Friday, February 20, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरRecipe : शेवग्याच्या शेंगांची गोडी आमटी

Recipe : शेवग्याच्या शेंगांची गोडी आमटी

रश्मी ठोसर

शेवग्याच्या उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर असून आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. महाराष्ट्रात शेतांमध्ये, बागांमध्ये तसेच शहरांमध्ये लागवडीखाली शेवग्याचे वृक्ष दिसून येतात. आयुर्वेदानुसार शेवग्याचे मूळ, खोड, पाने, फुले, फळे आणि बिया इत्यादी भाग उपयुक्त आहेत. मुळांचा रस दमा, संधिवात, प्लीहा आणि यकृतवृद्धी, मुतखडा यावर उपयोगी असतो. मुळांच्या सालींचा रस कानदुखीवर वापरतात. तर, त्याची साल कोकणात नारूसाठी वापरतात. पाने आणि फुले कृमिनाशक, वायूनाशी मानली जातात. शेंगा आतड्याच्या कृमींवर प्रतिबंधक आहेत. शेवग्याच्या शेंगांचा उपयोग आहारात अनेक प्रकारे करतात. आता आपण त्याची गोडी आमटी कशी करतात ते पाहू.

हेही वाचा – Recipe : केळफुलाचे वडे ट्राय केले आहेत का?

साहित्य

  • शेवग्याच्या शेंगा – 2
  • डाळिंब्या – 2 वाट्या (सोललेल्या)
  • ओले खोबर – अर्धा वाटी
  • तांदूळाचे पीठ – 1 टेबलस्पून
  • जिरे पावडर – 2 टीस्पून
  • लाल तिखट – 1 टिस्पून
  • काळीमिरी पावडर – अर्धा टीस्पून
  • गूळ – 2 टेबलस्पून
  • तूप – 1 टेबलस्पून (फोडणीसाठी)
  • हिंग – पाव टीस्पून
  • मीठ – चवीनुसार

कृती

  1. शेवग्याच्या शेंगाचे मध्यम आकाराच्या तुकडे करून घ्यावेत.
  2. कढईत तूप घालून गरम करावे.
  3. नंतर त्यात हिंग घालून डाळिंब्या आणि शेवग्याच्या शेंगाचे तुकडे घालावेत आणि दोन मिनिटे व्यवस्थित परतून घ्यावे.
  4. नंतर त्यात पाणी घालून कढईवर झाकण ठेवून शिजवून घ्यावे.
  5. डाळिंब्या आणि शेवग्याच्या शेंगा शिजल्यावर दोन टेबलस्पून जिरे पावडर, एक टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून काळीमिरी पावडर तसेच चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे आणि झाकण ठेवून वाफ आणावी.
  6. ओले खोबरे आणि तांदळाच्या पीठात थोडे पाणी घालून मिक्सरमधून गंध वाटून घ्यावे.
  7. नंतर हे मिश्रण आणि गूळ डाळिंब्या तसेच शेवग्याच्या शेंगांच्या आमटीत घालून एक चांगली उकळी आणावी आणि गॅस बंद करावा.

एकूण कालावधी – 40 मिनिटे


तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

avaantar.recipe@gmail.com

या ईमेलवर किंवा

9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!