मुरकूसाठी साहित्य
- तांदूळ – चार वाट्या
- उडदाची डाळ – अर्धी वाटी
- नारळ – अर्धी वाटी
- मीठ – चवीनुसार
- हिंग – एक लहान चमचा
- खोबऱ्याचे तेल किंवा गोडेतेल – तळणासाठी
कृती
- तांदूळ चार तास भिजत घालून, नंतर कुटावेत आणि बारीक चाळणीने पीठ चाळून घ्यावे.
- उडदाची डाळ अगदी लाल भाजून बारीक दळावी.
- नंतर दोन्ही पिठे मिसळून, त्यात नारळाचे दूध घालावे.
- चवीप्रमाणे मीठ तसेच हिंग घालून आणि पुरेसे पाणी घालून पीठ भिजवावे.
- या पिठाचा गोळा हाताच्या चार बोटांत धरून आणि बोटे दाबून हाताने पीळ घालत-घालत कागदावर गोल वेटोळी घालावीत. अगर ते न जमल्यास चकलीपात्रातून त्या पिठाच्या चकल्या कागदावर घालाव्यात.
- थोडा वेळ सुकल्यावर खोबऱ्याचे तेल (ते नसल्यास गोडे तेल) तापत ठेवून, त्यात वरील वेटोळी अगर चकल्या तळाव्यात.
हेही वाचा – Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी…
चिडे बनविण्याचे साहित्य
- तांदूळ – चार वाट्या
- उडदाची डाळ – अर्धी वाटी
- नारळ – अर्धी वाटी
- लोणी – लहान लिंबाएवढे
- मीठ – चवीनुसार
- हिंग – एक लहान चमचा
- खोबऱ्याचे तेल – तळण्यासाठी (नसल्यास गोडेतेल)
हेही वाचा – Recipe : कारल्याची भाजी अन् कारल्याच्या चकत्या!
कृती
- तांदूळ चार तास भिजत घालावेत.
- नंतर हे तांदूळ कुटून त्याचे पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे.
- उडदाची डाळ अगदी लाल भाजून, बारीक दळावी.
- नंतर तांदळाचे पीठ आणि उडदाचे पीठ मिसळून, त्यात ओले खोबरे वाटून घालावे.
- त्यानंतर या मिश्रणात लोणी घालावे आणि चवीनुसार मीठ तसेच हिंग, पुरेसे पाणी घालून पीठ भिजवावे.
- भिजविलेल्या पिठाच्या बोराएवढ्या गोळ्या कराव्या आणि अर्धा तास पसरून ठेवाव्यात.
- नंतर या बोराएवढ्या गोळ्या खोबरेल तेलात तळाव्यात. खोबरेल तेल नसेल, तर गोड्यातेलात तळाव्यात.
(‘रुचिरा’ या पुस्तकातून साभार)
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


