लीना जोशी परुळेकर
आपली त्वचा (Skin) आणि त्वचेची निगा याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. मग ती व्यक्ती कुठल्याही वयोगटातील असली तरी! आपली त्वचा कशी आहे? तिची काळजी कशी घ्यावी? असे असंख्य प्रश्न असतात. त्यामुळे सर्वप्रथम आपण आपल्या त्वचेची ओळख करून घेऊया.
आपली त्वचा मुळात तीन स्तरांनी बनलेली असते. पहिल्या आणि सर्वात वरच्या स्तराचे नाव आहे – Epidermis. त्याच्या खालच्या आणि मधल्या स्तराचे नाव आहे – Dermis. त्याच्या खालच्या आणि सर्वात शेवटच्या स्तराचे नाव आहे – Hypodermis / subcutaneous Layer… हे माहीत असणे अशासाठी गरजेचे आहे, कारण आपण जी उत्पादने वापरतो ती त्वचेच्या कुठल्या स्तरापर्यंत पोहोचतात, हे कळण्यासाठी! आपण जी उत्पादने वापरतो, ती त्वचेच्या सर्वात वरच्या स्तरामध्ये मुरतात. आपण जेव्हा Parlourमध्ये जाऊन machineच्या मदतीने एखादी treatment घेतो, तेव्हाच फक्त उत्पादन हे त्वचेच्या dermis या स्तरापर्यंत पोहोचते.
आता आपण आपल्या त्वचेचे प्रकार पाहू –
सामान्य त्वचा : जेव्हा त्वचा clear दिसते. तिचा रंग समान दिसतो. जेव्हा त्वचा हाताला तेलकट किंवा अति घट्ट न लागता मऊ मुलायम लागते आणि त्वचेची elasticity (लवचिकपणा) उच्च असते. या प्रकारची त्वचा साधारणपणे Puberty च्या आधी असते.
कोरडी त्वचा : जेव्हा चेहरा पाण्याने धुतल्यावर ओढल्यासारखा वाटतो. त्वचेचा रंग uneven असतो. त्वचा flaky दिसते. या प्रकारच्या त्वचेमध्ये elasticity चा अभाव आढळतो.
संवेदनशील त्वचा : या प्रकारच्या त्वचेत कोरड्या त्वचेचे गुणधर्म अधिक आढळतात. उन्हात गेल्यावर, कुठल्याही प्रकारचे उत्पादन लावल्यावर चेहरा लालसर होतो. त्यावर बारीक पुरळ उठतात. या त्वचेला उत्पादने वापरताना खूप काळजी घ्यावी लागते.
हेही वाचा – प्राचीन चित्रकला अन् मोर…
तेलकट त्वचा : ही त्वचा अति तुकतुकीत दिसते. या प्रकारच्या त्वचेमध्ये black heads, white heads तसेच मुरमांचे आणि त्यांच्या डागांचे प्रमाण जास्त आढळते. या प्रकारच्या त्वचेतून sebum (तेल ग्रंथीतून स्रवणारे नैसर्गिक तेल) Secretion जास्त प्रमाणात होत असते.
मिश्र त्वचा (Combination Skin) : या प्रकारच्या त्वचेत कोरडी त्वचा आणि तेलकट त्वचा यांचे मिश्रण असते. यात mostly, गाल कोरडे असतात आणि ‘T zone’ (कपाळ, नाक आणि हनुवटी) तेलकट असते.
आपली त्वचा कशी आहे, हे कसे ओळखावे?
रात्री झोपताना चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. सकाळी उठल्यावर एक Tissue घ्यावा आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने दाबावा. जर Tissue कोरडा असेल तर, तुमची त्वचा कोरडी आहे. जर Tissue थोडाफार तेलकट असेल तर, तुमची त्वचा तेलकट आहे. जर Tissue काही ठिकाणी कोरडा आणि काही ठिकाणी तेलकट असेल तर तुमची त्वचा मिश्र आहे.
lee.parulekar@gmail.com
(क्रमश:)
हेही वाचा – मूर्तीकला असो की नाणी… मोरालाच प्राधान्य