डॉ. किशोर महाबळ
एक व्यक्ती एकदा आजारी पडली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासण्या झाल्यावर आजाराचे गंभीर स्वरूप लक्षात आले. पेशंट फार काळ जगण्याची शक्यता नगण्य होती. डॉक्टरांनी पेशंटला कोणतीही लपवाछपवी न करता तब्येतीची माहिती दिली. ऐकल्यावर पेशंटला वाईट वाटणे स्वाभाविक होते. तरीही, त्याने डॉक्टरांनी दिलेल्या सूचना आणि सल्ला अतिशय काळजीपूर्वक ऐकला. काही दिवसांनी त्या पेशंटला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले.
फॉलोअपसाठी हॉस्पिटलच्या पुढच्या भेटीदरम्यान पेशंटने डॉक्टरांना त्याने लिहिलेले पुस्तक आणि फावल्या वेळात तयार केलेल्या ओरिगामी फुलांचा पुष्पगुच्छ भेट म्हणून दिला आणि डॉक्टरांचे आभार मानले. हा प्रकार बघून डॉक्टर आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी पेशंटला “माझे आभार’ का मानले?” असे विचारले.
हेही वाचा – Qualities or Attire : प्राध्यापकांना महत्त्वाचे काय, गुणवत्ता किंवा छानछोकी?
पेशंट म्हणाला, “डॉक्टर, तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना ‘दीर्घायुष्यापेक्षा गुणवत्तापूर्ण आयुष्या’ला महत्त्व द्या, असा सल्ला दिला होता. त्या दिवसापासून एवढे दिवस मी ‘जीवनाची गुणवत्ता’ या शब्दांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आलो आहे. याचा परिणाम असा आहे की, मी आता चांगले संगीत ऐकण्यात, शास्त्रीय पुस्तके वाचण्यात, गरजू लोकांना मदत करण्यात आणि लेखनासारखे माझे छंद जोपासण्यात जास्त वेळ घालवत आहे. या छंदांकडे मी गेली अनेक वर्षे दुर्लक्ष करत आलो आहे. माझे हे पुस्तक आणि ही ओरिगामीची फुले हे तुमच्या ‘गुणवत्तापूर्ण आयुष्य’ या शब्दांच्या उच्चाराचा परिणाम आहेत.”
डॉक्टरांच्या लक्षात आले की, पेशंटशी संवाद साधताना आपण उच्चारत असलेला प्रत्येक शब्द खूप जास्त परिणामकारक, महत्त्वाचा आहे. शब्द किती प्रभावीपणे वापरले जाऊ शकतात, हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांनी आता शास्त्रीय संगीत ऐकण्याचे आणि आवडीची पुस्तके वाचण्याचे ठरवले.
हेही वाचा – Professor and student : भावना नेहमीच खऱ्या असतात
(कै. डॉ. किशोर महाबळ यांच्या Quality of life या लघुकथेचा आराधना जोशी यांनी केलेला स्वैरानुवाद)
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.