भाज्यांचे वडे रेसिपी
साहित्य
- उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी – दोन वाट्या
- गाजराचा किस – दोन वाट्या
- चिरलेली फरसबी – दोन वाट्या
- मटार दाणे – दोन वाट्या
- चिरलेला कांदा – एक वाटी
- ओल्या मिरच्या – 10-12
- कोथिंबीर – एक वाटी (बारीक चिरलेली)
- धणे – एक चमचा
- साखर – चवीपुरती
- बेसन – एक वाटी
- तेल – तळणासाठी
- फोडणीचे साहित्य
- मीठ – चवीनुसार
- लिंबू – एक
कृती
- बारीक चिरलेली फरसबी, मटार दाणे आणि गाजराचा किस तेलावर वाफवून घ्यावा.
- नंतर फरसबी, बटाटा, गाजराचा किस आणि मटार दाणे एकत्र करून चांगले मिसळावे.
- फोडणी करून, त्यात चिरलेला कांदा परतून घेऊन, तो आणि ओल्या मिरच्या वाटून या मिश्रणात घालावे आणि त्यावर लिंबू पिळावे.
- चवीला मीठ, धणे, कोथिंबीर आणि चवीपुरती साखर घालावी.
- सर्व मिश्रण एकत्र करून, चांगले मळून घ्यावे आणि त्याचे लहान गोळे तयार करावेत.
- बेसनमध्ये थोडे लाल तिखट आणि मीठ तसेच थोडे तापलेले तेल घालावे आणि पाणी घालून, पीठ वड्याच्या पिठाइतपत पातळ करावे.
- मिश्रणाचे तयार केलेले गोळे या पिठात बुडवून, तेलात तळून काढावेत.
हेही वाचा – Recipe : आजचा मेन्यू… कोबी डोलमा आणि संत्र्याचा भात
कचोरी रेसिपी
साहित्य
- बटाटे – एक किलो
- नारळ – एक मोठा
- ब्रेड – 2-3 स्लाइस
- खसखस – अर्धी वाटी
- बेदाणे – एक टेबलस्पून
- काजू – एक टेबलस्पून
- साखर – एक वाटी
- मीठ – चवीनुसार
- ओल्या मिरच्या – 10-15
- लिंबू – एक
- कोथिंबीर – दीड वाटी (बारीक चिरलेली)
- तूप – तळणासाठी
- ब्रेडचा चुरा अगर तांदळाची पिठी – एक वाटी
हेही वाचा – Recipe : कारल्याची भाजी अन् कारल्याच्या चकत्या!
कृती
- बटाटे उकडून, सालं काढून, बारीक वाटून घ्यावेत.
- ब्रेडच्या स्लाइस पाण्यात भिजवून घेऊन आणि कुस्करून बटाट्याच्या गोळ्यात घालाव्यात.
- नारळ खोवून, त्या खोबऱ्यात खसखस (भाजून), कोथिंबीर, साखर, चवीप्रमाणे मीठ, बेदाणे, काजूचे तुकडे आणि मिरच्यांचे अगदी बारीक तुकडे करून घालावे. आवडत असल्यास थोडासा लिंबाचा रस घालावा. याप्रमाणे सारण तयार करून घ्यावे.
- बटाट्याच्या वाटलेल्या गोळ्यात चवीकरिता थोडे मीठ घालावे. नंतर त्याची लिंबाएवढी गोळी घेऊन त्याची पापडी करावी आणि त्या पापडीत हे सारण भरून, पापडीचे तोंड मिटून, त्याला गोल आकार द्यावा.
- ब्रेडच्या चुऱ्यात अगर तांदळाच्या पिठीत ही कचोरी घोळावी आणि तुपात तांबूस रंगावर तळून काढावी.
- कचोरी खावयास देताना बरोबर खोबऱ्याची चटणी द्यावी.
(‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


