून सगळं छान मिक्स करून शेवटची वाफ येऊ द्या.
- शेवटची वाफ आली की, गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खवलेलं ओलं खोबरं घाला.
हेही वाचा – Recipe : नारळाच्या रसातील अळूवडी
टीप
- डाळ वाटून झाल्यावर कुकरच्या भांड्यात काढून दोन शिट्ट्या देऊन मग फोडणीला टाकली तर तेलही कमी लागते आणि डाळही लवकर होते
- हिरव्या मिरचीचे प्रमाण कमी करून फोडणीत अर्धा छोटा चमचा लाल तिखटही वापरू शकता.
- फोडणी देताना मोहरीबरोबरच जिरंही वापरू शकता.
- वाटल्या डाळीचा नैवेद्य बाप्पालाही दाखवू शकता.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.