कामिनी व्यवहारे
साहित्य
- बारीक चिरलेला कोबी – 2 वाट्या
- मटार – 2 वाट्या
- बटाटा – 1 किंवा 2
- डाळीचे पिठ – 2 वाट्या
- तांदळाचे पिठ – 1 वाटी
- लाल तिखट – 3 चमचे
- हळद – 1 छोटा चमचा
- मीठ – चवीनुसार
- तेल – 1 वाटी
हेही वाचा – Recipe: सुरणाची अशी भाजी टेस्ट केली आहे का?
कृती
- प्रथम कोबी, मटार आणि बटाटा कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून वाफवून घ्यावा.
- डाळीचे पिठ आणि तांदळाचे पिठ एकत्र करून थोडे कढईत भाजून घ्यावे.
- बटाटे गार झाल्यावर त्याची साले काढून छोट्या फोडी करून घ्याव्यात.
- भाजलेल्या पिठात कोबी, मटार, बटाटा, हळद, तिखट, चवीपुरते मीठ आणि थोडेसे तेल टाकून सर्व मिक्स करून थोडे थोडे पाणी घालून सैलसर भिजवावे (घावनाच्या पिठापेक्षा थोडे घट्ट ठेवावे).
- नंतर केकच्या भांड्याला आतून सर्वकडे तेल लावून घ्यावे आणि त्यात वरील मिश्रण ओतावे.
- केकच्या भांड्याच्या खालच्या ताटलीत वाळू घालून केकचे भांडे झाकण लावून मंद आचेवर ठेवावे. (10 – 10 मिनिटांनी झाकण अलगद काढून वडी नीट शिजतेय का ते बघावे.)
- वडी वरतून लाल झालेली दिसली की, गॅस बंद करावा. वडी गार झाल्यावर ताटात ते भांडे उलटे करावे, वडी सुटून येते.
हेही वाचा – Recipe : केळफुलाचे वडे ट्राय केले आहेत का?
टिप्स
- केकच्या भाड्याखाली वाळू नसल्यास ताटलीत मीठ घेऊन ती गॅसच्या मंद आचेवर ती ताटली ठेवावी.
- ही वडी दह्याबरोबर, शेंगदाणा तेलाबरोबर किंवा सॉसबरोबर खायला छान लागते.
- ही वडी ओव्हनमध्ये देखील केकसारखी करता येते.
- काही ठिकाणी या वडीला कोबीचा पानगाही म्हणतात.
तयारी करण्यासाठी लागणारा वेळ – 30 ते 40 मिनिटे
वडी तयार होण्यास लागणारा वेळ – 40 ते 50 मिनिटे
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
तथापि, वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी.


