आराधना जोशी
साहित्य
- बारीक चिरलेला पालक – 1 वाटी
- किसलेले गाजर – 1 (मध्यम आकाराचे)
- बारीक चिरलेला कांदा – 1 (मध्यम आकाराचा)
- हिरव्या मिरच्या – 2 (बारीक चिरलेल्या)
- आले – पाव इंच (किसलेले)
- तीळ – 1 टेबलस्पून
- हळद – अर्धा टीस्पून
- ताजी मिरपूड – 1 टीस्पून
- हिंग – पाव टीस्पून
- काश्मिरी लाल तिखट – अर्धा टेबलस्पून
- जिरे पावडर – अर्धा टेबलस्पून
- ओवा – एक टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- बारीक चिरलेली कोथिंबीर – पाव वाटी
- ज्वारीचे पीठ – अर्धी वाटी
- सत्तू पीठ / बेसन – पाव वाटी
- आमचूर पावडर – 1 टेबलस्पून
- तेल – गरजेनुसार
पुरवठा संख्या : 4 व्यक्तिंसाठी
तयारीस लागणारा वेळ : 10 मिनिटे
शिजवण्याचा वेळ : प्रत्येक थालिपीठासाठी साधारणपणे 10 मिनिटे
एकूण वेळ : 35 मिनिटे
हेही वाचा – Recipe : वांग्याचे खानदेशी भरीत
कृती
- एका वाडग्यात तेल सोडून सर्व साहित्य घ्या आणि हाताने छान मिक्स करा.
- आता लागेल तसे पाणी घालून पीठ व्यवस्थित भिजवून घ्या.
- हातात छोटासा गोळा घेऊन अंगठ्याने पसरवून बघा. सहजपणे मिश्रण पसरले तर पाण्याचे प्रमाण योग्य आहे असे समजा.
- आता तव्याला तेल लावून वरील मिश्रणाचा एक गोळा घेऊन तो थापून घ्या.
- मधे भोकं पाडून त्यात तेल घालून मंद आचेवर तवा ठेवा. वरून झाकण ठेवा.
- तेल कमी वापरायचे असेल तर, तव्यावर मिश्रण थापून झाल्यावर भोकं न पाडता मंद आचेवर तवा ठेवून त्यावर झाकण ठेवा.
- दोन मिनिटांनी झाकण काढा. खालची बाजू एकदा बघा. खरपूस झाली असेल तर पलटवून दुसरी बाजूही खरपूस भाजून घ्या.
- गरमागरम थालिपीठाचा दह्यासोबत, शेंगदाण्याची चटणी किंवा ठेच्यासोबत आस्वाद घ्या.
विशेष आहार माहिती : शाकाहारी, प्रोटिनयुक्त
हेही वाचा – Recipe : इन्स्टंट बन डोसा
टीप्स
- यातील भाज्यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.
- बारीक चिरलेला कोबी, भरडलेले स्वीट कॉर्न दाणे या भाज्या देखील वापरता येतील.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


