रश्मी परांजपे
मागील लेखात आपण पालकांच्या माहितीसाठी आणि पूर्ततेसाठी विद्यार्थीसंबंधित माहितीपत्रक तयार करताना समाविष्ट करावयाचे काही निवडक मुद्दे जाणून घेतले. या लेखात आपण माहितीपत्रकातील उर्वरित मुद्द्यांविषयी माहिती घेऊयात.
अभ्यासक्रमातील व्यवसाय-पुस्तके
मुलांच्या अभ्यासक्रमात व्यवसाय-पुस्तकांचा समावेश असतो. ही व्यवसाय-पुस्तके मिळण्याच्या ठिकाणाचा तपशील माहितीपत्रकात अवश्य द्यावा.
फी भरणा
फी भरण्याची तारीख, वेळ आणि मुदत याबाबतचा तपशील माहितीपत्रकात अवश्य नमूद असावा.
शाळेत भेटण्याची वेळ
- पालक शाळेत शिक्षक/शिक्षिकेला तसेच मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिकांना कधी भेटू शकतात, याविषयी सूचना माहितीपत्रकात अवश्य द्यावी.
- वर्ग चालू असताना पालकांनी शिक्षिकेला भेटण्यास प्रतिबंध असावा.
हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : माहितीपत्रक
मुलांचा शाळेतील डबा
सुरुवातीला मुलांच्या डब्यात खाऊ असू द्यावा, त्यामुळे मुलं शाळेत लवकर रमण्यास मदत होते. साधारण दोन आठवड्यानंतर शाळा पूर्ण वेळ झाल्यावर डब्यात पोळी-भाजी आणणे अनिवार्य करावे; मात्र आठवड्यातील एक दिवस खाऊ आणण्यास परवानगी द्यावी. डब्यात पोळी-भाजी आवश्यक करण्याचा नियम तंतोतंत लागू करावा. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा नियम हितकारक असल्याने नक्कीच उपयुक्त ठरतो, हा माझा अनुभव आहे.
साप्ताहिक सुट्टी
शाळेला रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. काही शाळेत आठवड्यातील पाच दिवस वर्ग असतो आणि शनिवारी देखील सुट्टी असते. माहितीपत्रकात साप्ताहिक सुट्टीचा स्पष्ट उल्लेख असावा.
पालकसभा
शाळा वर्षात दोन किंवा तीन पालकसभा घेतात. पालकांना अशा सभांना अवश्य उपस्थित राहण्यास सांगावे.
इतर सूचना
- विद्यार्थ्यांच्या अंगावर सोन्या-चांदीचे दागिने (अंगठी, रिंग, पैंजण इत्यादी) असू नयेत.
- मुसळधार पाऊस, संप, हरताळ, आंदोलन आणि तत्सम घटना असलेल्या दिवशी मुलांना शाळेत पाठवू नये.
- मुलाने शाळेची किंवा इतर विद्यार्थ्याची एखादी वस्तू घरी नेल्यास त्याच्याकरवीच परत करण्यास सांगावे.
- ठोस कारण असल्याशिवाय मुलाला गैरहजर ठेवू नये.
हेही वाचा – विद्यार्थी प्रवेशाबाबत शाळेची जबाबदारी
सूचनापालन
शाळेतून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन पालकांनी करावे, अशी सूचना देखील माहितीपत्रकात अवश्य असावी.
माहितीपत्रकात समाविष्ट करावयाचे महत्त्वाचे निवडक मुद्दे जाणून घेतल्यानंतर पुढील लेखात आपण ‘शाळा सुरू होण्यापूर्वीची तयारी’ याविषयी माहिती घेणार आहोत.
क्रमश:
(लेखिका पूर्व-प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून 32 वर्षे कार्यरत राहून निवृत्त झाल्या. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनमोल योगदान दिले. तसेच, लेखिका योग अभ्यासक असून त्या नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. शिवाय, निरामय आरोग्य संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. संकल्पनेच्या सविस्तर तपशीलासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)
मोबाईल – 9881943593
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


