लीना जोशी परुळेकर
आधीच्या लेखांमध्ये आपण तेलकट आणि कोरड्या त्वचेवर कुठल्या प्रकारची उत्पादने वापरायची हे पाहिले, आता या लेखात आपण मिश्र आणि संवेदनशील त्वचेवर कुठल्या प्रकारची उत्पादने वापरायची ते पाहू.
मिश्र त्वचेवर दोन प्रकारची उत्पादने वापरता येऊ शकतात.
पहिला प्रकार : यात चेहऱ्याच्या ज्या भागात कोरडी त्वचा आहे, त्या भागात कोरड्या त्वचेसाठी असलेली उत्पादने वापरावीत आणि ज्या भागात तेलकट त्वचा आहे, त्या भागात तेलकट त्वचेसाठी असलेली उत्पादने वापरावीत.
दुसरा प्रकार : हल्ली बाजारात असे उत्पादन मिळते, जे सर्व त्वचा प्रकारांसाठी वापरता येते. ज्यावर, ‘All skin Types’ असे नमूद केलेले असते. ही उत्पादने Lotion, gel किंवा cream base असू शकतात.
आता मिश्र त्वचेसाठी पहिल्या प्रकारातील उत्पादने वापरावीत की, दुसऱ्या प्रकारातील हे प्रत्येकाने उत्पादने वापरल्यानंतर आलेल्या अनुभवांवरून ठरवावे. जी पद्धत वापरल्यामुळे आपल्या त्वचेला जास्तीत जास्त फायदा मिळेल, ती पद्धत वापरावी.
या त्वचेवर आपण जेव्हा CTMS आणि रात्री CTN Plan चा उपयोग करणार असू तेव्हा वेगवेगळी उत्पादने वापरणार असाल तर, कोरड्या त्वचेवर कोरडेपणा कमी करणारी आणि तेलकट त्वचेवर तेलकटपणा कमी करणारी उत्पादने cleansing, toning, moisturizing आणि Sunscreen या क्रमाने वापरावीत. जेव्हा All skin type या प्रकारची उत्पादने वापरणार असाल तेव्हा, All skin type या प्रकारात मोडणारी उत्पादने cleanser, toner, moisturizer आणि Sunscreen या क्रमाने लावावीत.
हेही वाचा – त्वचा आणि त्वचेवर परिणाम करणारे घटक
मिश्र त्वचेसाठी वाफ, Scrub आणि mask पंधरवड्यातून एकदा करावे. वाफ घेतल्यावर जर त्वचेचा कोरडा भाग हा जास्त कोरडा होत असेल तर, वाफ कमी वेळ घ्यावी. Scrub करताना जर कोरड्या त्वचेवर वेगळा आणि तेलकट त्वचेवर वेगळा Scrub करणार असाल तर कोरड्या त्वचेवर non-granulated आणि तेलकट त्वचेवर granulated scrub वापरावा. All Skin type या प्रकारातला Scrub असेल तर तो granulated किंवा non-granulated अशा दोन्ही प्रकारांमध्ये असू शकतो. हे scrub pack वरती दिलेल्या सूचना पाळून वापरावेत. मिश्र त्वचेवर mask वापरताना कोरड्या त्वचा भागावर non setting mask वापरावा आणि तेलकट त्वचेवर setting mask. All Skin Types या प्रकारच्या उत्पादनाचे मास्क हे setting आणि non setting या दोन्ही प्रकारात उपलब्ध असतात. हे mask pack वरच्या सूचनांप्रमाणे वापरावेत.
आता इथे तेलकट आणि कोरड्या त्वचेवर ज्या sequence ने CTMS plan मध्ये वाफ, scrub आणि mask add केला होता, तसाच या त्वचेत add करावा.
संवेदनशील त्वचा
संवेदनशील त्वचेसाठी जी उत्पादने बाजारात मिळतात त्यावर Sensitive skin असे लिहिलेले असते. संवेदनशील त्वचेसाठी उत्पादने Mild असतात. या उत्पादनांमुळे त्वचेला त्रास होत नाही.
या त्वचेसाठी जेव्हा आपण CTMS Plan करू, तेव्हा सर्व उत्पादने cleanser, toner, moisturizer आणि sunscreen याच क्रमाने वापरणार. संवेदनशील त्वचेवर काहीवेळा थोडे Strong Sunscreen वापरावे लागते.
हेही वाचा – Skin care : उत्पादने वापरण्यापूर्वी आपल्या त्वचेचा pH जाणून घ्या
संवेदनशील त्वचेवर वाफ, Scrub, mask हे महिन्यातून एकदा वापरावे. संवेदनशील त्वचा ही सामान्यतः जास्त कोरडेपणाकडे झुकलेली असते, त्यामुळे वाफ घेतल्यावर त्वचा किती कोरडी होते, त्याप्रमाणे वाफ घेण्याचे प्रमाण ठरवावे. तेच Scrub चे आणि mask चे पण. या प्रकारच्या त्वचेवर उत्पादने वापरताना, थोड्या फार प्रमाणात trial and error करावे लागते, कारण कुठल्याही उत्पादनाची allergy येत नाही ना, हे उत्पादन वापरल्याशिवाय लक्षात येत नाही.
या त्वचेवर सुद्धा वाफ, Scrub, mask चा sequence हा cleansing, वाफ, Scrub, mask, toner, moisturizer आणि Sunscreen असाच असणार आहे.
मिश्र त्वचेसाठी आणि संवेदनशील त्वचेसाठी CTN Plan हा त्वचेच्या त्या त्या वेळेच्या condition वर अवलंबून आहे. मिश्र त्वचेवर Nourishing हे Heavy असण्याची गरज नाही, जसे कोरड्या त्वचेसाठी ते गरजेचे आहे. या दोन्ही प्रकारच्या त्वचेवर वापरायचे Nourishing उत्पादन हे cream / lotion / gel ह्या स्वरूपात उपलब्ध असते. हे उत्पादन mild असले तरी चालते.
आता पुढच्या भागात आपण सर्व त्वचा प्रकारांसाठी कोणकोणते पारंपरिक घरगुती उपाय करू शकतो ते बघू.
क्रमश: