Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरKitchen Tips : स्पंजी इडली, स्वादिष्ट आलू परोठे, खमंग अळुवडी…

Kitchen Tips : स्पंजी इडली, स्वादिष्ट आलू परोठे, खमंग अळुवडी…

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात –

  • आपण डाळीच्या कोरड्या पिठात बुडवून वांग्याचे काप करतो. त्यात निम्मे तांदळाचे आणि निम्मे डाळीचे पीठ तसेच चमचाभर साखर घातली असता काप लगेच मऊ पडत नाहीत. बराच वेळ कुरकुरीत राहतात. चवीलाही साखरेमुळे चांगले लागतात.
  • शंकरपाळी करताना एकट्या गृहिणीची तारांबळ उडते. त्यासाठी सोपा उपाय म्हणजे शंकरपाळ्याचे पीठ भिजवून त्याच्या थोड्या जाडसर पोळ्या लाटाव्यात आणि तव्यावर डाग पडू न देता अर्धवट भाजाव्यात. गार झाल्यावर चौकोनी तुकडे कापून मंद आचेवर गुलाबी रंगावर तळावेत. बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत लागतात.
  • ब्रेड-रोल किंवा ब्रेडचा मधला भाग काढून त्याचे दहिवडे इत्यादी केल्यावर बाजूच्या लाल कडा खूप उरतात. त्या पावसाळ्यात चुरडून वाळविता येत नाहीत. तेव्हा त्या सर्व कडा पाण्यात किंवा थोड्या ताकामध्ये 5 ते 10 मिनिटे भिजत ठेवाव्यात. नंतर लाल मिरच्या, आले, बारीक चिरलेला कांदा, कढीलिंब पाने, उडदाची डाळ हे सर्व साहित्य तेलाच्या फोडणीत घालावे आणि त्यावर ब्रेडच्या मऊ झालेल्या कडा चुरडून-कुस्करून घालाव्यात. नंतर आवडीप्रमाणे मीठ टाकावे. या मिश्रणावर एक वाफ येऊ द्या आणि झाले खुसखुशीत उप्पीट तयार! ओले खोबरे, कोथिंबीर घालून गरमागरम खायला द्या. वाटल्यास उडदाचा पापड भाजून तोंडी लावायला ठेवा.

हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड…

  • अळूवडी करताना डाळीचे पीठ न घालता थालीपिठाची भाजणी घालून अळूवड्या कराव्यात. फारच चविष्ट आणि चुरचुरीत होतात.
  • केकसाठी लागणारे सर्व साहित्य एकत्र करावे आणि त्यात दूध टाकून पातळ करावे. नंतर त्याचे पोळे तव्यावर काढावेत. कमीत कमी वेळात चवदार नवीन पदार्थ तयार! यामुळे इंधन बचतपण होते. तसेच केक तयार होण्यासाठी लागणारा वेळ वाचतो.
  • इडली मऊ राहण्यासाठी इडली, डाळ, तांदूळ भिजवलेले असते, ते वाटताना नारळाच्या पाण्यात वाटावे. इडली मऊ राहते.
  • भजी कुरकुरीत होण्यासाठी पिठात अर्धा डाव गरम तेल घालून पीठ रवीने घुसळावे.

हेही वाचा – Kitchen Tips : पौष्टिक नूडल्स, चटपटीत शेवेची भाजी अन् मिरिंडा केक…

  • दहीवडे, बटाटेवडे इत्यादी कुठल्याही प्रकारचे वडे करताना पिठात सोडा घालण्याऐवजी तेल तापल्यावर त्यात किंचित सोडा घालावा.
  • डोशासाठी भिजवलेले तांदूळ आणि उडीद डाळ मिक्सरमधून काढावेत. त्याचबरोबर जाडे पोहे भिजवून तेही मिक्सरमधून काढावेत. डोशाचा रंग सुरेख येतो.
  • इडली किंवा ढोकळा हलका होण्यासाठी त्याचे पीठ भिजवताना त्यात चिमूटभर तुरटीची पूड टाकावी. इडली अगर ढोकळा खूप हलके आणि स्पंजी होतात.
  • बटाट्याचे परोठे बनविताना बटाट्यात लोणच्याचा थोडा उरलेला मसाला घालावा. परोठे खूपच स्वादिष्ट होतात.

(‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!