डॉ. सारिका जोगळेकर
आपले शरीर फक्त हाडं, स्नायू आणि अवयवांनी बनलेलं नाही – त्यामागे एक सूक्ष्म, पण अत्यंत प्रभावी अशी शक्ती असते, ती म्हणजे प्राणशक्ती (VITAL FORCE). ही शक्ती आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला कार्य करण्याची ऊर्जा देते, त्यामुळे सर्व क्रियाशीलता नियंत्रित राहते. आपल्या हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास, पचनक्रिया, रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूणच शरीरातील समतोल राखण्याचे कार्य ही प्राणशक्ती (vital force) करते. Vital force ही संकल्पना होमिओपॅथीमध्ये मूलभूत मानली जाते. होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमॅन यांनी vital force ही संकल्पना मांडली होती.
निरोगी असणं म्हणजे नेमकं काय?
आरोग्य म्हणजे शांत प्राणशक्तीचे संगीत. जेव्हा ते सुरेल असते तेव्हा शरीर निरोगी असते. “जेव्हा आपले शरीर आणि प्राणशक्ती सुसंगतपणे (in harmony) काम करत असते, तेव्हा शरीर, मन आणि भावना संतुलित राहतात अन् माणूस आपले शारीरिक, मानसिक आणि भावनिक आयुष्य मुक्तपणे जगतो, हीच खरी ‘निरोगी आरोग्याची अवस्था’ आहे.”
निरोगी स्थितीत शरीरातील सर्व क्रिया उदाहरणार्थ : हृदय, फुफ्फुसे, पचनक्रिया, सर्वकाही सुरळीत असतं. रोगप्रतिकारशक्ती उत्तम असते. मन शांत आणि स्थिर असतं. (मनात सकारात्मक विचार, संतुलित प्रतिक्रिया आणि भावना, आत्मविश्वास, ताण हाताळण्याची क्षमता, योग्य निर्णय घेण्याची क्षमता असते).
हेही वाचा – Homeopathy : शुद्ध आणि सुसंवादी आरोग्याचा मार्ग
आजाराची सुरुवात कधी होते?
होमिओपॅथी शास्त्रानुसार आजार म्हणजे प्राणशक्तीत निर्माण झालेला व्यत्यय (disturbance). प्राणशक्तीच्या (vital force) असंतुलनामुळे आजाराची सुरुवात होत आणि ही डिस्टर्ब झालेली प्राणशक्ती पुन्हा स्थिर आणि बळकट झाली की, शरीर स्वतःच बरे होऊ लागते. हीच प्राणशक्ती शरीर आणि मनाची एकलयता (harmony) टिकवण्याचे काम करते. जर मन अस्वस्थ असेल तर शरीरही दीर्घकाळ आजारी राहू शकते.
आपली प्राणशक्ती अस्थिर झाली की, ती आपल्याला काही संकेत देत असते म्हणूनच काही लक्षणं आजार होण्यापूर्वी आपल्याला जाणवायला लागतात – लवकर थकवा येणं, शांत झोप न लागणे, भूक न लागणे, चिडचिड होणे, उदास वाटणं इत्यादी.
होमिओपॅथी : जिथे प्राणशक्तीला मिळतो नवीन उत्साह (where vital force is stimulated to heal)
प्राणशक्ती ही अतिशय सूक्ष्म आहे म्हणूनच होमिओपॅथिक औषधेही अत्यंत सूक्ष्म मात्रेत दिली जातात, जी शरीरातील ऊर्जा स्तरावर काम करतात. ही औषधे नैसर्गिक असून ती प्राणशक्तीला उत्तेजित करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. होमिओपॅथिक औषधांचे परिणाम दीर्घकालीन असतात. कारण, एकदा प्राणशक्ती संतुलित झाली की, तोच रोग पुन्हा पुन्हा होत नाही. (Homeopathic medicines avoids the recurrence of disease). त्यामुळे फक्त लक्षणे नव्हे तर आजारच समूळ नष्ट होतो.
हेही वाचा – Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
स्वस्थ प्राणशक्तीचे लक्षणे
- चांगली ऊर्जा आणि उत्साह
- नैसर्गिकरीत्या बरे होण्याची क्षमता
- सकारात्मक भावना आणि मानसिक संतुलन
- मजबूत प्रतिकारशक्ती
होमिओपॅथी एका व्यक्तीच्या अंतर्गत शक्तीला चालना देणारा शास्त्रीय दृष्टिकोन आहे. आजच्या तणावयुक्त जीवनशैलीमध्ये vital forceचे संरक्षण करण्यासाठी होमिओपॅथीची अत्यंत आवश्यकता आहे. होमिओपॅथी प्रभावी आणि सुरक्षित आहे.
(HOLISTIC HOMOEOCURE)
ऋतू पार्क, ठाणे वेस्ट
मोबाइल – 9890533941