हर्षा गुप्ते
मंगोडी चाट
पुरवठा संख्या – दोन व्यक्तींसाठी
एकण कालावधी – साधारणपणे 1 तास
साहित्य
- मूगडाळ – अर्धी वाटी
- उडीदडाळ – अर्धी वाटी
- हिरवी मिरची – 2-3 (आवश्यकतेनुसार)
- आलं – 1 इंच
- लसूण – 5 – 6 पाकळ्या
- चिरलेली कोथिंबीर – मूठभर
- कांदा – 1 मोठा (बारीक चिरलेला)
- जिरे – 1 लहान चमचा
- काळीमिरी – 1 लहान चमचा
- पुदिना चटणी – 1 वाटी
- चिंचेची चटणी – 1 लहान वाटी
- दही – 1 वाटी (मीठ घातलेले)
- शेव – 1 वाटी
- तेल – तळणासाठी
- हळद – 1 लहान चमचा
- मीठ – चवीनुसार
- हिंग – चिमुटभर
कृती
- मूगडाळ आणि उडीदडाळ अर्धा तास भिजवावी.
- भिजवलेल्या डाळी, 5-6 लसूण पाकळ्या, 1 इंच आले, मूठभर कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या (तुमच्या आवडीप्रमाणे), एक लहान चमचा जिरे आणि काळमिरी एकत्रितपणे पाणी न घालता वाटून घ्यावे.
- त्यात हळद आणि चवीप्रमाणे मीठ तसेच चिमूटभर हिंग घालून हे पीठ कालवून घ्यावे.
- गरम तेलात छोटी छोटी भजी तळून घेऊन पाण्यात टाकावीत. म्हणजे पाण्यात भिजून भजी नरम होतील.
- ती हलक्या हाताने दाबून पाणी काढून एका ताटलीत मांडून घ्या.
- त्यावर मीठ घातलेलं घट्ट दही पसरावा आणि वरून बारीक चिरलेला कांदा, पुदिना आणि चिंचेच्या चटण्या, शेव आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
हेही वाचा – Recipe : ही कोथिंबीर वडी करून पाहा…
बटर चाट
पुरवठा संख्या – दोन-तीन माणसांकरिता
एकूण कालावधी – अर्धा तास
साहित्य
- बटरचा चुरा – 2 वाट्या (टोस्ट बटरमधलं)
- बटाटे – 2 (उकडून कुस्करले)
- कांदा – 1 वाटी (चिरलेला)
- टोमॅटो – 1 वाटी (चिरलेला)
- पुदिना चटणी – 1 वाटी
- चिंचेची चटणी – 1 लहान वाटी
- फरसाण – 1 मोठी वाटी
- शेव – 1 वाटी
- साखर आणि मीठ घातलेलं ताक – 1 वाटी
- चिरलेली कोथिंबीर – मुठभर
हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट शेंगा डाळ अन् मिस्सी रोटी
कृती
- एका वाडग्यात बटरचा चुरा (एकदम बारीक तुकडे किंवा भुगा) घ्यावा.
- हा चुरा ओला होईल एवढं ताक त्यावर शिंपडून घ्या.
- त्यात फरसाण, बारीक चिरलेला कांदा, कुस्करलेला बटाटा बारीक चिरलेला टोमॅटो, पुदिना चटणी, चिंचेची चटणी घालून कालवून घ्या.
- नंतर त्यावर शेव आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या या वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या जातील.


