सायली कान्हेरे
थंडी पडायला सुरुवात झाली आहे. अशा वातावरणात गरमागरम सूप प्यायला खूप मजा येते. पण ही सूप्स करायला काहींना कठीण वाटतात. आज मी एका सोप्या सूपची रेसिपी सांगणार आहे. जी करायला सोपी आणि खूप टेस्टी आहे. तुम्हीही नक्की करून बघा.
साहित्य
- कुळीथ पीठ – 4 टेबलस्पून
- लसूण पाकळ्या – 4
- हिरवी मिरची – 1
- मोहोरी – पाव टीस्पून
- जिरं – पाव टीस्पून
- पाणी – 4 वाट्या
- आमसुले – 2
- साखर – 3 चमचे
- मीठ – चवीनुसार
- साजूक तूप – 3 चमचे
पुरवठा संख्या : 2 व्यक्तींसाठी
तयारीस लागणारा वेळ : लसूण सोलायला – 1 मिनिट
शिजवण्याचा वेळ : 15 मिनिटे
एकूण वेळ : 16 मिनिटे
हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट कोळाचे पोहे
कृती
- सोलून घेतलेले लसूण, मोहरी, जिरं आणि मिरची खडबडीत वाटून घ्या.
- नंतर कुळीथ पिठात पाणी घालून सरसरीत कालवून घ्या. पिठात गुठळी राहू देऊ नका.
- आता गॅसच्या मंद आचेवर कढईत 2 चमचे साजूक तूप घाला.
- त्यात वाटून घेतलेले लसूण, मोहरीचे वाटण घाला. हे वाटण तुपात खरपूस भाजून घ्या.
- आता त्यात कुळथाची पाण्यात कालवून घेतलेली पिठी घाला.
- नीट ढवळून मीठ, साखर आणि आमसूल घाला.
- हे सूप पातळच असते. त्यामुळे त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला.
- छान उकळी आली की, गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
- वाढताना वरून 1 चमचा तूप घालून सर्व्ह करा.
हेही वाचा – Recipe : खमंग कोबी पोहे अन् पास्ता सलाड
विशेष आहार माहिती : शाकाहारी, प्रोटिनयुक्त
टिप्स
- याचप्रमाणे हिरव्या मूगाचे पीठ, बाजरी पीठ वापरून त्याचेही सूप करता येते.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि, त्यासाठी वरील फॉरमॅटमध्ये रेसिपी द्यावी.


