Sunday, February 22, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरRecipe : साल असलेल्या उडदाच्या डाळीची आमटी

Recipe : साल असलेल्या उडदाच्या डाळीची आमटी

कामिनी व्यवहारे

उडीद हे उत्तम पौष्टिक खाद्य आहे. उडदाची शिजविलेली डाळ मातेला दुग्धवर्धक असते. तिच्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात. तिच्यात फॉस्फोरिक आम्लही असते. उडदाचे पीठ डोसा, इडली, वडा आणि पापड बनविण्यासाठी वापरतात. अशा पदार्थांमध्ये पांढरे उडीद (साल काढलेले) वापरतात. पंजाबात तुरीच्या डाळीपेक्षा उडदाची डाळ जास्त प्रमाणात खातात. पंजाबी अन्नपदार्थांत तिचा जास्त वापर होतो. साल असलेल्या उडीद डाळीची आमटी देखील खूपच स्वादिष्ट असते.

साहित्य

  • साल असलेली उडीद डाळ – 1 वाटी
  • चिरलेली कोथिंबीर – अर्धी वाटी
  • लाल मिरच्या – 4 ते 5 (सुक्या)
  • लसूण पाकळ्या – 10 ते 15
  • कढीपत्ता – 7 ते 8 पाने
  • गोडा मसाला – दीड चमचा
  • तेल – पाव वाटी (फोडणीसाठी)
  • मोहरी – 1 छोटा चमचा
  • हिंग – 1 छोटा चमचा
  • हळद – 1 छोटा चमचा
  • मीठ – चवीनुसार

हेही वाचा – Recipe : असा सुरती उंधियू करून पाहिला आहे का?

कृती

  1. उडदाची डाळ 2 ते 3 वेळा पाण्यात धुऊन घेणे.
  2. नंतर कुकरमध्ये 3 ते 4 शिट्या करून ती शिजवून घ्यावी.
  3. डाळ शिजल्यानंतर ती घोटून ठेवावी.
  4. लसणाच्या पाकळ्या बारीक करून ठेवाव्यात.
  5. गॅसवर कढई ठेवून त्यात फोडणीसाठी तेल तापवून घ्यावे. नंतर त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, हळद, लाल मिरच्या तसेच बारीक केलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकाव्यात.
  6. नंतर आपण शिजवून घोटून घेतलेली डाळ आणि 3 वाट्या पाणी टाकून गोडा मसाला आणि चवीपुरते मीठ टाकावे.
  7. कोथिंबीर टाकून 5 मिनिटे उकळू द्यावे.
  8. आवडत असेल तर आमटी तयार झाल्यावर परत लसणाची फोडणी द्यावी, जास्त टेस्टी लागते.
  9. ही आमटी गरम भात किंवा भाकरीबरोबर छान लागते.

हेही वाचा – Recipe : खमंग कोबी, मटार वडी (पानगा)

  • पुरवठा संख्या – 3 ते 4 व्यक्तींसाठी
  • तयारीस लागणारा वेळ – 30 मिनिटे
  • आमटी तयार होण्यास लागणारा एकूण वेळ – 45 ते 50 मिनिटे

तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर,

avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा

9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा.

या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!